स्मार्ट बुलेटिन | 10 नोव्हेंबर 2021 | बुधवार | एबीपी माझा
एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1.संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा, 376 कर्मचारी निलंबित, दुपारी परिवहन मंत्र्यांसोबत महत्त्वाची बैठक, तर संपकऱ्यांचा मंत्रालयावर मोर्चा
ST Workers Strike : जिथे रस्ता तिथे एसटी अशी ओळख असणाऱ्या लालपरीला मागील काही दिवसांपासून ब्रेक लागलाय. एसटी कर्मचाऱ्यांना राज्य सरकारच्या सेवेत सामावून घ्यावं या प्रमुख मागणीसाठी एसटी कर्मचाऱ्यांनी हे काम बंद आंदोलन सुरु केलं आहे. कर्मचारी संपावर ठाम असल्यानं आज तिसऱ्या दिवशीही एसटी (ST Workers Strike) रस्त्यावर येण्याची शक्यता नाही. याऊलट संप अधिक चिघळणार असल्याचं दिसतयं. आज एसटी कर्मचाऱ्यांचा मंत्रालयावर मोर्चा निघणारआहे. यासाठी राज्यभरातून एसटी कामगार मुंबईत दाखल होत आहेत. एसटी कामगारी आपल्या मागण्यांसाठी भाजपच्या नेतृत्त्वात आज मंत्रालयाच्या दारात ठिय्या आंदोलन करणार आहेत. भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांच्या नेतृत्त्वात हा मोर्चा मंत्रालयावर धडकणार आहे. गोपीचंद पडळकर यांनी सोशल मीडियावर एक व्हिडिओ पोस्ट केला असून त्याद्वारे एसटी कामगारांना दीर्घ लढाईचं आवाहन केलं आहे.
2. पहिल्या टप्प्यातील 2 हजार 88 प्राध्यापक आणि प्राचार्यांच्या भरतीला हिरवा कंदील, महाविद्यालयातील रिक्त पदं भरणार
3. महागाईत होरपळणाऱ्या जनतेच्या खिशाला नवीन भार, औषधंही महागली, हृदयरोग, मधुमेह, खोकल्यावरच्या औषधांच्या किंमतीत 15 ते 20 टक्क्यांची वाढ
4. पेट्रोल-डिझेल आणि गॅस हवा असेल तर किमान कोरोना प्रतिबंधक लशीचा पहिला डोस अनिवार्य, औरंगाबाद जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय
5. फडणवीसांचं अंडरवर्ल्ड कनेक्शन उजेडात आणणारा हायड्रोजन बॉम्ब फोडणार, नवाब मलिकांचा इशारा, तर अमृता फडणवीसांकडून मलिकांवर ट्विटर बॉम्ब
6. मुंबईच्या समुद्र किनारी, तलावांवर छटपूजेस बंदी, शिवसेनेकडून कृत्रिम तलावांची सोय
7. अहमदनगर जिल्हा रुग्णालय आगप्रकरणी चार जणांना अटक, ICUमध्ये आग लागून 11 रुग्णांचा झाला होता मृत्यू
अहमदनगर जिल्हा रुग्णालय आगप्रकरणी जिल्हा शल्यचिकित्सक, वैद्यकीय अधिकाऱ्यांसह चौघांना पोलिसांनी अटक केली आहे. एक वैद्यकीय अधिकारी आणि तीन परिचारिका यांना पोलिसांनी अटक केली आहे. 6 नोव्हेंबर रोजी अहमदनगर येथील जिल्हा रुग्णालयाच्या ICU विभागाला आग लागल्याने 11 रुग्णांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी तोफखाना पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.
8. व्हॉईस अॅडमिरल आर हरी कुमार नौदलाचे नवे प्रमुख, 30 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार
9. विराटनंतर रोहित शर्मा टीम इंडियाचा नवा टी 20 कर्णधार; न्यूझीलंडविरुद्ध भारतीय संघाची घोषणा, विराटला विश्रांती तर महाराष्ट्राच्या ऋतुराज गायकवाडला संधी
10. विश्वचषक टी 20 स्पर्धेचा उपांत्य सामना आज, अबुधाबीमध्ये इंग्लंड-न्यूझीलंड भिडणार