एक्स्प्लोर

Jalgaon Crime : चहाच्या दुकानात गोळीबाराचा थरार, अज्ञातांकडून तरुणावर पाच राऊंड फायर, जळगाव हादरलं

Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यातील भुसावळमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. खडका रोड परिसरात एका तरुणाची गोळीबार करून हत्या करण्यात आली आहे.

Jalgaon Crime : गेल्या काही दिवसांपासून राज्यासह जळगाव जिल्ह्यात (Jalgaon Crime News) गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ होताना दिसत आहे. जळगाव जिल्ह्यातील गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासन अपयशी ठरत असून आता भुसावळमध्ये (Bhusawal Firing) एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खडका रोड परिसरात एका तरुणाची गोळीबार करून हत्या करण्यात आली आहे. तहरीन शेख असे या मृताचे नाव आहे. या घटनेमुळे भुसावळमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. 

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ शहरातील खडका रोड परिसरात असलेल्या अमरदीप टॉकीज जवळील चहाच्या दुकानात तीन ते चार अज्ञातांनी तहरीन शेख या तरुणांवर गोळीबार केला. या गोळीबारात तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. 

पाच राऊंड केले फायर 

घटनास्थळी पोलिसांना फायर करण्यात आलेल्या जवळपास पाच गोळ्या आढळल्या असून गोळीबार करणाऱ्या अज्ञातांचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून शोध सुरू असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक अशोक रावते यांनी दिली आहे. तर पूर्व वैमनस्यातून ही हत्या करण्यात आली आहे का? याबाबत चौकशी केली जात असल्याचेही पोलिसांनी म्हटले आहे. या घटनेतील आरोपींना अटक करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. 

गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस काय उपाययोजना करणार?

दरम्यान, भुसावळ शहरात गेल्या काही दिवसांपासून गोळीबाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे पाहायला मिळत आहे. भुसावळमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार, चाकूने हल्ला, असा गंभीर घटना सातत्याने घडत आहे. भुसावळची गुन्हेगारी थांबवण्यात पोलीस प्रशासन अपयशी ठरत आहे का? असा सवाल स्थानिक नागरिकांकडून उपस्थित होत आहे. भुसावळमध्ये गुन्हेगारी थांबवण्यासाठी पोलीस प्रशासन काय उपाययोजना करणार? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. 

गुलाबराव पाटील घेणार जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट 

जळगाव जिल्ह्यात सुरू असलेल्या गोळीबाराबाबत मंत्री गुलाबराव पाटील यांनी भाष्य केले आहे. जिल्ह्यातील गोळीबारांच्या घटनांबाबत जिल्हा पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन चर्चा करणार आहे.  गोळीबाराच्या घटना जिथे घडत आहेत, तिथे कोम्बिंग ऑपरेशन राबवण्याबाबत पोलिसांना सूचना करणार आहे. मध्यप्रदेश जवळ आहे. तिथे कमी किमतीत गावठी पिस्तूल मिळतात. त्या घेऊन अनेक तरुण वाम मार्गाला जात आहेत.  जे कोणी गोळीबाराचे आरोपी असतील त्यांच्यावर कडक कारवाई करण्याच्या सूचना पोलिसांना देणार असल्याचे गुलाबराव पाटील यांनी म्हटले आहे. 

आणखी वाचा 

Jalgaon Crime : जळगावातील 'त्या' हॉटेलमध्ये पोलिसांनी डमी गिऱ्हाईक पाठवला अन् वेश्या व्यवसायाचं बिंग फुटलं, नेमकं काय घडलं?

