Maharashtra Weather: मुंबई- पुण्यात माथेरानचा फिल! मराठवाड्यात थंडीचा कडाका तर नाशिकच्या 'कॅलिफोर्निया'ला भरली हुडहुडी
मुंबईत हवामानात गारठा वाढला आहे. यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच मुंबईतील पारा खाली घसरला आहे. मुंबईतील सांताक्रुझ येथे 18.9 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे.
मुंबई : विदर्भ, मराठवाड्यानंतर आता मुंबईतही थंडीचा कडाका वाढला आहे (Maharashtra Winter Weather) कालपासून मुंबईचं वातावरणात गारठा वाढू लागला आहे. आज मुंबईतील पारा (Mumbai Temperature) 19 अंश सेल्सिअसपर्यंत घसरला. मुंबईचं तापमान हे माथेरानच्या तापमानाइतकं घसरलं आहे. तर नाशिक जिल्ह्यातील ‘कॅलिफोर्निया’ म्हणून ओळख असलेल्या निफाड (Niphad) तालुक्यात 9 अंश सेल्सिअस इतक्या कमी तापमानाची नोंद झाली आहे महाराष्ट्राचं मिनी काश्मिर असलेल्या महाबळेश्वरमध्ये (Mahabaleshwar) पारा 15 अंशावर आला आहे . पर्वतीय भागात बर्फवृष्टीमुळे उत्तर भारतात थंडीचा कडाका वाढला आहे. मैदानी भागातून येणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्रातील वातावरणावरही परिणाम होत आहे
मुंबईत हवामानात गारठा वाढला आहे. यंदाच्या मोसमात पहिल्यांदाच मुंबईतील पारा खाली घसरला आहे. मुंबईतील सांताक्रुझ येथे 18.9 डिग्री सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हे मुंबईतील या सत्रातील सर्वात नीचांकी तापमान आहे. मुबंईत तापमान कमी असल्याने मुंबईकरांना माथेरानचा फिल येतो आहे. तर मराठवाड्यातील अनेक भागातील तापमानात घट झाली आहे. पुण्यातही गारवा वाढला असून किमान तापमान 11.3 अंशांवर गेले आहे.
कुठे किती तापमान? (अंश सेल्सिअसमध्ये)
- संभाजीनगर - 11.8
- पुणे - 11.3
- निफाड - 9
- सातारा - 13.4
- सांगली - 14.2
- नांदेड - 15
- नाशिक - 13.6
- जालना - 13.6
- कोल्हापूर - 16.3
- सांताक्रुज - 18.9
- महाबळेश्वर - 15
- धुळे - 8
- परभणी - 12.2
- सोलापूर - 15.9
- धाराशिव - 15.4
- बारामती - 11.4
- रत्नागिरी - 20.5
- माथेरान - 19.4
- बीड - 12
- जळगाव - 12.6
मराठवाड्यात अनेक भागातील थंडीची लाट पसरली असून कडाक्याच्या थंडीने गारठले आहे. बीड जिल्ह्याचे तापमान 12 अंशापर्यंत घसरले असल्याने सर्वत्र कमालीचा गारठा निर्माण झाला आहे. ग्रामीण भागासह शहरातही ठिकठिकाणी शेकोट्या पेटू लागल्या आहेत थंडीपासून बचावासाठी नागरिक उबदार कपड्यांचा वापर करताना दिसून येत आहेत तर महत्त्वाचं म्हणजे रब्बी पिकांसाठी थंडी पोषक आहे.
गारवा वाढल्याने रब्बी हंगामातील पिकांना फायदा
डिसेंबर महिन्याचा दुसऱ्या आठवड्यापर्यंत जिल्ह्यात थंडीचा कडाका जाणवत नव्हता, त्यामुळे रब्बी हंगामातील पिकांवर मोठ्या प्रमाणात परिणाम होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत होती. मात्र गेल्या आठवडाभरात जिल्ह्यात तापमानात घट झाली असून थंडीचा कडाका वाढला आहे. गेल्या तीन दिवसापासून तापमानात मोठ्या प्रमाणात घट झाली असून तापमान 15 अंश पर्यंत खाली आले आहे. वातावरणातील गारव्याचा फायदा रब्बी हंगामातील पिकांना होणार असून पिकांना पोषक वातावरण निर्माण झाले आहे. मात्र थंडीचा कडाका वाढला असून थंडी पासून बचावासाठी नागरिकांना शकोटीचा आधार घ्यावा लागत आहे.
हे ही वाचा :