Maharashtra Breaking News 31 march 2022: राज्यातील कोरोनचे सर्व निर्बंध एकमतानं हटवले, मंत्री जितेंद्र आव्हाडांची माहिती
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
जयपूर: राजस्थानमधील सरिस्का अभयारण्यात गेल्या चार दिवसांपासून लागलेल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. आतापर्यंत 700 हेक्टरहून जास्त जंगल या आगीच्या भक्ष्यस्थानी पडलं आहे. आगीचे नेमकं कारण अद्याप अस्पष्ट असलं तरी ही आग वनाधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे पसरली असल्याचं स्पष्ट झालं आहे. दरम्यान, या आगीकडे दुर्लक्ष करत अंजली तेंडुलकरांच्या गाडीचे ड्रायव्हिंग करणाऱ्या सीसीएफ आर एन मीणा या अधिकाऱ्याचं निलंबन करण्यात आलं आहे.
रविवारी संध्याकाळी चार वाजण्याच्या सुमारास या जंगलात आग लागली होती. या आगीची माहिती काही वेळेतच वायरलेसवरुन अधिकाऱ्यांपर्यंत पोहोचली होती. परंतु या दरम्यान सचिन तेंडुलकरची पत्नी अंजली तेंडुलकर या व्हीआयपी पाहुण्याच्या सेवेत सर्व अधिकाऱ्यांचा लवाजमा उतरला होता. त्यामुळे या आगीची तीव्रता या अधिकाऱ्यांना समजली नसेल किंवा त्यांनी सोपस्कररित्या याकडे दुर्लक्ष केलं असेल. व्हीआयपी पाहुण्याचे सेवेमध्ये लागलेले हे अधिकारी जंगलातील आग विझवायला विसरले.
Aadhaar-PAN Link: आजच पॅन कार्ड करा आधारशी लिंक, एक एप्रिलनंतर भरावा लागेल मोठा भुर्दंड
आधार आणि पॅन कार्ड (Aadhaar-PAN Link) लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च असून 1 एप्रिलपासून हे अनिवार्य करण्यात आलं आहे. जर तुम्ही अद्याप तुमचे आधार आणि पॅन कार्ड लिंक केले नसेल तर 31 मार्चपूर्वी नक्की करा, अन्यथा तुम्हाला त्यानंतर दंड भरावा लागू शकतो. या संदर्भात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) अधिसूचना जारी केली आहे.
दंड भरून 31 मार्चनंतरही लिंक करू शकता आधार-पॅन कार्ड
पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च आहे. मात्र त्यानंतरही तुम्ही दंड भरून आधार आणि पॅन कार्ड लिंक करू शकता. सीबीडीटीने एक अधिसूचना जारी करून म्हटले आहे की, 31 मार्चनंतरही आधार आणि पॅन लिंक करता येईल, मात्र त्यानंतर दंड भरावा लागेल.
Sangli News Update : सांगली शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या खिशातील 50 हजाराचा बंडल चोरणाऱ्या चोरट्याला अटक
Sangli News Update : सांगली शिवसेना जिल्हा प्रमुखांच्या खिशातील 50 हजाराचा बंडल चोरणाऱ्या चोरट्याला अटक करण्यात आली आहे. सांगोला येथून 21 वर्षीय चोरट्यास मिरज पोलिसानी केली अटक केली आहे. सांगलीत चार दिवसांपूर्वी मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या उपस्थितीत झालेल्या ओबीसी मेळाव्यात स्टेजवर जाऊन या चोरट्याने 50 हजार रूपयांची चोरी केली होती.
Yavatmal News Update : यवतमाळमधील महागाव तालुक्यातील जनुना आणि आमनी खुर्द परिसरातील ई-क्लासच्या जमिनीवरील जंगलाला आग
Yavatmal News Update : यवतमाळमधील महागाव तालुक्यातील जनुना आणि आमनी खुर्द परिसरातील ई-क्लासच्या जमिनीवरील जंगलाला आग लागली आहे. शेतकऱ्यांनी शेतातला कचरा पेटवल्याने हा वणवा पेटल्याची प्राथमिक माहिती आहे. या भागातील शेतकऱ्यांना शेतातील गुरे, आणि गोठ्यातील साहित्य हलवण्याच्या तहसीलदार विश्वंभर राणे यांनी सूचना दिल्या आहेत.
अंबरनाथ येथील मलंगगड येथील खरड गावात वीटभट्टीवर भीषण आग
अंबरनाथ येथील मलंगगड येथील खरड गावात वीटभट्टीवर भीषण आग लागली आहे. या आगीत वीटभट्टीवर काम करणाऱ्या मजुरांची घरे आगीच्या भक्ष्यस्थानी पडली आहेत. शॉर्टसर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज आहे.
Ratnagiri News Update : मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरीतील राजापूर नजीक भीषण अपघात, दोन जण ठार
Ratnagiri News Update : मुंबई-गोवा महामार्गावर रत्नागिरीतील राजापूर नजीक भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन जण ठार झाले आहेत. ठेकेदार आणि बांधकाम विभागाच्या निष्काळजीपणामुळे हा अपघात झाल्याचा आरोप करत अपघातानंतर ग्रामस्थ आक्रमक झाले आहेत. गेल्या दीड तासांपासून ग्रामस्थांनी मुंबई महामार्ग रोखून धरला आहे.
Raigad News Update : उरण येथील ओएनजीसी प्रकल्पामध्ये आग
Raigad News Update : उरण येथील ओएनजीसी प्रकल्पामध्ये आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाकडून शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.