एक्स्प्लोर

Maharashtra Breaking News 31 May 2022 : देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra Breaking News 31 May 2022 : देश-विदेशातील महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा एका क्लिकवर...

Background

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी. या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू.

निवडणूक आयोगाकडून निवडणुकांची तयारी, आज अखेर ओबीसी आरक्षणाशिवायच 14 महापालिकांची आरक्षण सोडत 
 
आज राज्यातल्या 14 महापालिकांची आरक्षण सोडत निघणार आहे. यामध्ये मुंबई, ठाणे, नवी मुंबई, कल्याण- डोंबिवली, उल्हासनगर, वसई विरार, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, कोल्हापूर, सोलापूर, नागपूर, अकोला, अमरावती या महापालिकांचा समावेश आहे. 
 
हनुमान जन्मस्थान वादावर तोडगा काढण्यासाठी नाशिकमध्ये प्राथमिक शास्त्रार्थ सभेचे आयोजन

हनुमानाचं जन्मस्थान नाशकातलं अंजनेरी नव्हे तर किष्किंधा असल्याचा दावा मठाधिपती गोविंदानंद सरस्वती यांनी केलाय. त्यामुळे, वाद सुरु झालाय. हा वाद सोडवण्यासाठी नाशिकमध्ये आज शास्त्रार्थ सभेचं आयोजन करण्यात आलंय.  देशभरातील विविध धर्म पिठाचे 25 ते 30 प्रतिनिधी आणि पिठाधिश्वर या सभेला उपस्थित राहणार आहेत. मठाधिपती गोविंदानंदांचा हा दावा उद्या खोडला जाणार का याकडे हनुमान भक्तांचे लक्ष लागलंय, सकाळी 11 वाजता सभेला सुरवात होणार आहे.  

ऑल इंडिया पेट्रोल पंप असोसिएशनकडून केंद्र सरकारचा निषेध

केंद्र सरकारनं इंधन दरावरील करकपात केल्यानंतर इंधनाचे दर कमी झाले होते. मात्र, त्यामुळे डीलर कमिशन वाढवून देण्याची पेट्रोल पंपधारकांची मागणी केली जात आहे.  मात्र, पेट्रोल पंप सुस्थितीत सुरु राहणार, पेट्रोल-डिझेलची विक्री पंपांवर सुरुच राहणार असल्याची माहिती असोसिएशनकडून देण्यात आली आहे. पेट्रोल पंप बंद राहण्याच्या अफवेमुळे सोलापुरातील पेट्रोल पंपांवर मोठी गर्दी झाली होती.

अविनाश भोसलेंच्या रिमांडवरील युक्तिवाद पूर्ण, आज निर्णय येणार

मुंबई सत्र न्यायालयातील विशेष सीबीआय कोर्टानं काल आपला निकाल राखून ठेवला. न्यायाधीश डी.पी. शिंगाडे आज निर्णय देणार आहेत.

मोदींच्या ऑनलाईन उपस्थितीत गरीब कल्याण संमेलनाचे आयोजन

 पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मार्गदर्शनात भाजपच्या वतीनं 'आझादी का अमृतमहोत्सव' या उपक्रमांतर्गत 'गरीब कल्याण' संमेलनाचे आयोजन करण्यात येत आहे. संमेलनात पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे संवाद साधणार आहेत. संमेलनात विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, वाणिज्य व व्यापार मंत्री पियुष गोयल, केंद्रीय पंचायत राज राज्यमंत्री कपिल पाटील मार्गदर्शन करणार आहेत

राज्यसभेसाठी उमेदवारी दाखल करण्यासाठी आज शेवटचा दिवस

राज्यसभेसाठी उमेदवारी दाखल करण्यासाठी आज शेवटची तारीख आहे. 3 जून पर्यंत अर्ज परत घेता येणार आहे. राज्यसभेसाठी 10 जूनला होणार आहे

जागतिक तंबाखूसेवन विरोधी दिन

हा दिवस 31 मे रोजी पाळण्याचा उद्देश हा की जगभर हानिकारक तंबाखूचे दुष्परिणाम पोहोचावेत आणि लोकांनी हे व्यसन सोडावे. जागतिक आरोग्य संघटनेने हा दिवस साजरा करण्याचे ठरवले आणि चर्चेअंती त्यांनी 1987 साली यावर अंतिम ठराव संमत केला. जागतिक आरोग्य संघटनेने 1988 सालापासून दरवर्षी 7 एप्रिल रोजी 'वर्ल्ड नो टोबॅको डे' पाळला जाईल अशी घोषणा केली, या तारखेला जागतिक आरोग्य संघटनेला 40 वर्षे पूर्ण होत होती म्हणून हा दिवस ठरविण्यात आला.