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

गुलाबराव देवकर साधू नाही, तर घरकुल खाऊन उभा झालेला माणूस; त्यांना मी सोडणार नाही! मंत्री गुलाबराव पाटलांचा इशारा
गुलाबराव देवकर साधू नाही, तर घरकुल खाऊन उभा झालेला माणूस; त्यांना मी सोडणार नाही! मंत्री गुलाबराव पाटलांचा इशारा
Jalgaon Crime : चहाच्या दुकानात गोळीबाराचा थरार, अज्ञातांकडून तरुणावर पाच राऊंड फायर, जळगाव हादरलं
चहाच्या दुकानात गोळीबाराचा थरार, अज्ञातांकडून तरुणावर पाच राऊंड फायर, जळगाव हादरलं
2025 मध्ये सोन्याचे भाव वाढणार की कमी होणार? काय आहे जगातील आर्थिक आणि राजकीय स्थिती? 
2025 मध्ये सोन्याचे भाव वाढणार की कमी होणार? काय आहे जगातील आर्थिक आणि राजकीय स्थिती? 
Ravichandran Ashwin on Hindi : अश्विन अण्णा रिटायर्ड होताच हिंदी भाषेवर बोलला; काश्मीर ते कन्याकुमारी चर्चा रंगली, सोशल मीडियावर वादाला तोंड!
Video : अश्विन अण्णा रिटायर्ड होताच हिंदी भाषेवर बोलला; काश्मीर ते कन्याकुमारी चर्चा रंगली, सोशल मीडियावरही वादाला तोंड!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Santosh Deshmukh Case:Vishnu Chate च्या मोबाईवरून Walmik Karad ने खंडणी मागितली?आवाजाचे सॅम्पल घेणारSanjay Raut PC : मविआतील तिन्ही पक्षात समन्वय राहिला नाही हे सत्य : संजय राऊतJalnaगुन्हेगाराला शिक्षा व्हावी ही अपेक्षा Dhananjay Deshmukh;जनआक्रोश मोर्चासाठी देशमुख कुटुंब दाखलMumbai Torres Fraud : 6 महिन्यांपूर्वीच तक्रार करुन देखील 'टोरेस'वर कारवाई का नाही याची चौकशी करणार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
गुलाबराव देवकर साधू नाही, तर घरकुल खाऊन उभा झालेला माणूस; त्यांना मी सोडणार नाही! मंत्री गुलाबराव पाटलांचा इशारा
गुलाबराव देवकर साधू नाही, तर घरकुल खाऊन उभा झालेला माणूस; त्यांना मी सोडणार नाही! मंत्री गुलाबराव पाटलांचा इशारा
Jalgaon Crime : चहाच्या दुकानात गोळीबाराचा थरार, अज्ञातांकडून तरुणावर पाच राऊंड फायर, जळगाव हादरलं
चहाच्या दुकानात गोळीबाराचा थरार, अज्ञातांकडून तरुणावर पाच राऊंड फायर, जळगाव हादरलं
2025 मध्ये सोन्याचे भाव वाढणार की कमी होणार? काय आहे जगातील आर्थिक आणि राजकीय स्थिती? 
2025 मध्ये सोन्याचे भाव वाढणार की कमी होणार? काय आहे जगातील आर्थिक आणि राजकीय स्थिती? 
Ravichandran Ashwin on Hindi : अश्विन अण्णा रिटायर्ड होताच हिंदी भाषेवर बोलला; काश्मीर ते कन्याकुमारी चर्चा रंगली, सोशल मीडियावर वादाला तोंड!
Video : अश्विन अण्णा रिटायर्ड होताच हिंदी भाषेवर बोलला; काश्मीर ते कन्याकुमारी चर्चा रंगली, सोशल मीडियावरही वादाला तोंड!
Aaditya Thackeray Viral Video: तळघरातून बारबाला बाहेर पडतानाचा व्हिडीओ व्हायरल, आदित्य ठाकरेंच्या मालकीचा कॅफे असल्याचा दावा, सेनेची तक्रार
तळघरातून बारबाला बाहेर पडतानाचा व्हिडीओ व्हायरल, आदित्य ठाकरेंच्या मालकीचा कॅफे असल्याचा दावा, सेनेची तक्रार
एकाच कुटुंबातील 5 जणांची गळा चिरून हत्या; पती-पत्नीचा मृतदेह चादरीमध्ये, 3 मुली बेड बाॅक्समध्ये सापडल्या
एकाच कुटुंबातील 5 जणांची गळा चिरून हत्या; पती-पत्नीचा मृतदेह चादरीमध्ये, 3 मुली बेड बाॅक्समध्ये सापडल्या
Sanjay Raut : विधानसभेच्या पराभवानंतर मविआत खटके उडायला सुरुवात, संजय राऊत म्हणाले, चुकीच्या पद्धतीने...
विधानसभेच्या पराभवानंतर मविआत खटके उडायला सुरुवात, संजय राऊत म्हणाले, चुकीच्या पद्धतीने...
Chandrapur : मुख्यमंत्र्यांच्या चंद्रपूर दौऱ्यात राजकीय नाराजीनाट्य; विजय वडेट्टीवारांना मानाचे पान;सुधीर मुनगंटीवार नाराज?
मुख्यमंत्र्यांच्या चंद्रपूर दौऱ्यात राजकीय नाराजीनाट्य; विजय वडेट्टीवारांना मानाचे पान;सुधीर मुनगंटीवार नाराज?
Embed widget