(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Aadhaar-PAN Link: आजच पॅन कार्ड करा आधारशी लिंक, एक एप्रिलनंतर भरावा लागेल मोठा भुर्दंड
आधार आणि पॅन कार्ड (Aadhaar-PAN Link) लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च असून 1 एप्रिलपासून हे अनिवार्य करण्यात आलं आहे.
आधार आणि पॅन कार्ड (Aadhaar-PAN Link) लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च असून 1 एप्रिलपासून हे अनिवार्य करण्यात आलं आहे. जर तुम्ही अद्याप तुमचे आधार आणि पॅन कार्ड लिंक केले नसेल तर 31 मार्चपूर्वी नक्की करा, अन्यथा तुम्हाला त्यानंतर दंड भरावा लागू शकतो. या संदर्भात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) अधिसूचना जारी केली आहे.
दंड भरून 31 मार्चनंतरही लिंक करू शकता आधार-पॅन कार्ड
पॅन कार्ड आधारशी लिंक करण्याची शेवटची तारीख 31 मार्च आहे. मात्र त्यानंतरही तुम्ही दंड भरून आधार आणि पॅन कार्ड लिंक करू शकता. सीबीडीटीने एक अधिसूचना जारी करून म्हटले आहे की, 31 मार्चनंतरही आधार आणि पॅन लिंक करता येईल, मात्र त्यानंतर दंड भरावा लागेल.
31 मार्च नंतर किती दंड भरावा लागेल (Aadhaar-PAN Link after 31st March)
नोटिफिकेशननुसार, 31 मार्चनंतर 3 महिन्यांच्या आत आधार आणि पॅन कार्ड लिंक केल्यास 500 रुपये दंड भरावा लागेल. तसेच आधार आणि पॅन कार्ड 3 महिने म्हणजेच जूनपर्यंत लिंक न केल्यास 1000 रुपये दंड भरावा लागेल.
असे करा पॅन आणि आधार ऑनलाइन लिंक (Aadhaar-PAN Link Process)
1. पॅन-आधार (Aadhaar-PAN) लिंक करण्यासाठी आयकर ई-फायलिंग वेबसाइटला भेट द्या.
2. साइटच्या डाव्या बाजूला तुम्हाला Quick Links चा पर्याय मिळेल. येथे तुम्हाला 'Link Aadhaar' पर्यायावर क्लिक करावे लागेल.
3. येथे तुम्हाला तुमचा पॅन (PAN), आधार क्रमांक आणि नाव टाकावे लागेल.
4. ही माहिती दिल्यानंतर, तुम्हाला एक OTP पाठवला जाईल. ओटीपी टाकल्यानंतर, तुमचा आधार आणि पॅन लिंक होईल (Aadhaar-PAN Link Process).
इतर महत्वाच्या बातम्या: