Maharashtra Breaking News LIVE Updates : वाळवा तालुक्याचे माजी आमदार विश्वासराव पाटील यांचे निधन
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
आज राज्यात सार्वजनिक सुट्टी मात्र शेअर मार्केट सुरु राहणार
मुंबई : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (Lata Mangeshkar) यांचे रविवारी निधन झाले. काल त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.भारतीय संगीतक्षेत्रातलं एक महत्वाचं पर्व लतादीदींच्या निधनानं संपलं लता मंगेशकर यांच्या निधनानंतर राष्ट्रीय दुखवटा जाहीर केला आहे. तसेच भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवारी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी ट्वीट करत याबाबतची माहिती दिली. अर्थात सार्वजनिक सुट्टी असली तरी आज बीएससी म्हणजेच बॉम्बे स्टॉक एक्सचेंज सुरु राहणार आहे अशी माहिती BSCकडून देण्यात आली आहे.
भारतरत्न गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांच्या निधनामुळे दुखवटा म्हणून राज्य सरकारने सोमवार सात फेब्रुवारी 2022 रोजी राज्यात सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे. यासंदर्भात काढण्यात आलेल्या अधिसूचनेत म्हटले आहे की, रविवार 6 फेब्रुवारी 2022 रोजी भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले. त्यांच्या निधनामुळे संगीत आणि कला विश्वाची अपरिमित हानी झाली आहे. या महान गायिकेला श्रद्धांजली वाहण्यासाठी, परक्राम्य संलेख अधिनियम, 1881 ( सन 1981चाअधिनियम 26 ) च्या कलम 25 खाली महाराष्ट्र शासनास सोपविण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून सोमवार दिनांक सात फेब्रुवारी रोजी राज्यात दुखवटा म्हणून सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्यात येत आहे, असं शासनानं म्हटलं आहे.
आज राज्यात सार्वजनिक सुट्टी; म्हाडा सरळसेवा भरती परीक्षा होणार, वेळापत्रकात बदल नाही
Mhada Exam : महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणातर्फे (म्हाडा) सरळसेवा भरतीअंतर्गत अतांत्रिक पदासाठी सोमवार, दि. ०७ फेब्रुवारी, २०२२ रोजी आयोजित परीक्षा नियोजित वेळापत्रकानुसारच होणार आहे. 'म्हाडा'चे सचिव राजकुमार सागर यांनी ही दिली.
म्हाडा सरळसेवा भरती प्रक्रियेअंतर्गत अतांत्रिक संवर्गातील सहायक, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक-टंकलेखक या पदांसाठी सरळसेवा भरती परीक्षा सुरू आहे. याआधी नियोजित केलेल्या वेळापत्रकानुसार ही परीक्षा पार पडणार आहे. म्हाडा भरती परीक्षा सोमवार ७ फेब्रुवारी, २०२२ रोजी सकाळी ०९.०० वाजेपासून ते ११.०० वाजेपर्यंत, दुपारी १२.३० वाजेपासून ते २.३० वाजेपर्यंत तर दुपारी ४ वाजेपासून ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत अशा तीन सत्रांत परीक्षा होणार आहे. परीक्षा वेळापत्रकात कोणताही बदल झाला नसल्याची माहिती म्हाडाने दिली असून परीक्षार्थींनी याची नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
म्हाडातील विविध 14 संवर्गातील 565 रिक्त पदांसाठी ही भरती परीक्षा घेण्यात येत आहे. म्हाडाच्या परीक्षेची जबाबदारी टीसीएस कंपनीवर सोपवण्यात आली आहे. टीसीएस कंपनीला विविध परीक्षा घेण्याचा अनुभव आहे. याआधी जीए सॉफ्टवेअर कंपनीकडे परीक्षेची जबाबदारी होती. पण या कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं गोपनीयतेचा भंग करून पेपर फोडण्याचा कट रचल्याचं उघडकीस आलं होतं.
वाळवा तालुक्याचे माजी आमदार विश्वासराव पाटील यांचे निधन
वाळवा तालुक्याचे माजी आमदार विश्वासराव पाटील यांचे निधन झाले आहे. लोकनेते राजारामबापू पाटील यांचे अनुयायी म्हणुन विश्वासराव पाटील अशी त्यांची ओळख होती.
किरीट सोमय्यांना शर्ट काढून मारहाण करणारा शिवसैनिक गजाआड
भाजप नेते किरीट सोमय्या यांच्यासोबत शनिवारी सायंकाळी पुणे महानगरपालिकेत धक्काबुक्की करण्यात आली. या झटापटीत किरीट सोमय्या खाली कोसळले आणि त्यांना गंभीर दुखापत झाली आहे. यावेळी किरीट सोमय्या यांना शर्ट करणाऱ्या शिवसैनिकाला अखेर अटक करण्यात आली. सनी गवते असे अटक करण्यात आलेल्या शिवसैनिकाचे नाव आहे. आज दुपारी या अटक करण्यात आलेल्या शिवसैनिकाला शिवाजीनगर कोर्ट मध्ये हजर करण्यात आलं. कोर्टाने त्याची जामिनावर सुटका केली आहे.
वैभववाडीतील गगनबावडा घाट रस्ता दुरुस्तीच्या कामाची आमदार वैभव नाईक यांच्याकडून पाहणी
तळकोकणातुन कोल्हापूरला जोडणाऱ्या गगनबावडा घाट रस्त्याच्या दुरुस्तीच काम सध्या घाटात सुरू आहे. या कामाचे आमदार वैभव नाईक यांनी भेट देऊन कामाची पाहणी केली. हा रस्ता सुस्थितीत झाल्यास कोकणातील ऊस उत्पादक शेतकऱ्याचा ऊस वाहतूकीचा प्रश्न सुटणार आहे. गगनबावडा घाट आणि करूळ घाट पूर्णपणे खड्डेमय असल्याने कोकणातील ऊस तोडणी लांबणीवर गेली त्यामुळे गगनबावडा घाट रस्ता सुस्थितीत होत असल्याने ऊस उत्पादक शेतकरी आणि कोकणातुन घाटमाथ्यावर जाणाऱ्या चालकांना दिलासादायक बाब आहे.
मोदींनी घेतलेल्या मोठमोठ्या रॅलीमुळे कोरोना पसरला नाही का? प्रियंका गांधींचा सवाल
मोदींनी घेतलेल्या मोठमोठ्या रॅलीमुळे कोरोना पसरला नाही का? प्रियंका गांधींचा सवाल
पंतप्रधान मोदी यांच्या टीकेनंतर नाना पटोलेंकडून पलटवार
देशात कोरोना पसरवण्यासाठी महाराष्ट्र काँग्रेस जबाबदार असल्याची टीका पंतप्रधान मोदी यांनी लोकसभेत बोलताना केली. यावर नाना पटोले यांनी पलटवार करत, 'स्वत:चं अपयश झाकण्याकरता काँग्रेसवर खापर फोडत आहेत. तसंच काँग्रेसनं माणूसकीचं नातं जपलं, लोकांकडे पैसे नव्हते. उलट काँग्रेसनं मदत केली म्हणून शाबासकी दिली पाहिजे. असंही ते म्हणाले आहेत.