एक्स्प्लोर

Indian Railway Rule: रेल्वे लागू करणार विमान प्रवासाचा नियम, मर्यादेपेक्षा अधिक साहित्य घेऊन जाणं महागात पडणार, रेल्वे दंड आकारणार

Indian Railway Rule: विमान प्रवासाप्रमाणे आता रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना लगेज रुलचं पालन करावं लागेल. या नियमानुसार निश्चित केलेल्या वजनापेक्षा अधिक वजनाचं साहित्य सोबत नेल्यास दंड द्यावा लागेल.

नवी दिल्ली : भारतीय रेलवे (Indian Railway) लवकरच रेल्वे प्रवाशांसाठी नवा नियम लागू करणार आहे. त्या नियमाचं पालन काटेकोरपणे केलं जाणार आहे. ज्या प्रमाणं विमान प्रवास करताना ठराविक वजनापर्यंत साहित्य घेऊ जाता येतं. त्याप्रमाणं रेल्वे प्रवासात देखील लगेजच्या वजनाच्या नियमाचं पालन करावं लागेल. जे प्रवासी लगेज नियमाचं पालन करणार नाहीत त्यांना दंड द्यावा लागेल. यापूर्वी देखील अशा प्रकारचा नियम आणण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र या नियमाची पूर्णपणे अंमलबजावणी करण्यात आली नव्हती.

रेल्वेकडून निश्चित करण्यात आलेल्या वजनमर्यादेपर्यंत साहित्य प्रवासी त्यांच्यासोबत घेऊन जाऊ शकतात. देशातील काही प्रमुख रेल्वे स्टेशनवर वजनाच्या संदर्भातील मर्यादेचं काटेकोरपणे पालन केलं जाणार आहे. विमान प्रवासात ज्या प्रमाणं नियमाचं काटेकोर पालन केलं जातं, त्याप्रमाणं रेल्वे देखील नियम लागू करणार आहे. नियमानुसार प्रवासाच्या वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार मोफत साहित्य घेऊन जाण्याची मर्यादा वेगळी असते.

प्रथम श्रेणी एसी कोचमधून प्रवास करणाऱ्यांना 70 किलो वजनाचं साहित्य घेऊ जाण्याची परवानगी आहे. एसी सेकंड क्लास डब्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी 50 किलो आणि स्लीपर कोचमधून प्रवास कणाऱ्यांसाठी ही मर्यादा 40 किलो असेल. जनरल तिकीटावरुन प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी ही मर्यादा 35 किलोपर्यंत असेल. प्रवाशांना निश्चित केलेल्या मर्यादेपेक्षा 10 किलो अधिक साहित्य घेऊन जाण्यास परवानगी असेल. मात्र त्यापेक्षा लगेजचं साहित्य जास्त भरल्यास त्याचं स्टेशन काऊंटरवरुन बुकिंग करावं लागेल.

एखाद्या प्रवाशाकडे निश्चित केलेल्या वजनापेक्षा अधिक वजनाचं साहित्य सापडल्यास त्याला दंड द्यावा लागेल. हा दंड नियमित लगेजच्या शुल्काच्या दीडपट असेल. त्यामुळं लगेज वजन मर्यादेचा भंग करणं प्रवाशांना महागात पडू शकतं.

रेल्वे अधिकाऱ्यांच्या मते हा नियम प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी आणि सोयीसाठी महत्त्वाचा आहे. काही प्रवासी अधिक लगेज सोबत घेऊन प्रवास करतात त्याचा इतर प्रवाशांना त्रास होत असतो, काही वेळा सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळं लगेजवर नियंत्रण आणण्याचा भारतीय रेल्वेचा निर्णय आहे. सणांच्या काळात आणि उन्हाळ्याच्या दिवसात हा नियम फायदेशीर ठरु शकतो.

