एक्स्प्लोर

Maharashtra Breaking News 25 May 2022 : राज्यभरातील तब्बल 20 हजार परिचारिका उद्यापासून संपावर

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra Breaking News 25 May 2022 :  राज्यभरातील तब्बल 20 हजार परिचारिका उद्यापासून संपावर

Background

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.

राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संजय पवार यांच्या नावाची अधिकृत घोषणा होण्याची शक्यता
राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी शिवसेनेने कोल्हापूरच्या संजय पवार यांचे नाव फायनल केले आहे. आज संजय पवार यांच्या नावाची अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे. संभाजीराजे छत्रपती यांनी शिवसेनेमध्ये प्रवेश करण्यास नकार दिल्यानंतर शिवसेनेने संजय पवार यांचे नाव फायनल केल्याचं संजय राऊत यांनी आज सांगितलं. 

संभाजीराजे छत्रपतींनी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वयांशी चर्चा करून पुढचा निर्णय घेणार असल्याचं जाहीर केलं आहे. त्यामुळे संभाजीराजेंची नेमकी भूमिका काय हे आज स्पष्ट होण्याची शक्यता आहे. 
 
वाराणसी- ज्ञानवापीशी संबंधीत दुसऱ्या याचिकेवर आज सुनावणी
ज्ञानवापीशी संबंधीत दुसऱ्या याचिकेवर आज सत्र न्यायालयात सुनावणी होणार आहे. ज्यात ज्ञानवापीचा पूर्ण ताबा हिंदूना द्या, विश्वेश्वरच्या नियमित पूजेची परवानगी द्यावी, ज्ञानवापी परिसरात मुसलमानांना बंदी घालण्यात यावी अशा मागण्या करण्यात आल्या आहेत. या याचिकेवर आज दुपारी 2 वाजता सुनावणी होणार आहे. दरम्यान, या संबंधिच्या एका याचिकेची सुनावणी ही 26 रोजी होणार आहे. 

हिंदू पक्षाची काय भूमिका आहे?
1. शृंगार गौरीच्या रोजच्या पूजेची मागणी.
2. वाजुखान्यात सापडलेल्या कथित शिवलिंगाच्या पूजेची मागणी.
3. नंदीच्या उत्तरेकडील भिंत तोडून डेब्रिज हटवण्याची मागणी.
4. शिवलिंगाची लांबी, रुंदी जाणून घेण्यासाठी सर्वेक्षणाची मागणी.
5. वाळूखान्यासाठी पर्यायी व्यवस्था करण्याची मागणी.

मुस्लिम पक्षाची बाजू
1. वजूखाना सील करण्यास विरोध
2.  1991 कायद्यांतर्गत ज्ञानवापी सर्वेक्षण आणि  खटल्यावर प्रश्नचिन्ह.

पंतप्रधान मोदी दोन दिवसांच्या दौऱ्यावरून आज भारतात परतणार
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज दोन दिवसांच्या जपान दौऱ्यावरून भारतात परत येणार आहेत. या दौऱ्यामध्ये त्यांनी क्वॉड देशांच्या प्रमुखांची भेट घेतली. या दौऱ्यामध्ये मोदींनी जपानच्या प्रमुख उद्योगपतींची भेट घेतली. 
 
आज सकाळी 11 वाजता केंद्रीय कॅबिनेटची बैठक
ऑल इंडीया बॅकवर्ड अँण्ड मायनॉरिटी कम्युनिटीज एम्प्लाईज फेडरेशनची भारत बंदची हाक
केंद्र सरकारकडून विविध मागासवर्गीयांच्या जनगणनेला नकार दिल्या विरोधात ऑल इंडीया बॅकवर्ड अँण्ड मायनॉरिटी कम्युनिटीज एम्प्लाईज फेडरेशनने आज भारत बंदची हाक दिली आहे.
 
मध्य प्रदेशमध्ये आज संध्याकाळी 7 ते 9 मध्ये पेट्रोलपंप बंद
मध्य प्रदेशमध्ये आज संध्याकाळी 7 ते 9 या दरम्यान पेट्रोल पंप बंद ठेवण्यात येणार आहे. पेट्रोलियम कंपन्यांनी अबकारी कराच्या नावाखाली जो अॅडव्हान्स घेतला आहे, तो अॅडव्हान्स आता दर कमी झाल्यानंतर परत करण्यात यावा अशी मागणी पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनची केली आहे. त्यामुळे ही बंदची हाक देण्यात आली आहे. 

लखनौ आणि बंगळुरू यांच्यात आज लढत
आयपीएलच्या पंधराव्या हंगामातील एलिमिनेटर सामन्यात लखनौ सुपर जायंट्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू (Lucknow Super Giants vs Royal Challengers Bangalore) आमने सामने येणार आहेत. कोलकात्याच्या (Kolkata) ईडन गार्डनवर (Eden Gardens) हा सामना खेळला जाणार आहे. आजच्या सामन्यात विजय मिळवणारा संघ क्वालीफायरमध्ये पराभूत झालेल्या संघाची भिडणार आहे. तर, पराभूत झालेल्या संघाचा प्रवास इथेच संपेल. यामुळं आयपीएल 2022 मधील आपलं आव्हान टिकवण्यासाठी दोन्ही संघ मैदानात उतरतील. लखनौच्या संघाचं नेतृत्व केएल राहुल (KL Rahul) करत आहे. तर, आरसीबीच्या संघाचं कर्णधारपदाची जबाबदारी फाफ डू प्लेसिस (Faf du Plessis) संभाळत आहे. 

