एक्स्प्लोर

Maharashtra Breaking News LIVE Updates : भाजप नेते किरीट सोमय्या यांना बीड दौऱ्यापूर्वी धमकी

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये

LIVE

Key Events
Maharashtra Breaking News LIVE Updates : भाजप नेते किरीट सोमय्या यांना बीड दौऱ्यापूर्वी धमकी

Background

आनंदवार्ता! नव्या वर्षात सिडकोच्या पाच हजार घरांसाठी लॉटरी निघणार

परवडणाऱ्या घरांचे स्वप्न पाहणाऱ्या नागरिकांचे नवी मुंबईत घर घेण्याचे स्वप्न पूर्ण होणार आहे. नवी मुंबईत सिडकोच्यावतीने पाच हजार घरांसाठी लॉटरी प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. राज्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी ही माहिती दिली आहे. नवी मुंबईतील कळंबोली, तळोजा आणि द्रोणागिरी आदी ठिकाणी ही घरे असणार आहेत. नवी मुंबईत सिडकोच्यावतीने पाच हजार घरांची ‘महागृहनिर्माण’योजना आहे. या घरकुल योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गट, अल्प उत्पन्न गटांतील नागरिकांकरिता घणसोली, खारघर, कळंबोली, तळोजा आणि द्रोणागिरी येथे घरे उपलब्ध होणार आहेत. या घरांसाठीच्या लॉटरीची प्रक्रिया जानेवारी 2022 पासून सुरू करण्यात येणार असल्याचे नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटले. 

विनामास्क फिरणाऱ्या आमदाराला 200 रुपयांचा दंड, मंत्रालय पोलिसांची कारवाई

राज्यात दिवसागणिक ओमायक्रॉनच्या रुग्णांची संख्या वाढत असतानाही, लोकप्रतिनिधींना त्या वास्तवाचा सोयीस्कर विसर पडत असल्याचं वारंवार दिसून येत आहे. मंत्रालयात बिनधास्तपणे विनामास्क फिरणारे भाजप आमदार मंगेश चव्हाण यांच्यावर तर कारवाई करण्याची वेळ पोलिसांवर आली. मंगेश चव्हाण हे चाळीसगावचे आमदार आहेत. मंत्रालयातून बाहेर पडताना त्यांनी मास्क परिधान केलेला नसल्यामुळं त्यांच्यावर कारवाई करण्यात आली. मंगेश चव्हाण यांना पोलिसांनी 200 रुपयांचा दंड ठोठावला. त्या पार्श्वभूमीवर, आमदारांवर कारवाई करणाऱ्या पोलिसांचं मंत्रालयात कौतुक होत आहे. महाविकास आघाडी महावसुली करत असल्याचा आरोप  मंगेश चव्हाण यांनी केला आहे. दरम्यान, महाराष्ट्रावर ओमायक्रॉनचे संकट दिवसेंदिवस वाढत चालले आहे. राज्यात आता ओमायक्रॉन रुग्णांची संख्या 28 वर पोहोचली आहे. मुंबई, पुणे, पिंपरी चिंचवड, नागपूरमध्ये ओमायक्रॉनचे रुग्ण आढळले आहेत.भारतातील नागरिक आता मास्कचा वापर करणे कमी करत आहेत. खासकरून ज्या लोकांनी कोरोना लसीचे दोन्ही डोस घेतले आहेत त्यांनी मास्कचा वापर करणे कमी केलं आहे. ही गोष्ट चिंताजनक आहे. जगभरातली परिस्थिती पाहून तरी भारतीय लोकांनी कोरोनाच्या नियमांचे पालन करणे आवश्यक असल्याचं निती आयोगाचे सदस्य व्हीके पॉल म्हणाले.

00:04 AM (IST)  •  16 Dec 2021

भाजप नगरसेविका पुत्रावर खंडणी अपहरणचा गुन्हा दाखल

भाजपच्या मुलुंड येथील नगरसेविका रजनी केणी यांच्या मुलांसह तिघांवर नवघर पोलीस ठाण्यात खंडणी आणि अपहरण प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पालिकेच्या एका कंत्राटदराने हा गुन्हा दाखल केला आहे. केणी यांच्या विभागात असलेले एक काम ऑनलाइन टेंडर मध्ये त्या कंत्राटदारला लागले होते. मात्र हे टेंडर त्याने मागे घ्यावे म्हणून केणी यांचा मुलगा नमित केणी याने त्या कंत्राटदारला कार्यालयात बोलावून धमकावले आणि टेंडर मागे घेण्यास सांगितले. त्यानंतर मनोज जाधव आणि गोविंद जाधव यांच्या मदतीने त्याला बळजबरीने पालिका टी विभागात नेण्यात आले आणि तिथे कंत्राटमागे घेण्यास भाग पाडल्याचा आरोप या कंत्राटदारने त्याच्या तक्रारीत केला आहे. या प्रकरणी आता नवघर पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पुढील तपास नवघर पोलीस करीत आहेत.

