एक्स्प्लोर

Mumbai Metro : महाविकास  आघाडीमध्ये कोणतीही धुसफूस नाही,नाराजीच्या प्रश्नावर  मुख्यमंत्र्यांचे उत्तर

गुढीपाडव्याला मुंबईकरांना मोठी भेट मिळणार आहे. थोड्याच वेळात मेट्रो 2 अ, मेट्रो 7 चं मुख्यमंत्र्याच्या हस्ते उद्घाटन होणार आहे.

Key Events
Maharashtra Mumbai Metro Live Update inauguration Mumbai Metro : महाविकास  आघाडीमध्ये कोणतीही धुसफूस नाही,नाराजीच्या प्रश्नावर  मुख्यमंत्र्यांचे उत्तर
Metro

Background

Mumbai Metro 7 And Mumbai Metro 2A : गुढीपाडव्याला मुंबईकरांना मोठी भेट मिळणार आहे. बहुप्रतिक्षीत मुंबई मेट्रो 7 आणि मेट्रो 2A या मेट्रो रेल्वेचे आज गुढीपाडव्याच्या दिवशी उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. मेट्रो सुरू झाल्यास मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. मात्र मेट्रो मार्गांच्या उद्धाटनाआधीच शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. कारण मुंबई मेट्रो उद्घाटनाच्या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना निमंत्रण देण्यात आलेलं नाही. 

पहिल्या टप्प्यामध्ये 20 किलोमीटर मार्गावरील वाहतूक सुरू
मेट्रो 7 आणि 2A या मार्गावर एकत्रिपणे पहिल्या टप्प्यामध्ये 20 किलोमीटर मार्गावरील वाहतूक सुरू होणार आहे. त्यानंतर या मार्गाच्या दुसऱ्या टप्प्यात 15 किमी मार्गावर मेट्रो चालवण्यात येणार आहे. अद्यापही काही मेट्रो स्थानकावरील कामे अपूर्ण आहेत. ही कामे आणि आवश्यक परवानगी मिळाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील मेट्रो धावणार आहे. मुंबई 'मेट्रो 7' च्या तिकिटाचे किमान दर 10 रुपये असणार असून कमाल दर 80 रुपये असणार आहेत. 

शिवसेना-भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई 
मेट्रोच्या उद्घाटनाआधीच श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. भाजपच्या वतीने मुंबईत अनेक ठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे फोटो असून 'काम केलंय मुंबईने पाहिलंय' असं लिहिण्यात आलं आहे. भाजप-शिवसेना काळात सुरू झालं होतं मेट्रोच्या कामाला भाजपनं गती दिली आणि अंतीम टप्प्याकडे नेलं असा दावा भाजपकडून करण्यात येतोय.

मेट्रो 2 अ' मार्ग असा असणार

'मेट्रो 2 अ' हा  18.5 किमी लांबीचा आहे. दहिसर पश्चिम ते डीएन नगर स्थानकापर्यंत 'मेट्रो 2 अ' मार्ग असणार आहे. या मार्गात दहिसर पूर्व, अप्पर दहिसर, कांदरपाडा, मंडपेश्वर, एकसर, बोरिवली (पश्चिम), शिंपोली, कांदिवली (पश्चिम), धनुकरवाडी, वलणई, मालाड (पश्चिम), लोअर मालाड, पहाडी गोरेगाव, गोरेगाव (पश्चिम), ओशिवरा, लोअर ओशिवरा आणि डीएन नगर अशी स्थानके असणार आहेत. 

'मेट्रो-7' मार्गावरील स्थानके 

मेट्रो-7 मार्गावर 14 स्थानके असणार आहेत. दहिसर पूर्व, ओवरीपाडा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, देवीपाडा, मागाठाणे, पोईसर, आकुर्ली, कुरार, दिंडोशी, आरे , गोरेगाव पूर्व (महानंद डेअरी), जोगेश्वरी पूर्व (जेव्हीएलआर जंक्शन), शंकरवाडी, गुंदवली (अंधेरी पूर्व) या स्थानकांचा समावेश आहे.  

18:38 PM (IST)  •  02 Apr 2022

महाविकास  आघाडीमध्ये कोणतीही धुसफूस नाही,नाराजीच्या प्रश्नावर  मुख्यमंत्र्यांचे उत्तर

गेल्या 60 वर्षात मुंबई बदलली आहे. मुंबईत गर्दी प्रचंड वाढली आहे.  कोरोनानंतर काहींना वेगळा जडला आहे. मेट्रो श्रेयवादावरून भाजपवर टीका केली आहे.  महाविकास  आघाडीमध्ये कोणतीही धुसफूस नाही, नाराजीच्या प्रश्नावर  मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले आहे.

18:33 PM (IST)  •  02 Apr 2022

Uddhav Thackeray : मी मास्क घालतोय तोपर्यंत तुम्ही देखील मास्क घालावा

Uddhav Thackeray : आज निर्बंधमुक्तीचा पहिला दिवस आहे.  मी मास्क घालतोय तोपर्यंत तुम्ही देखील मास्क घाला. 

