एक्स्प्लोर
Pune Traffic: पुण्यातील सिंहगड रस्त्यावर भीषण वाहतूक कोंडी; वाहनांच्या लांबच लांब रांगा, पुणेकर वैतागले
सतत कोसळणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी रस्ते जलमय झाले असून, वाहतुकीवर मोठा परिणाम झाला आहे.
Pune Traffic Jam
1/7

आज मंगळवारी सकाळपासून सिंहगड रस्त्यावर प्रचंड वाहतूक कोंडी झाली असून विठ्ठलवाडी परिसरात वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत.
2/7

सकाळपासून पुण्यात जोरदार पाऊस सुरू आहे. मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक रस्ते जलमय झालेत.
3/7

गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसाने रस्त्यांवर खड्डे पडले आहेत. यामुळे वाहनांची गती मंदावते, आणि त्याचा परिणाम वाहतुकीच्या कोंडीत दिसून येतो.
4/7

त्यातच सिंहगड रोडवरील नव्याने उभारण्यात आलेल्या उड्डाणपूलाचे अद्याप लोकार्पण झालेले नाही. त्यामुळे वाहतुकीचा ताण अजूनही इतर रस्त्यांवरच वाढतो आहे.
5/7

सिंहगड रस्ता हा पुण्यातील महत्त्वाचा आणि दैनंदिन लाखो वाहनांची वर्दळ असलेला मार्ग आहे. मात्र वारंवार होणारी वाहतूक कोंडी, खड्डेमय रस्ते, तसेच पर्यायी रस्त्यांचा अभाव यामुळे पुणेकर त्रस्त झाले आहेत.
6/7

शहरातील वाहतुकीवरही पावसाचा मोठा परिणाम झाला आहे. सिंहगड रोड, कोथरूड, स्वारगेट, कात्रज आणि नगर रोड परिसरात पाणी साचल्याने वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
7/7

मागील काही दिवसांपासून पुण्यात आणि आसपासच्या परिसरात मुसळधार पाऊस सुरू आहे.
Published at : 19 Aug 2025 11:28 AM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नवी मुंबई
व्यापार-उद्योग
यवतमाळ
क्रिकेट
