21:11 PM (IST)  •  15 Dec 2021

अंबरनाथमध्ये पुन्हा एकदा बिबट्याची शिकार, जणांवरांवर हल्ला

अंबरनाथमध्ये पुन्हा एकदा बिबट्यानं शिकार केल्यामुळे घबराट पसरली आहे. अंबरनाथ शहरालगतच्या वसत गाव परिसरात महिनाभरात तिसऱ्यांदा बिबट्याने दर्शन दिलं असून स्थानिक ग्रामस्थांच्या पाळीव प्राण्यांची शिकार केली आहे. त्यामुळे या परिसरात मोठी घबराट पसरली आहे.

21:02 PM (IST)  •  15 Dec 2021

सर्वोच्च न्यायालयाचा ओबीसी आरक्षणाबद्दलचा निर्णय दुर्दैवी - एकनाथ खडसे 

सर्वोच्च न्यायालयाने ओबीसींच्या 27 टक्के आरक्षणाबाबत काढलेला अध्यादेश रद्द केला. यानंतर हा निर्णय अतिश दुर्देवी असून ओबीसीसह इतर मागासवर्गीय समुदायावर अन्याय करणारा आहे. तसंच केंद्र सरकारने इंपेरिकल डाटा न दिल्यामुळे ही स्थिती उद्भवली. आता काहीही करू पण आरक्षण मिळाल्याशिवाय निवडणुका घेऊ नका, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी दिली आहे.

20:45 PM (IST)  •  15 Dec 2021

अमरावती-अकोला एटीएस पथकाकडून 53 किलो गांजा जप्त

अमरावती शहरातील ट्रान्सपोर्ट नगर येथे एटीएस पथकांनी दोघांना गांजा विकताना ताब्यात घेतलं आहे. यावेळी त्यांच्याकडून 53 किलो गांजा ज्याची किंमत साडे पाच लाख रुपये इतकी आहे. अमरावती पोलीसांना याची काहीही कल्पना न देता केलेल्या या कारवाईने शहर पोलिसात चांगलीच चर्चा सुरू आहे.  

20:44 PM (IST)  •  15 Dec 2021

भाजप नेते किरीट सोमय्या यांना बीड दौऱ्याअगोदर मेसेजवर धमकी

भाजप नेते किरीट सोमय्या यांना व्हॉट्सअप मेसेजवर धमकी देण्यात आली आहे. उद्या किरीट सोमय्या हे बीड जिल्हयात जाण्याआधीच त्यांना धमकीचा मेसेज देण्यात आला आहे.  पोलीस अधीक्षक आर राजा यांच्याकडे सोमय्यांनी तक्रार केली आहे.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Raut Full PC : मोदींच्या सभेत फक्त पाच हजार लोकं होती; त्यातील निम्मे भाड्याची माणसंABP Majha Headlines :  9 AM : 15 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सDevendra Fadnavis  : मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही - देवेंद्र फडणवीसRohit Pawar on Kangana Ranaut : रोहित पवारांचा कंगना रणावत यांच्यावर हल्लाबोल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sanjay Raut : देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
देवेंद्र फडणवीस गोंधळलेलं व्यक्तिमत्व, अडीच वर्षांपूर्वीच्या फौजदाराचा शिपाई झालाय; संजय राऊत कडाडले
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
सोयाबीनला 6 हजारांचा हमीभाव देणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आश्वासन!
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
राहुल गांधींनी सुजयला राष्ट्रवादीतून निवडणूक लढण्याचा सल्ला दिला, म्हणून...; राधाकृष्ण विखेंचा 'माझा कट्टा'वर दावा, नेमकं काय म्हणाले?
Pune Crime: क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
क्षुल्लक कारणावरून मारहाण! गार वडापाव दिला म्हणून चिडला, बरणी उचचली अन्..; बाणेर परिसरात गुन्हा दाखल
Devendra Fadnavis: देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट, म्हणाले, 'शरद पवारांच्या पत्रामुळेच महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागली'
त्यावेळी आम्ही शरद पवारांच्या सूचनेनुसार वागत होतो; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक गौप्यस्फोट
Ramdas Kadam: आदित्य ठाकरेंची औकाद काय? पुन्हा सत्ता आल्यावर दिशा सालियन प्रकरणाची चौकशी लावणारच: रामदास कदम
आदित्य ठाकरे तुमची औकाद काय? रामदास कदम संतापाने लालबुंद होत म्हणाले, तुझी चौकशी....
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
मंचावर बसले अन् मध्येच एक लेटर आलं, भर सभेतच म्हणाले 'आय लव्ह यू'; ओवैसींच्या विराट सभेत नेमकं काय घडलं?
Raj Thackeray: रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
रमेश वांजळेंचा मुलगा माझा पुतण्या; मित्राच्या आठवणीने राज ठाकरे भर जाहीर सभेत भावूक, Video
Embed widget