एक्स्प्लोर

Narayan Rane : नारायण राणेंच्या बंगल्यावर हातोडा पडणार? मुंबई हायकोर्टाच्या सुनावणीकडे लक्ष

Narayan Rane : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबई महापालिकेच्या नोटीसविरोधात मुंबई हायकोर्टात दाखल केलेल्या याचिकेवर आज सुनावणी होणार आहे.

Narayan Rane : जुहू येथील बंगल्यातील अनधिकृत बांधकाम प्रकरणी मुंबई महापालिकेकडून मिळालेल्या नोटीसविरोधात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. नारायण राणे यांनी दाखल केलेल्या याचिकेवर हायकोर्टात आज सुनावणी होणार आहे. त्यामुळे राणे यांना दिलासा मिळणार का, याकडे लक्ष लागले आहे. मुंबई महापालिकेने बजावलेल्या नोटीसची मुदत संपत असल्याचे नारायण राणे यांनी हायकोर्टात याचिका दाखल केली.

मुंबई महापालिकेकडून केंद्रीय मंत्री नारायण राणेंना दुसऱ्यांदा नोटीस देण्यात आली. महापालिकेच्या 'के-पश्चिम' विभागाकडून काही दिवसांपूर्वी नारायण राणेंच्या 'अधिश' बंगल्यातील बांधकाम प्रकरणी नोटीस पाठवण्यात आली. पुढील 15 दिवसांत स्वत:हून अतिरीक्त अनधिकृत बांधकाम पाडून टाका, नाहीतर पालिकेला कारवाई करावी लागेल, असे पालिकेकडून या नोटीसमध्ये सांगण्यात आले. 

मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी नारायण राणे यांच्या अधिश बंगल्याची पाहणी केल्यानंतर राणे यांनी बंगल्यातील अंतर्गत बांधकाम अधिकृत असल्याचे सांगितले. ही कारवाई राजकीय सूडबुद्धीने करण्यात येत असल्याचाही आरोप त्यांनी केला होता. 

काय आहे केंद्रीयमंत्री राणे यांच्या अधिश बंगल्याचा वाद?

जुहूतील अधिश बंगल्यात अनधिकृत बांधकाम केल्याचे नमूद करत 351(1)ची नोटीस दिली आहे. बंगल्यात केलेले बदल मंजूर केलेल्या प्लॅननुसार असल्याचे सिद्ध करण्यास सांगितले होते. यानुसार राणे यांनी सर्व कागदपत्रे पालिकेला दाखवली. परंतु पालिकेचे समाधान न झाल्याने दुसरी नोटीस पाठवण्यात आली.  21 फेब्रुवारी पालिकेच्या 'के पश्चिम' विभागाने बंगल्यात जाऊन तपासणी  केली होती. सर्वच मजल्यांवर 'चेंज ऑफ यूज' झाले असून बहुतांश ठिकाणी गार्डनच्या जागी रूम बांधल्याचा नोटीसीत उल्लेख आहे.

माहिती अधिकार कार्यकर्त्याची तक्रार

माहिती अधिकार कार्यकर्ते संतोष दौंडकर यांनी नारायण राणे यांच्या बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाले असल्याची तक्रार यापूर्वीच मुंबई मनपाला केली होती. मात्र, आपल्या या तक्रारीनंतर कुठलीच कारवाई केली नसल्याचा आरोप संतोष दौंडकर यांनी केला होता. त्यानंतर आता मुंबई मनपाने नारायण राणे यांच्या बंगल्याची तपासणी करण्यासाठी नोटीस बजावली. मुंबई महानगरपालिका कायदा 1888 अंतर्गत सेक्शन 488 नुसार बीएमसीने केंद्रीय मंत्री नारायण राणेंना ही नोटीस पाठवण्यात आली.

काय आहेत आरोप?