आज इतिहासात 

1990 : नेल्सन मंडेला यांना लेनिन आंतरराष्ट्रीय शांतता पुरस्कार जाहीर

1725 : महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा जन्म.

1994 : बनारस घराण्यातील प्रसिद्ध तबला वादक पंडित समता प्रसाद यांचे निधन

21:18 PM (IST)  •  31 May 2022

रूपाली पाटील यांची राष्ट्रवादीच्या पुणे शहर उपाध्यक्ष पदी निवड 

रूपाली पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेसच्या पुणे शहर उपाध्यक्ष पदी निवड झाली आहे. काही महिन्यापूर्वी रूपाली पाटील यांनी मनसेला जय महाराष्ट्र करत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता. 

20:31 PM (IST)  •  31 May 2022

Solapur news Update : बार्शी शहर आणि परिसरात तुफान वाऱ्यासह पाऊस

बार्शी शहर आणि परिसरात तुफान वाऱ्यासह पाऊस झालाय. वादळी वारा आणि तुफान पावसामुळे बागायतदार शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. कारण या पावसामुळे फळं पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची शक्यता आहे. बार्शीतील तेलगिरणी चौकात कडुनिंबाचे मोठे झाड पडल्याने दुचाकी आणि कारचे नुकसान झाले आहे. 

18:21 PM (IST)  •  31 May 2022

Aurangabad: चार वर्षीय मुलीसह महिलेची विहिरीत उडी मारून आत्महत्या

औरंगाबाद: पैठण तालुक्यातील कारकीन शिवारात घरगुती कारणावरून 30 वर्षीय महिलने स्वतःच्या शेतात असलेल्या विहीरीत 4 वर्षाच्या लहान बाळासह आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.घटनास्थळी पैठण एमआयडीसी पोलीस दाखल झाले असून, मृतदेह विहिरीच्या बाहेर काढण्यात आले. घटनेची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. 

18:15 PM (IST)  •  31 May 2022

औरंगाबादच्या वैजापूर तालुक्यात जोरदार पाऊस

औरंगाबादच्या वैजापूर शहरात वादळी वाऱ्यासह पावसाने जोरदार हजेरी लावली. सुमारे अर्धा तास सुरु असलेल्या पावसाने वैजापूर शहराला चांगलेच झोडपून काढले. मान्सूनपूर्व पावसाच्या आगमनाने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण पाहायला मिळत आहे. 

17:23 PM (IST)  •  31 May 2022

Hingoli: हिंगोलीत मान्सूनपूर्व पावसाला सुरूवात

हिंगोली शहरांमध्ये आज मान्सूनपूर्व पावसाला सुरुवात झाली आहे. दुपारच्या वेळी अचानक पावसाच्या सरी बरसल्याने उकाड्याने त्रस्त असणाऱ्या हिंगोलीकरांना काहीसा दिलासा मिळाला आहे. अचानक सुरू झालेल्या पावसामुळे मात्र हिंगोली शहरांमध्ये नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली होती. जोरदार झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी सखल भागात पाणी सुद्धा साचले होते. पाऊस लवकर पडणाऱ्या अपेक्षेने शेतकरी राजा सुद्धा आनंदी झाला.

