एक्स्प्लोर
PHOTOS: सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस; मुंबईत सकाळी 9 वाजता काळाकुट्ट अंधार, गाड्यांच्या लाईट लागल्या, कंबरेभर पाण्यात चाकरमानी खोळंबले
Mumbai Rains Live Updates: मुंबईसह राज्यातील विविध जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी पावसाने दमदार हजेरी लावलीय. मुंबई आणि लगतच्या भागात धुवांधार पाऊस पडल्यानं एकीकडे सर्वसामान्य मुंबईकरांचे हाल झालेत.
Mumbai Rains Live Updates
1/11

मुंबईसह उपनगरांमध्ये दोन दिवसांपासून धुवांधार पाऊस सुरूये. चेंबूरमध्ये सर्वाधिक पाऊस झाला असून 6 तासांत 170 मिमी पाऊस झाला आहे.
2/11

अनेक भागांमध्ये रस्त्यांना नद्यांचं स्वरुप आलं आहे, तर काही ठिकाणी नागरिकांच्या कमरेइतकं पाणी असल्यामुळे चालतांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागला.
3/11

मुंबई, ठाणे, भिवंडी, मिरा-भाईंदर, पालघर, कल्याण-डोंबिवली, नवी मुंबई आणि रायगड या भागात आज शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आलीय.
4/11

तसेच, मुंबई आणि कोकण विभागातील महाविद्यालयांनाही आज सुट्टी जाहीर करण्यात आली आहे.
5/11

मुंबईत गेल्या दोन दिवसांपासून सुरु असलेल्या पावसामुळे अनेक परिसरात सखल भागात पाणी साचल्याचं चित्र आहे आणि हवामान विभागाकडून तर अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलाय.
6/11

मुंबईत मुसळधार पाऊस सुरु, अशातच सांताक्रूज़ चेंबूर लिंक रोड परिसरातही पाणीच पाणी झालंय. परेल हिंदमाता परिसरात पाणी साचलंय.
7/11

मुंबईतील किंग्ज सर्कल परिसरात पाणीच पाणी काल रात्रीपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मुंबईच्या दादर आणि इतर सखल भागात पाणी साचलं. कुर्ला, विद्याविहारदरम्यान परिसरातही पाणी साचलं आहे.
8/11

ठाणे, नवी मुंबईतही जोरदार पाऊस कोसळतेय. पश्चिम उपनगरात अंधेरी जोगेश्वरी, गोरेगाव, मालाड, कांदिवली, बोरिवली, दहिसर, विलेपार्ले, सांताक्रूझ,वांद्रे या सर्व परिसरात पाऊस सुरू आहे.
9/11

मुंबई आणि उपनगरात मुसळधार पाऊस सुरूये. सखल भागात पाणी साचण्यास सुरुवात झाली असून पावसामुळे पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावरील लोकल वाहतूक मंदावली आहे.
10/11

रेल्वे वाहतुकीवरही परिणाम झाल्याचं पाहायला मिळतंय. मध्य रेल्वेची वाहतूक 40 मिनिटं उशिरानं आहे, तर हार्बर रेल्वे 15 ते 20 मिनिटं उशिरानं आहे, तर पश्चिम रेल्वेची वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिरानं सुरू आहे.
11/11

मुसळधार पावसाची परिस्थिती लक्षात घेता खबरदारी म्हणून मुंबई विद्यापीठाच्या आजपासून होणाऱ्या सर्व परीक्षा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. सुधारीत वेळापत्रकानुसार आता या सर्व परीक्षा 23 ऑगस्टपासून नियोजित वेळेनुसार होणार आहेत.
Published at : 19 Aug 2025 09:35 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
























