एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source: ECI/ABP News/ABP Majha)

22 March 2022 Breaking News LIVE Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
22 March 2022 Breaking News LIVE Updates : दिवसभरातील महत्त्वाच्या घडामोडी फक्त एका क्लिकवर...

Background

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

Petrol-Diesel Price : साडेचार महिन्यानंतर पेट्रोल-डिझेल महागलं! पेट्रोल 84 पैसे तर डिझेल 83 प्रति लिटर पैशांनी महाग

Petrol-Diesel Price Today 22 March 2022 : आजपासून देशात पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel) महागलं. तब्बल साडेचार महिन्यानंतर देशात पेट्रोल-डिझेल महागलं आहे. आजपासून पेट्रोल प्रतिलीटर 84 पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर 83 पैशांनी वाढ होणार आहे. सकाळी 6 वाजल्यापासून नवे दर लागू झालेत. उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील निवडणूक निकालानंतर पेट्रोल  (Petrol Price) आणि डिझेलची (Diesel Price)  दरवाढ होणार असल्याचे संकेत मिळाले होते. जागतिक बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरेल 112 डॉलर पोहचली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. गेल्या वर्षी 3 नोव्हेंबर 2021 पासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झाली नव्हती.  

उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील निवडणूक निकालानंतर पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ होणार असल्याचे संकेत मिळाले होते. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती 112 डॉलर प्रति बॅरेलवर पोहचली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. मंगळवारी म्हणजेच, आज सकाळपासून पेट्रोल 84 पैसे प्रति लीटर तर डिझेल 83 पैसे प्रती लिटरनं किरकोळ बाजारात वाढ होणार आहे. मुंबईत सध्या पेट्रोल 109.98 रुपये प्रति लीटर तर डिझेल 94.14 रुपये प्रति लीटर आहे. घाऊक ग्राहकांसाठी डिझेलच्या दरात 25 रुपयांची वाढ झाली आहे. 

Narayan Rane : नारायण राणेंच्या बंगल्यावर हातोडा पडणार? मुंबई हायकोर्टाच्या सुनावणीकडे लक्ष

Narayan Rane : जुहू येथील बंगल्यातील अनधिकृत बांधकाम प्रकरणी मुंबई महापालिकेकडून मिळालेल्या नोटीसविरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. नारायण राणे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टात आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे राणे यांना दिलासा मिळणार का, याकडे लक्ष लागले आहे. मुंबई महापालिकेने बजावलेल्या नोटीसची मुदत संपत असल्याचे नारायण राणे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली.

मुंबई महापालिकेकडून केंद्रीय मंत्री नारायण राणेंना दुसऱ्यांदा नोटीस देण्यात आली. महापालिकेच्या 'के-पश्चिम' विभागाकडून काही दिवसांपूर्वी नारायण राणेंच्या 'अधिश' बंगल्यातील बांधकाम प्रकरणी नोटीस पाठवण्यात आली. पुढील 15 दिवसांत स्वत:हून अतिरीक्त अनधिकृत बांधकाम पाडून टाका, नाहीतर पालिकेला कारवाई करावी लागेल, असे पालिकेकडून या नोटीसमध्ये सांगण्यात आले. 

मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी नारायण राणे यांच्या अधिश बंगल्याची पाहणी केल्यानंतर राणे यांनी बंगल्यातील अंतर्गत बांधकाम अधिकृत असल्याचे सांगितले. ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने करण्यात येत असल्याचाही आरोप त्यांनी केला होता. 

21:01 PM (IST)  •  22 Mar 2022

Sangli : सांगलीत दोन दिवसांत दोन हत्येच्या घटना

सांगली येथे दोन दिवसांत दोन हत्येच्या घटना घडल्या आहेत. रात्री हरिपूर मध्ये एका आरटीओ एजंटच्या खुनाची घटना ताजी असतानाच सांगली शहरात स्टॅंड रोडवर आणखी एक हत्येची घटना समोर आली आहे.अज्ञात हल्लेखोरांकडून एका व्यक्तीची धारदार हत्याराने आणि दगडाने हल्ला करून निर्घृण हत्या करण्यात आली.

20:13 PM (IST)  •  22 Mar 2022

महाविकास आघाडी सरकार अस्थिर करण्याचे प्रयत्न: एकनाथ शिंदे

केंद्रीय तपास यंत्रांचा अशा प्रकारे वापर हा लोकशाहीसाठी घातक आहे. महाविकास सरकारच्या कामात अडथळे निर्माण करण्याचं, सरकार अस्थिर करण्याचं काम भाजपकडून केलं जात असल्याचं मंत्री एकनाथ शिंदे म्हणाले आहेत. शिवसेना अशा कारवाईना घाबरत नाही. घाबरणार नाही, असंही ते म्हणाले आहेत.