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Congress Candidate List : दिग्रसच्या जागेसाठी ठाकरे अन् काँग्रेसमध्ये तह, तगडा उमेदवार रिंगणात, मंत्री संजय राठोड यांचं टेन्शन वाढणार
दर्यापूरच्या बदल्यात दिग्रसची जागा घेतली, काँग्रेसकडून माणिकराव ठाकरे मैदानात, संजय राठोड यांचं टेन्शन वाढणार
बँकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा; निवडणुकीच्या तोंडावर रामकृष्ण बांगर यांना अटक
बँकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा; निवडणुकीच्या तोंडावर रामकृष्ण बांगर यांना अटक
मनसेची 5 वी यादी जाहीर, 15 उमेदवारांना संधी; मंत्री तानाजी सावंतांविरुद्ध ठरला राज ठाकरेंचा शिलेदार
मनसेची 5 वी यादी जाहीर, 15 उमेदवारांना संधी; मंत्री तानाजी सावंतांविरुद्ध ठरला राज ठाकरेंचा शिलेदार
नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम, मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून उतरणार मैदानात
नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम, मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून उतरणार मैदानात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sada Sarvankar on Amit Thackeray : अमित ठाकरेंसाठी जागा सोडणार? सदा सरवणकर पहिल्यांदाच बोलले!Israel Iran  Special Reportइस्त्रायलचा इराणवर सर्वात मोठा हल्ला, इराणमधल्या तीन प्रांतावर मोठा हल्लाAmit Thackeray Mahim Special Report : माहीमबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय निर्णय घेणार?Shiv sena Vs NCP Politics : 2 राष्ट्रवादी विरुद्ध 2 शिवसेना; राज्यात राजकीय महाभारत Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Congress Candidate List : दिग्रसच्या जागेसाठी ठाकरे अन् काँग्रेसमध्ये तह, तगडा उमेदवार रिंगणात, मंत्री संजय राठोड यांचं टेन्शन वाढणार
दर्यापूरच्या बदल्यात दिग्रसची जागा घेतली, काँग्रेसकडून माणिकराव ठाकरे मैदानात, संजय राठोड यांचं टेन्शन वाढणार
बँकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा; निवडणुकीच्या तोंडावर रामकृष्ण बांगर यांना अटक
बँकेच्या माध्यमातून कोट्यवधी रुपयांचा घोटाळा; निवडणुकीच्या तोंडावर रामकृष्ण बांगर यांना अटक
मनसेची 5 वी यादी जाहीर, 15 उमेदवारांना संधी; मंत्री तानाजी सावंतांविरुद्ध ठरला राज ठाकरेंचा शिलेदार
मनसेची 5 वी यादी जाहीर, 15 उमेदवारांना संधी; मंत्री तानाजी सावंतांविरुद्ध ठरला राज ठाकरेंचा शिलेदार
नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम, मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून उतरणार मैदानात
नवाब मलिक निवडणूक लढवण्यावर ठाम, मानखुर्द शिवाजीनगर मतदारसंघातून उतरणार मैदानात
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला मुस्लीम उमेदवार; बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला दिलं तिकीट
उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा पहिला मुस्लीम उमेदवार; बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला दिलं तिकीट
राजसाहेबांचा चिरंजीव आहे, भाजपची इच्छा असेल तर अमित ठाकरेंना विधानपरिषद किंवा राज्यसभा द्यावी : समाधान सरवणकर
अमित ठाकरेंनी राज्यसभा, विधानपरिषदेचा विचार करावा, सर्व पक्षांनी पाठिंबा द्यावा, सरवणकरांच्या लेकाचा सल्ला 
फेसुबक लाईव्ह करत हत्या झालेल्या अभिषेक घोसाळकरांच्या कुटुंबीयास ठाकरेंचा एबी फॉर्म; पण उमेदवार गुलदस्त्यात
फेसुबक लाईव्ह करत हत्या झालेल्या अभिषेक घोसाळकरांच्या कुटुंबीयास ठाकरेंचा एबी फॉर्म; पण उमेदवार गुलदस्त्यात
Satej Patil :  'उत्तर'चं उत्तर अजूनही मिळेना, पण कोल्हापूरच्या जागावाटपात सतेज पाटलांची बाजी! काँग्रेसची पंचमी, पवारांना तीन अन् ठाकरेंना अवघ्या दोन जागा
'उत्तर'चं उत्तर अजूनही मिळेना, पण कोल्हापूरच्या जागावाटपात सतेज पाटलांची बाजी! काँग्रेसची पंचमी, पवारांना तीन अन् ठाकरेंना अवघ्या दोन जागा
Embed widget