22:51 PM (IST)  •  25 May 2022

राज्यभरातील तब्बल 20 हजार परिचारिका उद्यापासून संपावर

राज्यभरातील तब्बल 20 हजार परिचारिका गुरुवारपासून संपावर जाणार असल्याची बातमी समोर येत आहे. दोन दिवस 1 तासासाठी काम बंद आंदोलन करून देखील प्रशासकीय पातळीवर दखल न घेतल्याने महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेच्या वतीने संपाची हाक देण्यात आली आहे. कंत्राटी पद्धतीने पदे भरण्यास महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटनेचा विरोध आहे. परिचारिकांच्या संपामुळे वैद्यकीय सेवेवर परिणाम होण्याची शक्यता आहे.

20:55 PM (IST)  •  25 May 2022

 महाराष्ट्रातल्या दहा विधानपरिषद जागांसाठी निवडणूक जाहीर

 महाराष्ट्रातल्या दहा विधानपरिषद जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली आहे.20 जूनला निवडणूक होणार आहे. 

20:26 PM (IST)  •  25 May 2022

Sindhdurga Tourism : सिंधुदुर्गच्या किनारपट्टीवरील पर्यटनाला उद्यापासून ब्रेक

Sindhdurga Tourism : सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या किनारपट्टी भागातील साहसी जलक्रीडा प्रकाराबरोबर सिंधुदुर्ग किल्ला प्रवासी होडी वाहतूक सेवा उद्या पासून 31 ऑगस्टपर्यत बंद करण्याचे मेरीटाईम बोर्डाने आदेश दिले आहेत.  त्यामुळे किनारपट्टीवरील पर्यटनाला आता 'ब्रेक' लागणार आहे. 

18:52 PM (IST)  •  25 May 2022

Ulhasnagar Crime News: उल्हासनगर मध्ये पेटवल्या दुचाकी गाड्या , पोलिसांनी केली दोन आरोपीना अटक

 उल्हासनगरच्या मिलिंद नगर भागात दुचाकी पेटवण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय. जुन्या वादातून आणि परिसरात दहशद निर्माण करण्याच्या हेतूने या दुचाकी पेटवण्यात आल्या. या प्रकरणी उल्हासनगर मध्यवर्ती पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. 

18:24 PM (IST)  •  25 May 2022

सोलापुरात एल ॲन्ड टी फायनान्सच्या कार्यालयाला विरोधी पक्षनेत्याने ठोकले टाळे

Solapur News : सोलापुरात एल ॲन्ड टी फायनान्सच्या कार्यालयाला विरोधी पक्ष नेत्याने टाळे  ठोकले  आहे. बोगस कागदपत्रांचा वापर करून 36 पेक्षा जास्त लोकांच्या नावे परस्पर कर्ज काढल्याने शिवसेनेचे नगरसेवक अमोल शिंदे आक्रमक झाले. एल ॲन्ड टी कंपनीतील कर्मचाऱ्यांनी बोगस कागदपत्रांच्या आधारे 36 तरुणांच्या नावे  42 लाखाचे बोगस कर्ज काढले होते.  

18:06 PM (IST)  •  25 May 2022

Amravati Breaking: खासदार नवनीत राणा यांना फोनवरून जिवे मारण्याची धमकी

खासदार नवनीत राणा यांना फोनवरून जिवे मारण्याची धमकी देण्यात आल्याची बातमी समोर येत आहे. त्यांना हनुमान चालीसा जर कुठेही वाचन केलं तर तिथं येऊन जीवानिशी मारणार असल्याची धमकी देण्यात आली आहे. दोन दिवसात तब्बल 50 वेळा अज्ञात व्यक्तीकडून फोन येत असल्याची माहिती खासदार नवनीत राणा यांनी दिली. याबाबत वनीत राणा यांनी दिली संसदेतील पोलीस चौकीत तक्रार देखील केली आहे.

18:04 PM (IST)  •  25 May 2022

Navneet Rana: जेलवारीनंतर प्रथमच राणा दाम्पत्याच 28 मे रोजी विदर्भात होणार दाखल

नागपूरात हनुमान चालिसा पठण केल्यानंतर राणा दांपत्य कार्यकर्त्यांसह अमरावतीला रवाना होतील. अमरावती जिल्ह्यात तिवसा, मोझरी नांदगाव यासह अमरावती शहरात अनेक ठिकाणी त्यांचे स्वागत होणार असून रात्री 9 वाजता अमरावती येथील दसरा मैदान जवळच्या हनुमान मंदिरात पुन्हा हनुमान चालीसा पठण केले जाणार आहे. 