18:51 PM (IST)  •  22 Mar 2022

न्यायालय ही दबावात, ही तानशाहीची सुरुवात : संजय राऊत

संजय राऊत म्हणाले आहेत की, आम्ही अशा परिस्थिती न्यायालयाकडूनही न्यायाची अपेक्षा करू शकता नाही. जनतेचं न्यायालय हे सर्वात मोठं आहे. महाराष्ट्राची जनता ठाकरे कुटुंबियांशी परिचित आहे. राजकीय सूडबुद्धीने होत असलेल्या या कारवाईचे उत्तर कधी ना कधी कोणाला तरी द्यावं लागेल.'' ते म्हणाले, ''न्यायालय ही दबावात असून ही ही तानशाहीची सुरुवात आहे.'' 

18:54 PM (IST)  •  22 Mar 2022

सूडबुद्धीने ही कारवाई केली जात आहे : संजय राऊत

सूडबुद्धीने ही कारवाई केली जात आहे. आपलं राजकीय वर्चस्व दाखवण्याचा भाजपचा हा प्रयत्न असल्याचं शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत म्हणाले आहेत. भाजपची सत्ता नसलेल्या राज्यातच अशी कारवाई केली जाते असं ते म्हणाले आहेत. जिथं सत्ता गेली तिथं भाजप अशाप्रकारे दबाव आणत आहे, असंही ते म्हणाले आहेत.

19:16 PM (IST)  •  22 Mar 2022

मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा: भाजप आमदार नितेश राणे

ई़डीने आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेव्हणे श्रीधर पाटणकर यांच्यावर कारवाई केली आहे. पुष्पक बुलियन या कंपनीची संबंधित एका प्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.  जप्त केलेली ही मालमत्ता तब्बल 6.45 कोटी रुपयांची आहे. यावरच आपली प्रतिक्रिया देताना भाजप आमदार नितेश राणे म्हणाले आहेत की, ''हा पैसा मातोश्रीपर्यंत पोहोचलेला आहे. त्यामुळे नैतिक जबाबदारी स्वीकारून मुख्यमंत्र्यानी राजीनामा द्यावा, असं भाजप आमदार नितेश राणे म्हणाले आहेत.''

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Special Report Uddhav Thackeray : ठाकरे एकत्र आले तर मुंबईकर त्यांना मत देईल?Rajkiya Shole: भाजपचा शिंदेंसाठी निरोप, आठवलेंची दवंडी!Eknath Shinde Devendra Fadnavis: शिंदेंना चिंता,फडणवीसांचा विरोध; नेत्यांची बॉडी लँग्वेज काय सांगते?Rajkiiya Shole : देवेंद्र फडवीसचं मुख्यमंत्री, भाजपचा एकनाथ शिंदेंना निरोप

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde : एक रुपयात पीक विमा, महिलांना एसटी प्रवास शुल्कात सवलत ते लाडकी बहीण योजना, एकनाथ शिंदेंचे प्रमुख निर्णय एका क्लिकवर
एक रुपयात पीक विमा ते आनंदाचा शिधा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सरकारचे प्रमुख लोकप्रिय निर्णय
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
बीडमधील शरद पवारांचा आमदार मातोश्रीवर, उद्धव ठाकरेंची घेतली भेट; फोटो आले समोर
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
कल्याणमध्ये 17 व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग; अग्निशमनच्या गाड्यांसह 20 ॲम्ब्युलन्स घटनास्थळी
Raigad : शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
शेकापचा बालेकिल्ला ढासळला, रायगडमधील एकही जागा जिंकण्यास अपयशी
Rishabh Pant : लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, सरकारला करापोटी कोट्यवधी रुपये द्यावे लागणार,रिषभच्या खात्यात किती कोटी राहणार?
लखनौनं रिषभ पंतसाठी 27 कोटी रुपये मोजले, कोट्यवधी रुपये करापोटी द्यावे लागणार, हातात किती येणार?
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
आम्ही त्यांच्या जागी असतो तर शपथ घेऊन कामाला लागलो असतो; सुप्रिया सुळेंचा महायुतीला टोला
Manda Mhatre : गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
गणेश नाईकांना जे जमलं नाही ते मंदा म्हात्रेंनी करून दाखवलं, बेलापुरात विजयाची हॅट्रिक करत रचला विक्रम
Cidco Lottery 2024 : सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर”महागृहनिर्माण योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 11 डिसेंबरपर्यंत मुदतवाढ
सिडकोच्या “माझे पसंतीचे सिडकोचे घर” योजनेला अभूतपूर्व प्रतिसाद, 92 हजार अर्ज दाखल
Embed widget