- सीआरझेड क्लिअरन्सअंतर्गत चार मजल्यांची बिल्डिंग उभारण्याची परवानगी मात्र प्रत्यक्षात आठ मजले बांधले
- परवानगीपेक्षा अधिक एफएसआयचा वापर करण्यात आला
- सीआरझेड-यू क्षेत्रात बेसमेंट बेकायदेशीरपणे बांधले, सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशांचे उल्लंघन
- पालिकेच्या बिल्डिंग प्रपोजल अधिकाऱ्यांनी फ्रॉड केलाय
- वरील मजल्यांच्या आत असलेले आणि ओपन स्काय नसलेले आणि वरील मजल्यावर मोठे टेरेस गार्डन म्हणून दाखवले गेले आणि एफएसआय मोफत दिला गेला. यात देखील नियमांचे उल्लंघन
- जुन्या मंजूर केलेल्या लेआऊटचे उल्लंघन केल्यावर नवीन लेआऊट तयार करणे आवश्यक होते मात्र तसा कोणताही नवा लेआउट तयार केला नाही

महत्त्वाच्या बातम्या

Devendra Fadnavis: लोक मंदी,मंदी,मंदी बोलत बसलेत, पण आज भारत 94 टक्के कर्ज एका दिवसात फेडू शकतो, तिजोरीत परकीय चलनाचा प्रचंड साठा: देवेंद्र फडणवीस
लोक मंदी,मंदी,मंदी बोलत बसलेत, पण भारत 94 टक्के कर्ज एका दिवसात फेडू शकतो, तिजोरीत परकीय चलनाचा प्रचंड साठा: देवेंद्र फडणवीस
Devendra Fadnavis: पंतप्रधानांनी 25 कोटी लोकांना तीव्र गरीबीतून बाहेर काढलं, हा दशकातील चमत्कार, मोदी हे केवळ लाँगेस्ट नव्हे तर फायनेस्ट पंतप्रधान; देवेंद्र फडणवीसांकडून भरभरून स्तुतीसुमनं
पंतप्रधानांनी 25 कोटी लोकांना तीव्र गरीबीतून बाहेर काढलं, हा दशकातील चमत्कार, मोदी हे केवळ लाँगेस्ट नव्हे तर फायनेस्ट पंतप्रधान; देवेंद्र फडणवीसांकडून भरभरून स्तुतीसुमनं
Prasad Vedpathak White Line Controversy: इकडे भाजप नगरसेवकानं पोलिसांत तक्रार केली, तिकडे प्रसाद वेदपाठक मनसेच्या सर्वात डॅशिंग नेत्याला जाऊन भेटला, जैनांच्या पांढऱ्या पट्टीचा वाद आता राजकीय आखाड्यात?
इकडे भाजप नगरसेवकानं पोलिसांत तक्रार केली, तिकडे प्रसाद वेदपाठक मनसेच्या सर्वात डॅशिंग नेत्याला जाऊन भेटला, जैनांच्या पांढऱ्या पट्टीचा वाद आता राजकीय आखाड्यात?
Kirit Somaiya: मुंबईच्या महापौर बाजूला बसल्या असताना किरीट सोमय्या प्रचंड संतापले, पत्रकारांना म्हणाले, 'आधी माझा बाईट घ्या'
मुंबईच्या महापौर बाजूला बसल्या असताना किरीट सोमय्या प्रचंड संतापले, पत्रकारांना म्हणाले, 'आधी माझा बाईट घ्या'

व्हिडीओ

Sunetra Pawar Speech NCP Vardhapan Din : कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही; स्वकीयांना इशारा
Chhagan Bhujbal Speech NCP Vardhapan Din 2026 : तटकरेंच्या टोमण्यांना उत्तर, रोखठोख भुजबळ UNCUT
Sunil Tatkare Speech NCP Vardhapan Din 2026 : राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी भुजबळांना तुफान टोले
Amravati Vidhan Parishad : राजकीय आजार, अमरावतीत निवडणुकीचा बाजार? Special Report
Nashik Vidhan Parishad:नाशिकमधलं बंड शमलं, दरांडेंवरुन प्रश्न,गोकुळ गीतेंचा काढता पाय Special Report

