एक्स्प्लोर

Maharashtra Breaking News 25 August 2022 : राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra Breaking News 25 August 2022 : राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...

Background

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू... 

महाराष्ट्रातील सत्तासंघर्ष पाच सदस्यीय घटनापीठापुढे....आजच्या सुनावणी  अनिश्चितता कायम 
23 ऑगस्टला सुप्रिम कोर्टात झालेल्या सुनावणीत महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाचे प्रकरण खंडपीठीकडे पाठवण्यात आलाय.  आज पाच सदस्यांच्या खंडपीठापुढे महाराष्ट्रातल्या सत्ता संघर्षाची पहिली सुनावणी होणार आहे. या खंडपीठात कोण कोण न्यायमुर्ती असणार? खंडपीठ कोण कोणत्या विषयावर सुनावणी करणार?  ही सुनावणी कालबद्ध असणार का? या सर्व गोष्टींवर आज स्पष्टता येण्याची शक्यता आहे. तसेच शिवसेना कोणाची या बाबात निवडणुक आयोगात सुरू असलेल्या याचिकेचं काय होणार यात स्पष्टता येण्याची शक्यता.

राज्य विधिमंडळ अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस
शिदें सरकारचे पहिले अधिवेशन 17 ते 25 ऑगस्ट दरम्यान झाले आहे. अंतिम आठवडा प्रस्तावावर मुख्यमंत्री उत्तर देणार आहेत. विरोधी पक्षाने मोठ्या प्रमाणावर टीका केली आहे, याला मुख्यमंत्री उत्तर देतील. हे उत्तर देताना सत्ताधारी आणि विरोधक आमने सामने येण्याची शक्यता आहे.

राज ठाकरे अँक्शन मोडवर
राज ठाकरे अँक्शन मोडमध्ये आले आहे.  शस्त्रक्रिया आणि विश्रांती अशा दोन महिन्याच्या कालावधीनंतर राज ठाकरे अँक्शन मोडमध्ये आलेत.   मुंबईत दोन दिवस पदाधिकारी बैठक आणि मेळव्यानंतर आज ते पुण्यात असणार आहेत.  पुण्यातून आज मनसेच्या प्राथमिक सदस्य नोंदणी शुभारंभाला राज ठाकरे उपस्थित रहाणार आहेत. पुण्यातल्या मध्यवर्ती कार्यालयात सकाळी 10 वाजता हा कार्यक्रम होणार आहे.

बिल्कीस बानोने दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी
सन 2002 सालच्या गोध्रा हत्याकांडानंतर गुजरातमध्ये उसळलेल्या जातीय हिंसाचारात गर्भवती असलेल्या बिल्कीस बानोवर सामूहिक बलात्कार झाला झाला होता बिल्किस बानो बलात्कार प्रकरणी जन्मठेप भोगत असलेल्या 11 जणांची सुटका करण्यात आली आहेत. या सुप्रिम कोर्टाच्या निर्णयाविरोधात बिल्कीस बानोने याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर गुरूवारी सुनावणी होणार आहे

पीएमएलए कायद्यातील  तरतुदींना आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज  सुनावणी
Prevention of Money Laundering Act (PMLA) कायद्यातील तरतुदींना आव्हान देणाऱ्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी होणार आहे

पेगॅसीस प्रकरणी आज सर्वोच्च न्यायलयात 
देशभरातील 40 हून अधिक पत्रकार आणि महत्वाच्या नेत्यांवर पाळत ठेवल्या प्रकरणी चर्चेत आले.  पेगॅसस स्पायवेअरसंबंधी स्थापन केलेल्या स्वतंत्र समितीने त्याचा अहवाल सर्वोच्च न्यायालयात सादर केला. आज या प्रकरणावर आज सुनावणी होणार आहे.

आज गुरु पुष्यामृत योग 
आज गुरु पुष्यामृत योग आहे. या दिवशी सोने खरेदी ही शुभ आणि बरकत देणारी असल्याची अनेक ग्राहकांची श्रद्धा असल्याने या निमित्ताने सोने खरेदी साठी ग्राहक सोन्याच्या दुकानात गर्दी करीत असतात.

21:40 PM (IST)  •  25 Aug 2022

Nagpur : शनिवारी शहरातील दारू दुकाने बंद

नागपूर : 27 ऑगस्ट रोजी तान्हा पोळा आहे. या दिवशी कायदा व सुव्यवस्था  अबाधित राखण्यासाठी नागपूर जिल्ह्यात सर्व ठिकाणी किरकोळ देशी-विदेशी दारू विक्रीची दुकाने बंद ठेवण्याचा आदेश जिल्हाधिकारी डॉ. विपिन इटनकर यांनी दिला आहे. या आदेशाचा भंग करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाच्याविरुद्ध सक्त कारवाई करण्यात येईल, असा इशारा याबाबतच्या सूचनेत देण्यात आला आहे.

