एक्स्प्लोर

Petrol-Diesel Price : साडेचार महिन्यानंतर पेट्रोल-डिझेल महागलं! पेट्रोल 84 पैसे तर डिझेल 83 प्रति लिटर पैशांनी महाग

Petrol-Diesel Price Today 22 March 2022 : आजपासून पेट्रोल-डिझेल महागणार, पेट्रोल 84 पैसे प्रति लिटर तर डिझेल 83 पैशांनी वाढणार, साडेचार महिन्यानंतर इंधनाच्या दरात वाढ होणार

Petrol-Diesel Price Today 22 March 2022 : आजपासून देशात पेट्रोल-डिझेल (Petrol-Diesel) महागलं. तब्बल साडेचार महिन्यानंतर देशात पेट्रोल-डिझेल महागलं आहे. आजपासून पेट्रोल प्रतिलीटर 84 पैसे तर डिझेलच्या दरात प्रतिलीटर 83 पैशांनी वाढ होणार आहे. सकाळी 6 वाजल्यापासून नवे दर लागू झालेत. उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील निवडणूक निकालानंतर पेट्रोल  (Petrol Price) आणि डिझेलची (Diesel Price)  दरवाढ होणार असल्याचे संकेत मिळाले होते. जागतिक बाजारात कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरेल 112 डॉलर पोहचली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. गेल्या वर्षी 3 नोव्हेंबर 2021 पासून देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झाली नव्हती.  

उत्तर प्रदेशसह पाच राज्यातील निवडणूक निकालानंतर पेट्रोल आणि डिझेलची दरवाढ होणार असल्याचे संकेत मिळाले होते. जागतिक बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती 112 डॉलर प्रति बॅरेलवर पोहचली आहे. त्यामुळे पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीत वाढ झाली आहे. मंगळवारी म्हणजेच, आज सकाळपासून पेट्रोल 84 पैसे प्रति लीटर तर डिझेल 83 पैसे प्रती लिटरनं किरकोळ बाजारात वाढ होणार आहे. मुंबईत सध्या पेट्रोल 109.98 रुपये प्रति लीटर तर डिझेल 94.14 रुपये प्रति लीटर आहे. घाऊक ग्राहकांसाठी डिझेलच्या दरात 25 रुपयांची वाढ झाली आहे. 

गेल्या वर्षी 3 नोव्हेंबर 2021 रोजी केंद्र सरकारनं पेट्रोलवरील उत्पादन शुल्क प्रति लिटर 10 रुपये आणि डिझेलवरील (Petrol-Diesel) उत्पादन शुल्क 5 रुपयांनी कमी केलं होतं. त्यानंतर देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही.  पाच राज्यातील विधानसभा निवडणूक निकालांनंतर पेट्रोल-डिझेलच्या दरांत (Petrol-Diesel Rate) विक्रमी वाढ होणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. त्यानंतरही देशात काही दिवस पेट्रोल-डिझेलचे दर स्थिर होते. त्यानंतर क्रूड ऑईलच्या दरांत सातत्यानं होणाऱ्या वाढीमुळं देशात पेट्रोल आणि डिझेलच्या दरांमध्ये वाढ झाली आहे. 

पेट्रोल आणि डिझेलचे दर (Petrol Diesel Price ) कुठे आणि कसे पाहाल?

इंडियन ऑईलचं  IndianOil ONE Mobile App  तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करुन तुम्ही तुमच्या जवळच्या इंडियन ऑईल पेट्रोल पंपावरील इंधनाचे दर जाणून घेऊ शकता.

इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर https://iocl.com/Products/PetrolDieselPrices.aspx पेट्रोल डिझेलचे दर (Petrol Diesel Price) सोप्या पद्धतीने पाहता येतील.

पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती ( Petrol Diesel Price ) एसएमएसद्वारे देखील कळू शकतात. इंडियन ऑईलच्या वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार, RSP आणि स्पेस देऊन आपल्या शहराचा कोड टाकून 92249992249 या क्रमांकावर एसएमएस करायचा आहे. हा कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर मिळेल. (शहरांचे कोड इंडियन ऑईलच्या वेबसाईटवर देण्यात आले आहेत). 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Syria war | Bashar al-Assad : पाश्चिमात्यांच्या सिरियामधील अघोरी युद्धात बशर अल असादांचे साम्राज्य नेस्तनाबूत; रशियामध्ये केलं पलायन
पाश्चिमात्यांच्या सिरियामधील अघोरी युद्धात बशर अल असादांचे साम्राज्य नेस्तनाबूत; रशियामध्ये केलं पलायन
आजपासून राज्यात थंडी वाढणार, शेकोटी पेटणार, पुढील 5 दिवस कसं असेल हवामान? पंजाबवराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज
आजपासून राज्यात थंडी वाढणार, शेकोटी पेटणार, पुढील 5 दिवस कसं असेल हवामान? पंजाबवराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज
Nandurbar Crime : कौटुंबिक वाद विकोपाला... नातवानेच काढला आजोबांचा काटा, नंदुरबार हादरलं!
कौटुंबिक वाद विकोपाला... नातवानेच काढला आजोबांचा काटा, नंदुरबार हादरलं!
BMC Election 2025: शेवटचा बालेकिल्ला वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंचा प्लॅन, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जुन्याजाणत्या कार्यकर्त्यांना सक्रिय करणार
शेवटचा बालेकिल्ला वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंचा प्लॅन, BMC निवडणुकीत जुन्या मोहऱ्यांना सक्रिय करणार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Bhaskar Jadhav  MVA : पुरेसं संख्याबळ नसलेल्या विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद मिळणार?CM Devendra Fadanavis : कोपर्डीतील पिडितेच्या बहिणीच्या लग्नाला फडणवीसांची हजेरी; दिलेला शब्द पाळला9 Sec News : 9 सेकंदात बातमी : 9 AM :9 डिसेंबर 2024: ABP MAJHAAbu Muhammad al Jolani Damascus : सिरीयाचे बंडखोर अबू मोहम्मद अल - जोलनी राजधानी दमास्कसमध्ये दाखल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Syria war | Bashar al-Assad : पाश्चिमात्यांच्या सिरियामधील अघोरी युद्धात बशर अल असादांचे साम्राज्य नेस्तनाबूत; रशियामध्ये केलं पलायन
पाश्चिमात्यांच्या सिरियामधील अघोरी युद्धात बशर अल असादांचे साम्राज्य नेस्तनाबूत; रशियामध्ये केलं पलायन
आजपासून राज्यात थंडी वाढणार, शेकोटी पेटणार, पुढील 5 दिवस कसं असेल हवामान? पंजाबवराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज
आजपासून राज्यात थंडी वाढणार, शेकोटी पेटणार, पुढील 5 दिवस कसं असेल हवामान? पंजाबवराव डखांनी वर्तवला नवीन अंदाज
Nandurbar Crime : कौटुंबिक वाद विकोपाला... नातवानेच काढला आजोबांचा काटा, नंदुरबार हादरलं!
कौटुंबिक वाद विकोपाला... नातवानेच काढला आजोबांचा काटा, नंदुरबार हादरलं!
BMC Election 2025: शेवटचा बालेकिल्ला वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंचा प्लॅन, मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी जुन्याजाणत्या कार्यकर्त्यांना सक्रिय करणार
शेवटचा बालेकिल्ला वाचवण्यासाठी आदित्य ठाकरेंचा प्लॅन, BMC निवडणुकीत जुन्या मोहऱ्यांना सक्रिय करणार
मुंबईकरांना कपाटातील स्वेटर बाहेर काढावेच लागले, 9 वर्षातील सर्वात कमी तापमान; निफाडमध्ये हाडं गोठवणारी थंडी
मुंबईकरांना कपाटातील स्वेटर बाहेर काढावेच लागले, 9 वर्षातील सर्वात कमी तापमान; निफाडमध्ये हाडं गोठवणारी थंडी
लाडक्या बहिणींना महिन्याला 7000 रुपये मिळणार, केंद्र सरकारची नवी स्कीम, काय आहे विमा सखी योजना?
लाडक्या बहिणींना महिन्याला 7000 रुपये मिळणार, केंद्र सरकारची नवी स्कीम, काय आहे विमा सखी योजना?
कसा नियतीचा फेरा..आर.आर. आबांनी सभागृहातून Exit घेतली त्याचदिवशी रोहित पाटलांची आमदारकीची शपथ
कसा नियतीचा फेरा..आर.आर. आबांनी सभागृहातून Exit घेतली त्याचदिवशी रोहित पाटलांची आमदारकीची शपथ
गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत मारकडवाडीत येणार, राम सातपुतेंची माहिती, म्हणाले, मोहिते पाटलांची जुलमी राजवट उध्वस्त करा
गोपीचंद पडळकर आणि सदाभाऊ खोत मारकडवाडीत येणार, राम सातपुतेंची माहिती, म्हणाले, मोहिते पाटलांची जुलमी राजवट उध्वस्त करा
Embed widget