एक्स्प्लोर
Mumbai Heavy Rain Mithi River: मिठी नदीने धाकधूक वाढवली, कुर्ल्यातील क्रांतीनगरमध्ये पाणी शिरलं, रेस्क्यू ऑपरेशनला सुरुवात
Mumbai Heavy Rain: मुंबईत गेल्या काही तासांपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. मिठी नदी धोकादायक पातळीच्या जवळ जाऊन पोहोचली आहे. आजुबाजूच्या वस्त्यांमध्ये पाणी शिरायला सुरुवात
Mumbai Heavy Rain news Mithi River
1/9

मुंबईत सोमवारपासून सुरू असलेल्या सततच्या मुसळधार पावसामुळे मंगळवारी (19 ऑगस्ट) पहाटेच्या मिठी नदीच्या पाण्याच्या पातळीत मोठी वाढ झाली आहे.
2/9

मिठी नदीचे पाणी आजुबाजूच्या वस्त्यांमध्ये शिरण्यास सुरुवात झाली आहे.
3/9

एनडीआरएफकडून मुंबईतील मदतकार्यास सुरुवात. कुर्ल्यातील क्रांती नगरमध्ये पाणी भरल्यानंतर नागरिकांना रेस्क्यू करण्यास सुरुवात
4/9

बृहन्मुंबई महानगरपालिका परिसरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे मिठी नदीची पातळी ३.९ मीटर इतकी वाढली होती. ही बाब लक्षात घेता प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून क्रांतीनगर, कुर्ला या परिसरातील सखल भागातील सुमारे ३५० नागरिकांचे स्थलांतर हे तात्पुरत्या निवाऱ्याचे ठिकाण असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या मगनदास मथुराम मनपा शाळेत करण्यात आले आहे.
5/9

आता समुद्राची भरती ओसरू लागल्यानंतर मिठी नदीची पातळी देखील ओसरू लागली असून ही पातळी ३.९ मीटर वरून आता ३.६ मीटर इतकी झाली आहे.
6/9

रहिवाशांच्या सुरक्षिततेची खात्री करण्यासाठी 140 हून अधिक झोपडपट्ट्यांचे तात्काळ स्थलांतर करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
7/9

मंगळवारी सकाळी मिठी नदीच्या पाणी पातळीने 3.20 मीटर ओलांडताच, कपाडिया नगरमधील जवळच्या झोपडपट्टीतील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते.
8/9

पुराचा धोका असल्याने, स्थानिकांनी स्वतःहून स्थलांतर करण्यास सुरुवात केली होती. काहींनी नातेवाईकांकडे आश्रय घेतला, तर काहींनी उंच मजल्यांवर स्थलांतर केले आहे.
9/9

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी एनडीआरएफच्या या मदतकार्याचा आढावा घेतला.
Published at : 19 Aug 2025 01:28 PM (IST)
आणखी पाहा
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
