21:38 PM (IST)  •  25 Aug 2022

Nagpur : कृषी विभागातील रोजंदारी मजुरांची एकत्रित ज्येष्ठता सूची प्रसिद्ध

नागपूर : कृषी विभागांतर्गत येत असलेल्या जिल्ह्यातील सर्व तालुका बीज गुणन केंद्र, फळरोप वाटिकात काम करणाऱ्या रोजंदारी मजुरांची एकत्रित ज्येष्ठता सूची तयार करण्यात आलेली आहे. एकत्रित ज्येष्ठता सूची जिल्हा अधिक्षक  कृषी अधिकारी, नागपूर यांच्या कार्यालयाच्या नोटीस बोर्डवर प्रसिध्द करण्यात आली आहे. रोजंदारी मजुरांना यादीबाबत आक्षेप नोंदवायचा असल्यास पाच दिवसात लेखी पुराव्यासह संपर्क करावा, असे जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी मिलिंद शेंडे यांनी कळवले आहे.

21:37 PM (IST)  •  25 Aug 2022

Nagpur News : शुक्रवारी शहरातील कत्तलखाने बंद

नागपूर: 'पोळा' या सनानिमित्त शुक्रवार, 26 ऑगस्ट रोजी शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीचे दुकाने बंद असणार आहे. या संदर्भात नागपूर महानगरपालिकेने आदेश जारी केले आहे. त्यानुसार शुक्रवारी नागपूर महानगरपालिका हद्दीतील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद राहतील. या संदर्भातील आदेश उपायुक्त तथा संचालक घनकचरा व्यवस्थापन डॉ.गजेन्द्र महल्ले यांनी निर्गमीत केले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणा-यांवर महानगरपालिके व्दारे कार्यवाही करण्यात येईल, असेही नमूद करण्यात आले आहे.

20:58 PM (IST)  •  25 Aug 2022

Pune Express Way : पुणे-मुंबई एक्सप्रेस वेवर उद्या 12 ते 2 दरम्यान ब्लॉक

Pune Express Way : शिवसंग्रामचे नेते विनायक मेटे यांच्या अपघाती मृत्यूनंतर पुणे-मुंबई द्रुतगती मार्गावर ITMS प्रकल्प राबवण्यास सुरुवात होत आहे. यासाठी उद्या द्रुतगतीवर दोन तासांचा ब्लॉक घेतला जातोय. ITMS प्रकल्पाचा एक भाग म्हणजे ओव्हरहेड ग्रॅंटी, तीच उभारण्यासाठी उद्या दुपारी 12 ते 2 दरम्यान हा ब्लॉक घेतला जातोय. किवळे ते सोमटने दरम्यान हे काम सुरू होतंय. या दोन तासासाठी जुन्या पुणे मुंबई महामार्गाकडे वाहतूक वळवली जाणार आहे.

20:38 PM (IST)  •  25 Aug 2022

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात तैलचित्र

शिवसेनाप्रमुख हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे तैलचित्र विधिमंडळाच्या मध्यवर्ती सभागृहात लावण्याची मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली. ही मागणी विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी मान्य केली आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis : ना पवार - ना ठाकरे...फडणवीसांच्या रडारवर जयंतराव; स्फोटक भाषणAjit Pawar Full Speech Igatpuri : वक्फ बोर्डावरु उद्धव ठाकरेंना टोला,अजित पवार गरजले-बरसलेAmit Shah Bag Check : अमित शाहांनाही रोखलं,निवडणूक पथकाने तपासली एक-एक बॅग!CM Eknath Shinde Nanded Speech : एक बार मैंने कमिटमेंट कर दी तो..नांदेडच्या सभेत शिंदेंचं तुफान भाषण

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Tilak Varma Century : तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
तिलक वर्माचा धमाका! ठोकले बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा दुसरा भारतीय
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
विधानसभेची खडाजंगी: स्वामी समर्थांच्या अक्कोलकोटमध्ये कोण जिंकणार, जनता कोणाला कौल देणार?
Sanju Samson : संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
संजू सॅमसनची वादळी खेळी! पाच सामन्यांत ठोकले तिसरे शतक, वर्ल्ड रेकॉर्डला गवसणी
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
श्रीमंत... दगडूशेठ गणपती बाप्पांना 521 पदार्थांचा महानैवेद्य, 1 लाख 25 हजार दिव्यांची आरास
Varsha Gaikwad : ‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
‘एक हैं तो सेफ हैं’चा नारा देणाऱ्या मोदींच्या राज्यात मुंबईकर अनसेफ, फक्त लाडका उद्योगपतीच सेफ
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
मतं खाण्यासाठी, भाजपला मदत व्हावी म्हणून मनसेने उमेदवार उभे केले; रोहित पवारांचा राज ठाकरेंवर आरोप
निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
मोठी बातमी! निवडणुकांमुळे राज्यातील शाळांना 18, 19 नोव्हेंबरला सुट्टी नाही; शिक्षण आयुक्तांचं स्पष्टीकरण
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
ज्यांचे हात बरबटलेले, भ्रष्टाचाराने माखलेले असतात त्यांनाच भीती; ईडी आणि जेलच्या भीतीने सगळा उद्योग केला; अजित पवार गटावर शरद पवारांचा हल्लाबोल
Embed widget