(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Breaking News LIVE Updates : महाराष्ट्रातले काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांची पंजाबमध्ये सह प्रभारी म्हणून नियुक्ती
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये.
LIVE
Background
एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरूच, आतापर्यंत 918 जणांवर निलंबनाची कारवाई
एसटी महामंडळाकडून काल 376 आज 542 अशी आतापर्यंत 918 जणावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.
शुक्रवारी मुख्यमंत्री ठाकरेंवर मान आणि पाठीच्या कण्याची शस्त्रक्रिया, बुधवारी रुग्णालयात दाखल
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शुक्रवारी मान आणि पाठीच्या कण्याची शस्त्रक्रिया होण्याची शक्यता आहे. त्यासाठी त्यांना बुधवारी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
नवाब मलिकांच्या विरोधात भाजप युवा मोर्चाचे मंत्रालयाबाहेर आंदोलन सुरु
गेल्या काही दिवसांपासून नवाब मलिकांनी भाजप नेते आणि एनसीबीविरोधात आरोप करायला सुरुवात केली आहे. त्याच्या निषेधार्थ भाजप युवा मोर्चाच्या वतीनं मंत्रालयाबाहेर आंदोलन सुरु केलं आहे.
फडणवीस सरकारच्या काळातील ऊर्जा विभागातील 6500 कोटींच्या कामांची चौकशी करण्याचे उर्जामंत्री नितीन राऊतांचे आदेश
फडणवीस सरकारच्या काळातील ऊर्जा विभागातील ६५०० कोटींच्या कामांची चौकशी करण्याचे उर्जामंत्री नितीन राऊतांचे आदेश
२०१४ ते २०१९ या काळात पायाभूत सुविधांकरता करता ६५०० कोटी रुपयांची कामे हाती घेण्यात आली होती...
मात्र, पुन्हा २०२० मध्ये विवीध ठिकाणच्या आमदारांकडून आलेल्या मागणीनुसार पुन्हा २३०० कोटींची कामे करावी लागत आहेत...
२०१४ ते २०१९ या काळात झालेल्या पायाभूत सुविधा विकासांच्या कामांची तपासणी करण्यासाठी चौकशी समिती नेमण्याचा निर्णय ऊर्जा विभागाने घेतला आहे.
आधीच ६५०० कोटी रुपयांची कामे झालेली असताना पुन्हा त्याच पद्धतीची कामे का येत आहेत, याची चाचपणी करण्याचा आदेश ऊर्जामंत्री नितीन राऊत यांनी अधिकाऱ्यांना दिला...
जलयुक्त शिवार योजनेची चौकशी सुरू असताना फडणवीस सरकारच्या काळातील विद्युत यंत्रणेच्या ६५०० कोटी रुपयांच्या कामांची चौकशी आता लागल्याने सरकार आणि भाजप यांच्यातील संघर्ष पेटणार आहे...
पहिल्या टप्प्यातील 2 हजार 88 प्राध्यापक आणि प्राचार्यांच्या भरतीला हिरवा कंदील
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली प्राध्यापकांच्या पहिल्या टप्यातील भरतीचा मार्ग मोकळा झाला आहे. पहिल्या टप्यात 2088 प्राध्यापक भरतीला आणि सर्व प्राचार्य पद भरण्यास मान्यता देण्यात आली आहे. राज्यातील महाविद्यालयातील रिक्त पदे भरण्यात यावे यासाठी मागील काही वर्षांपासून प्राध्यापक संघटना मागणी करत होत्या. अनेकदा प्राध्यापक भरती व्हावी यासाठी संघटनांकडून आंदोलने देखील करण्यात आली. त्यानंतर आता टप्याटप्याने ही रिक्त पदे भरली जाणार आहेत. उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी ट्विटरवरून प्राध्यापक भरती बाबत माहिती दिली आहे.
महाराष्ट्रातले काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांची पंजाबमध्ये सह प्रभारी म्हणून नियुक्ती
महाराष्ट्रातले काँग्रेस नेते हर्षवर्धन सपकाळ यांची पंजाबमध्ये सह प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वी राजस्थानचे मंत्री हरीश चौधरी यांची पंजाबचे प्रभारी नेमले गेले आहेत. त्यांच्या सोबतीला दोन सहप्रभारी पंजाबमधली सत्ता राखणं काँग्रेससमोरचं मोठे आव्हान असणार आहे
परमबीर सिंह यांच्या विरोधात रेड कॉर्नर नोटिस जारी करण्याची प्रक्रिया सुरु
गेल्या काही दिवसांपासून गायब असलेल्या मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांच्याविरोधात रेड कॉर्नर नोटिस जारी करण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. तसा पत्रव्यवहार सीआयडीने केंद्रीय गृहमंत्रालयासोबत सुरु केला आहे. ते देशाबाहेर जाऊ नयेत यासाठी ही नोटिस बजावण्यात येणार आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर उद्या सकाळी शस्त्रक्रिया होणार
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर उद्या सकाळी 7 ते 8 च्या दरम्यान HN रिलायन्स हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रिया होणार आहे. जेष्ठ आर्थो सर्जन डॉक्टर शेखर भोजराज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करणार आहेत.
लातूरमध्ये वैद्यकीय महाविद्यालयातील शिशू अतिदक्षता विभागात शॉर्ट सर्किट
लातूरमधील विलासराव देशमुख महाविद्यालयातील शिशू अतिदक्षता विभागात शॉर्ट सर्किटमुळे आग लागली आहे. नवजात बालकांना तातडीने सुरक्षित स्थळी हालवण्यात येत आहे.
सावंतवाडी नगरपरीषदेची सभेत सेना-भाजप नगरसेवकां मध्ये बाचाबाची
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी नगरपरिषदेच्या बैठकीत राडा पाहायला मिळाला. या बैठकीदरम्यान शिवसेना आणि भाजप नगरसेवक भिडले. बरं एवढ्यावरच ते शांत झाले नाहीत, तर एकमेकांच्या अंगावर धावून गेले. राज्यात शिवसेना भाजपचा सध्या जोरदार संघर्ष सुरु आहे. पण हा संघर्ष आता अगदी तालुका पातळीवर जाऊन पोहोचलाय. जिओ केबल टाकण्यासाठी शहरात खोदलेले खड्डे, काही वार्डात कमी दाबाने होणारा पाणी पुरवठा आणि सांडपाण्याचा प्रश्न आदी अनेक विषयावर नगराध्यक्ष संजू परब यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आलेल्या सावंतवाडी नगरपरिषदेच्या सभेत शिवसेना आणि सत्ताधारी भाजप नगरसेवकांमधे बाचाबाची होऊन नगरसेवक एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचा प्रकार घडला.