17:39 PM (IST)  •  25 May 2022

डीच वर्षांपासून रखडलेल्या महामंडळ नियुक्त्यांबाबत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची सायंकाळी महत्त्वाची बैठक

Maharashtra News :  मागील अडीच वर्षांपासून रखडलेल्या महामंडळ नियुक्त्यांबाबत राष्ट्रवादीच्या मंत्र्यांची सायंकाळी महत्त्वाची बैठक आहे. राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल पटेल यांच्या घरी बैठकीचं आयोजन करण्यात आले आहे. बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्यासह वरिष्ठ नेते उपस्थित राहणार आहेत. बैठकीमध्ये राज्यसभेच्या निवडणुकांसोबतच, ओबीसी आरक्षण प्रश्ननी चर्चा होण्याची शक्यता आहे. 

17:29 PM (IST)  •  25 May 2022

Sharad Pawar : शरद पवार यांची दिल्लीतील सभा पुढे ढकलली

Sharad Pawar :  राष्ट्रवादी काँग्रेसच्या 23व्या वर्धापन दिनानिमित्त शरद पवार यांची दिल्लीत आयोजित केलेली सभा पुढे ढकलली आहे.  दिल्लीत 10 जून ऐवजी 19 जूनला जाहीर सभेचं आयोजन करण्यात येणार आहे.  राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष धीरज शर्मा यांनी ही माहिती दिली आहे.

17:19 PM (IST)  •  25 May 2022

Yavatmal Accident : यवतमाळमध्ये लग्नाच्या वऱ्हाडाचा भीषण अपघात, 14 जण जखमी

Yavatmal Accident : आर्णी येथील विठोली येथे लग्नाच्या वऱ्हाडाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात 14 जण जखमी झाले आहे. लग्नाला जाताना आर्णी ते बोरगांव राज्य महामार्गावर घडली. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Lok Sabha Election : उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
Rajasthan Royals Vs Delhi Capitals Score:  20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
Praful Patel gets Clean Chit : 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चीट
प्रफुल्ल पटेल यांना दिलासा! 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून क्लीन चीट
Hemant Godse : शिवसेनेच्या यादीत नाव नाही, हेमंत गोडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शिवसेनेच्या यादीत नाव नाही, हेमंत गोडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines :  10 PM : 28 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सSangli Lok Sabha Election:मविआत जुंपली, तर भाजपचा प्रचार सुरु;सांगलीतील पत्रकारांचा निवडणुकीचा अंदाजJalna Lok Sabha : Jarange-Vanchit सामाजिक युतीचे फायदे-तोटे; कार्यकर्त्यांच्या नेमक्या भावना काय?ABP Majha Headlines : 9 PM : 28 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Lok Sabha Election : उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
उमेदवार जाहीर करण्यात भाजप, ठाकरेंची आघाडी; तुमच्या मतदारसंघात कोण कुणाशी भिडणार? पाहा संपूर्ण यादी
Rajasthan Royals Vs Delhi Capitals Score:  20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
20 व्या षटकांत 4,4,6,4,6...; रियान परागने गोलंदाजांना धुतलं, दिल्लीला 186 धावांचं आव्हान दिलं
Praful Patel gets Clean Chit : 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चीट
प्रफुल्ल पटेल यांना दिलासा! 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून क्लीन चीट
Hemant Godse : शिवसेनेच्या यादीत नाव नाही, हेमंत गोडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
शिवसेनेच्या यादीत नाव नाही, हेमंत गोडसेंची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
Rajasthan Royals Vs Delhi Capitals: DRS घे...; बटरच्या विकेटसाठी कुलदीप ऋषभ पंतकडे धावला, DRS साठी जबरदस्ती, पुढे जे घडलं, त्यानंतर....
DRS घे...; बटरच्या विकेटसाठी कुलदीप ऋषभ पंतकडे धावला, DRS साठी जबरदस्ती, पुढे जे घडलं, त्यानंतर....
Amol Kolhe Video : इवलसं पोर पण सिंहासारखं धाडस, अमोल कोल्हे गुढघ्यावर बसून पाहातच राहिले, शाहू नाव ऐकताच पाया पडले; 'शिवनेरी'वर काय घडलं? 
इवलसं पोर पण सिंहासारखं धाडस, अमोल कोल्हे गुढघ्यावर बसून पाहातच राहिले, शाहू नाव ऐकताच पाया पडले; 'शिवनेरी'वर काय घडलं? 
Whatsapp : व्हॉट्सॲपचा मोठा निर्णय, प्रत्येक एसएमएसवर आकारणार 2.3 रुपये; निर्णय 1 जूनपासून लागू होणार
व्हॉट्सॲपचा मोठा निर्णय, प्रत्येक एसएमएसवर आकारणार 2.3 रुपये; निर्णय 1 जूनपासून लागू होणार
Shivsena First List : मुलाची उमेदवारी राखीव, कल्याण, ठाणे, नाशिकसह 5 जागेवर एकनाथ शिंदेंचे उमेदवार अद्याप गुलदस्त्यात!
मुलाची उमेदवारी राखीव, ठाणे, नाशिकसह 5 जागेवर शिंदेंचे उमेदवार अद्याप गुलदस्त्यात!
Embed widget