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Devendra Fadnavis on El Nino: 2027 पर्यंत 'एल निनो'चे संकट, महाराष्ट्रावर काय होणार परिणाम? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला 'ॲक्शन प्लॅन'
2027 पर्यंत 'एल निनो'चे संकट, महाराष्ट्रावर काय होणार परिणाम? मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी सांगितला 'ॲक्शन प्लॅन'
Devendra Fadnavis: लातूरच्या शेतकऱ्याला सरकारने आजारी बैल दिला, प्रेस कॉन्फरन्समध्ये प्रश्न विचारताच फडणवीसांची ऑन द स्पॉट घोषणा, म्हणाले...
लातूरच्या शेतकऱ्याला सरकारने आजारी बैल दिला, प्रेस कॉन्फरन्समध्ये प्रश्न विचारताच फडणवीसांची ऑन द स्पॉट घोषणा, म्हणाले...
Devendra Fadnavis : 40 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा विनाअट लाभ, जिल्हा सहकारी बँकांसाठी एक अट ठेवली, देवेंद्र फडणवीस यांनी कारण सांगून टाकलं
40 लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा विनाअट लाभ, जिल्हा सहकारी बँकांसाठी एक अट ठेवली, देवेंद्र फडणवीस यांनी कारण सांगून टाकलं
NCP Merger in Congress: राष्ट्रवादीच्या नेत्यांची नकारघंटा, पण शरद पवारांना सामावून घेण्याबाबत दिल्लीत काँग्रेसचं गंभीर विचारमंथन, राज्यातील नेत्यांना...
राष्ट्रवादीच्या नेत्यांची नकारघंटा, पण शरद पवारांना सामावून घेण्याबाबत दिल्लीत काँग्रेसचं गंभीर विचारमंथन, राज्यातील नेत्यांना...
Devendra Fadnavis: पंतप्रधानांनी 25 कोटी लोकांना तीव्र गरीबीतून बाहेर काढलं, हा दशकातील चमत्कार, मोदी हे केवळ लाँगेस्ट नव्हे तर फायनेस्ट पंतप्रधान; देवेंद्र फडणवीसांकडून भरभरून स्तुतीसुमनं
पंतप्रधानांनी 25 कोटी लोकांना तीव्र गरीबीतून बाहेर काढलं, हा दशकातील चमत्कार, मोदी हे केवळ लाँगेस्ट नव्हे तर फायनेस्ट पंतप्रधान; देवेंद्र फडणवीसांकडून भरभरून स्तुतीसुमनं
Mumbai Local Train: ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल ठप्प, प्रवासी ट्रॅकवर उतरले
ओव्हरहेड वायर तुटल्याने हार्बर रेल्वेची वाहतूक विस्कळीत, लोकल ठप्प, प्रवासी ट्रॅकवर उतरले
FIFA World Cup 2026 : फिफा वर्ल्ड कपमध्ये मेक्सिको आणि दक्षिण कोरियाची विजयी सलामी, स्पर्धेतील पहिला गोल कोणाच्या नावावर?  
फिफा वर्ल्ड कपमध्ये मेक्सिको आणि दक्षिण कोरियाची विजयी सलामी, स्पर्धेतील पहिला गोल कोणाच्या नावावर?  
Devendra Fadnavis: लोक मंदी,मंदी,मंदी बोलत बसलेत, पण आज भारत 94 टक्के कर्ज एका दिवसात फेडू शकतो, तिजोरीत परकीय चलनाचा प्रचंड साठा: देवेंद्र फडणवीस
लोक मंदी,मंदी,मंदी बोलत बसलेत, पण भारत 94 टक्के कर्ज एका दिवसात फेडू शकतो, तिजोरीत परकीय चलनाचा प्रचंड साठा: देवेंद्र फडणवीस
Embed widget