एबीपी माझा वेब टीममध्ये कॉपी एडिटर म्हणून कार्यरत | राजकारण,क्रीडा, राष्ट्रीय, आंतराराष्ट्रीय ते गाव खेड्यातल्या शेती क्षेत्रातल्या बातम्यांची आवड | यापूर्वी महाराष्ट्र टाइम्स ऑनलाइन | टीव्ही 9 मराठी डिजीटल | ईटीव्ही भारत महाराष्ट्र मध्ये काम 
Read More

महत्त्वाच्या बातम्या

Russia Sanctions 100 Percent Tariff On India: भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
भारतासह 5 देशांवर अमेरिका 100% टॅरिफ लावणार; रशियावर निर्बंध लादणारे विधेयक सिनेटकडून मंजूर
Multibagger Stock : संरक्षण क्षेत्रातील मल्टीबॅगर स्टॉकमध्ये घसरण, कंपनी लाभांश देणार, रेकॉर्ड डेट घोषित
संरक्षण क्षेत्रातील मल्टीबॅगर स्टॉकमध्ये घसरण, कंपनी लाभांश देणार, रेकॉर्ड डेट घोषित
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
सणासुदीच्या काळात साखरेनं दिला दराचा चटका, महिनाभरातच तब्बल 15 टक्क्यांची वाढ, दर वाढण्याचं नेमकं कारण काय?
घर घेण्याचं स्वप्न होणार साकार! RBI न घेतला मोठा निर्णय, ग्रामीण बँका आता ग्राहकांना देणार 3 कोटी रुपयांचं गृहकर्ज
घर घेण्याचं स्वप्न होणार साकार! RBI न घेतला मोठा निर्णय, ग्रामीण बँका आता ग्राहकांना देणार 3 कोटी रुपयांचं गृहकर्ज

व्हिडीओ

Sunil Tatkare vs Prashant Kishor Sunetra Pawar ; 'पीकें'ची अट राष्ट्रवादीत 'तट'? Special Report
Eknath Shinde and Shiv Sena MP Meet PM Modi :फुटीरांची ओळख परेड,दरे ते दिल्ली A टू Z Special Report
Devendra Fadnavis On Karjmafi : 6 लाख 22 हजार शेतकऱ्यांचं कर्ज माफ; देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?
Sunil Tatkare on Prashant Kishor : प्रशांत किशोर आमच्या पक्षासाठी काम करतात हेच माहिती नाही
Sanjay Raut PC : विधीमंडळ पक्ष फुटला म्हणजे मूळ पक्ष फुटला नाही, कोर्टात व्यक्तिवाद, संजय राऊत UNCUT

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
फेसबुक आणि इन्स्टाग्रामने तरुणांच्या मानसिक आरोग्याची हानी; अमेरिकन कोर्टाने मेटाला 9 हजार कोटींचा दंड ठोठावला, दंडाच्या रक्कमेत तरुणांवर उपचार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
गद्दारांचा मेळा, श्रीमान मोदींना गद्दार खासदारांना फाफडा, ढोकला, जिलेबीची पार्टी द्यायला वेळ पण संसदेत साधं डोकावून जायला वेळ नाही, हा जनतेचा अपमान; संजय राऊतांचा सडकून प्रहार
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
नीट पेपरफोड्यांच्या टोळीचा ओळख लपवण्यासाठी WhatsApp ग्रुपला ‘FIFA World Cup 2026’ नाव अन् ‘कैलाश-शिवालिक’ कोड
Mecca Defence Pact: पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
पाकिस्तान, सौदी अरेबिया अन् तुर्कीची संरक्षण करारावर स्वाक्षरी; एकावरचा हल्ला तिघांवर मानला जाणार! संयुक्त प्रशिक्षण, सुरक्षा सहकार्य वाढणार, भारताची किती डोकेदुखी वाढली?
Maratha Reservation: अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
अपवादात्मक परिस्थितीत 50 टक्क्यांची मर्यादा ओलांडता येते; मराठा आरक्षणाच्या समर्थनार्थ राज्य सरकारचा मोठा युक्तिवाद, न्यायालयात नेमकं काय घडलं?
Mumbai High Court On FDA: तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
तुम्ही डास मारण्यासाठी तलवारीचा वापर करताय; मुंबई उच्च न्यायालयाच्या FDAला कानपिचक्या, पुन्हा काय घडलं?
Thailand Crime: नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
नववीच्या विद्यार्थ्याचे भयंकर कृत्य, आधी घरात आजी-आजोबा, नंतर शाळेत अंदाधुंद गोळीबार; 8 जणांचा दुर्दैवी अंत, 15 जखमी
Ramandeep Singh Married to Charlie Chauhan : भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
भारतीय क्रिकेटरने गुपचूप केलं लग्न, 7 वर्षांनी मोठ्या अभिनेत्रीशी बांधली लग्नगाठ; अर्शदीप सिंगने शेअर केला फोटो, कोण आहे 'ती'?
Embed widget