Load More
New Update
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Nawab Malik: भाऊ, बहीण आणि सूनेला तिकीट, नवाब मलिकांच्या एका घरात तिघांना उमेदवारी, भाजपच्या नाकावर टिच्चून दादांची खेळी!
भाऊ, बहीण आणि सूनेला तिकीट, नवाब मलिकांच्या एका घरात तिघांना उमेदवारी, भाजपच्या नाकावर टिच्चून दादांची खेळी!
मुंबई महापालिकेसाठी राष्ट्रवादीची 100 जणांची यादी, घरातील तिघांना उमेदवारी; सना मलिक यांनी सगळंच सांगितलं
मुंबई महापालिकेसाठी राष्ट्रवादीची 100 जणांची यादी, घरातील तिघांना उमेदवारी; सना मलिक यांनी सगळंच सांगितलं
Krishnaraaj Mahadik: कोल्हापुरात भाजपची यादी येण्यापूर्वीच कृष्णराज महाडिकांचा उमेदवारी अर्ज दाखल; म्हणाले, निवडणूक मी माझ्या स्वतःच्या ताकदीवर लढवणार
कोल्हापुरात भाजपची यादी येण्यापूर्वीच कृष्णराज महाडिकांचा उमेदवारी अर्ज दाखल; म्हणाले, निवडणूक मी माझ्या स्वतःच्या ताकदीवर लढवणार
पुण्याचा गुंड बंडू आंदेकर निवडणुकीच्या मैदानात; घोषणाबाजी करत अर्ज भरला, कोणत्या पक्षातून लढणार?
पुण्याचा गुंड बंडू आंदेकर निवडणुकीच्या मैदानात; घोषणाबाजी करत अर्ज भरला, कोणत्या पक्षातून लढणार?

व्हिडीओ

Sunil Tatkare On Alliance : मुंबईत राष्ट्रवादी युतीसोबत लढणार? तटकरे म्हणाले...
Bandu Andekar File Nomination : पुण्यातील कुख्यात गुंड बंडू आंदेकर आज उमेदवारी अर्ज भरणार
Narendra Bhondekar Bhandara : पत्नीचा पराभव, आमदार भोंडेकरांनी मागितली भंडाराकरांची माफी
Sanjay Raut Full PC : भाजपला ठाण्यात यावेळी शिंदेंचा पराभव करायचा आहे, राऊतांचा आरोप
Ajit Pawar Amol Kolhe Meeting : अजित पवार आणि खासदार अमोल कोल्हे यांच्यात बैठक, ठरलं काय?

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Nawab Malik: भाऊ, बहीण आणि सूनेला तिकीट, नवाब मलिकांच्या एका घरात तिघांना उमेदवारी, भाजपच्या नाकावर टिच्चून दादांची खेळी!
भाऊ, बहीण आणि सूनेला तिकीट, नवाब मलिकांच्या एका घरात तिघांना उमेदवारी, भाजपच्या नाकावर टिच्चून दादांची खेळी!
मुंबई महापालिकेसाठी राष्ट्रवादीची 100 जणांची यादी, घरातील तिघांना उमेदवारी; सना मलिक यांनी सगळंच सांगितलं
मुंबई महापालिकेसाठी राष्ट्रवादीची 100 जणांची यादी, घरातील तिघांना उमेदवारी; सना मलिक यांनी सगळंच सांगितलं
Krishnaraaj Mahadik: कोल्हापुरात भाजपची यादी येण्यापूर्वीच कृष्णराज महाडिकांचा उमेदवारी अर्ज दाखल; म्हणाले, निवडणूक मी माझ्या स्वतःच्या ताकदीवर लढवणार
कोल्हापुरात भाजपची यादी येण्यापूर्वीच कृष्णराज महाडिकांचा उमेदवारी अर्ज दाखल; म्हणाले, निवडणूक मी माझ्या स्वतःच्या ताकदीवर लढवणार
पुण्याचा गुंड बंडू आंदेकर निवडणुकीच्या मैदानात; घोषणाबाजी करत अर्ज भरला, कोणत्या पक्षातून लढणार?
पुण्याचा गुंड बंडू आंदेकर निवडणुकीच्या मैदानात; घोषणाबाजी करत अर्ज भरला, कोणत्या पक्षातून लढणार?
मोठी बातमी! पुण्यातील भिमाशंकर मंदिर तीन महिन्यांसाठी बंद, 'या' कारणामुळे भाविकांना परिसरात प्रवेश बंदी
मोठी बातमी! पुण्यातील भिमाशंकर मंदिर तीन महिन्यांसाठी बंद, 'या' कारणामुळे भाविकांना परिसरात प्रवेश बंदी
मोठी बातमी : KDMC मध्ये मनसेकडून AB फॉर्मचे वाटप, 112 पैकी 50 जागांवर तयारी, ठाकरेंच्या सेनेला किती जागा?
मोठी बातमी : KDMC मध्ये मनसेकडून AB फॉर्मचे वाटप, 112 पैकी 50 जागांवर तयारी, ठाकरेंच्या सेनेला किती जागा?
सोलापुरात 'त्या' पक्षात गेलेल्यांचा प्रचार करू, सुभाष देशमुखांची भूमिका; जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया
सोलापुरात 'त्या' पक्षात गेलेल्यांचा प्रचार करू, सुभाष देशमुखांची भूमिका; जयकुमार गोरेंची प्रतिक्रिया
कोल्हापूर : आजरा शहरात भीषण आगीत 7 चारचाकींसह अनेक दुकाने जळून खाक; व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान
कोल्हापूर : आजरा शहरात भीषण आगीत 7 चारचाकींसह अनेक दुकाने जळून खाक; व्यापाऱ्यांचे कोट्यवधींचे नुकसान
Embed widget