एक्स्प्लोर

Maharashtra Breaking News 20 May 2022 : भिवंडी शहरातील आझादनगर परिसरात एका घराला अचानक आग

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra Breaking News 20 May 2022 : भिवंडी शहरातील आझादनगर परिसरात एका घराला अचानक आग

Background

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे.  त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय तसेच स्थानिक पातळीवरील घडणाऱ्या घडामोडींची सर्वात पहिली बातमी 'एबीपी माझा' आपल्या प्रेक्षक-वाचकांना देण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामध्ये आज राजकीय, सामाजिक, आर्थिक घडामोडींपासून ते खेळ आणि मनोरंजनाच्या बाबतीत अपडेट्स देण्याचा प्रयत्न असतो. आपल्या प्रेक्षक-वाचकांना अप-टू-डेट ठेवण्याचा एक भाग म्हणून आम्ही आज दिवसभरात काय-काय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत याची माहिती देत आहोत.

आज दिवसभरात वेगवेगळ्या बातम्यांची ही नांदी आहे. ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी.. पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना, कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी... या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..

ज्ञानवापी मशिदीबाबत सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी 

ज्ञानवापी मशिदीबाबत सर्वोच्च न्यायालयात उद्या सुनावणी आहे. वाराणसीतील कोर्टाला सुनावणी न करण्याचे सुप्रीम कोर्टाने आदेश दिले आहेत. वाराणसी कोर्टातील सुनावणीला सुप्रीम कोर्टाने मनाई केली आहे

नवज्योतसिंग सिद्धू  पोलिसांना शरण येण्याची शक्यता

पंजाब काँग्रेसचे माजी अध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू यांना एका वर्षाच्या तुरुंगवासाची शिक्षा देण्यात आली आहे. 1988 च्या रोड रेज प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला आहे. आज नवज्योतसिंग सिद्धू  पोलिसांना शरण येण्याची शक्यता आहे. 

मनोरंजन विश्वातील घडामोडी

  • बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यनचा  'भूल भुलैया 2'  हा सिनेमा आज प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 
  • कंगना रनौतचा धाकड चित्रपट आज सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे.
  • अॅमेझॉन प्राईमवर पंचायत - 2 प्रदर्शित होणार आहे.
  • बॉलीवूड अभिनेता शाहिद कपूरचा जर्सी चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
  • एसएस राजमौली यांचा आरआरआर चित्रपट आजपासून 'झी-5' वर उपलब्ध होणार आहे.
  • अभिजित पानसे लिखीत, दिग्दर्शित ‘रानबाजार’ या वेब सीरिजच्या टीझरने सोशल मीडियावर चांगलाच धुमाकूळ घातला होता. प्लॅनेट मराठीवर हा चित्रपट प्रेक्षकांसाठी उपलब्ध असणार आहे

आज इतिहासात

  • 1489- पोर्तुगिजचा खलाशी वास्को दा गामा याचे भारतात पाऊल
  • 1900- हिंदीतील प्रसिद्ध कवी सुमित्रानंद पंत यांचा जन्मदिन.
  • 1929- स्वातंत्र्यसैनिक राजकुमार शुक्ल यांचं आजच्या दिवशीच निधन झालं होतं. 
  • 1932- भारतीय जहालमतवादी नेते बिपिन चंद्र पाल यांचं निधन
  • 1957- स्वातंत्र्यसेनानी आणि आंध्रचे पहिले मुख्यमंत्री टी प्रकाशम यांचे निधन
  • 1965- अवतार सिंग चिमाने माऊंट एवरेस्ट सर केले
  • 1998- मल्टीबॅरल रॉकेट प्रणाली ‘पिनाका’ चे पहिल्यांदाच यशस्वी परिक्षण करण्यात आलं.
22:13 PM (IST)  •  20 May 2022

भिवंडी शहरातील आझादनगर परिसरात एका घराला अचानक आग

भिवंडी शहरात पुन्हा अग्नितांडव पाहायला मिळाले आहे.  शहरातील आझादनगर परिसरात एका घराला अचानक आग लागली आहे.  घरातील सर्व साहित्य जळून खाक झाले आहे. आगीचे कारण अस्पष्ट असून कोणतीही जीवितहानी झाली नाही. स्थानिक नगरसेवक व स्थानिकांच्या मदतीने आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहे. रस्ते अरुंद असल्याने अग्निशमन दलास पोहचण्यास अडचण निर्माण होत आहे.

21:26 PM (IST)  •  20 May 2022

Amravati News Update : अमरावतीमधील धारणी शहरातील डाबर मोहल्ह्यात आगीत सहा घरे जळून खाक 

अमरावतीमधील धारणी शहरातील डाबर मोहल्ह्यात आग लागून सहा घरे जळून खाक झाली आहेत.  या आगीत एका सिलेंडरचा स्फोट झाला असून तीन शेळ्यांचा मृत्यू झाला आहे.  

21:12 PM (IST)  •  20 May 2022

जिल्ह्यात येणाऱ्या मोदी सरकारच्या महत्वकांक्षी प्रकल्पांना अजित पवारांचा दुजोरा?

महागाई बेरोजगारी या महत्त्वाच्या मुद्द्यांवरून लक्ष भरकवण्यासाठी भोंगे हनुमान चालीसा यांचा विरोधक आधार घेत अजित पवार यांनी विरोधकांना खडे बोल सुनावले राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी नेते अजित पवार आज पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते अजित पवार यांच्याहस्ते डहाणू जनता सहकारी त्यानंतर डहाणूत राष्ट्रवादीच्या आयोजित कार्यकर्ता मेळाव्यात अजित पवार बोलत होते . ज्या प्रकल्पांमधून स्थानिकांना रोजगार उपलब्ध होईल अशा कोणत्याही प्रकल्पाला स्थानिक नागरिकांनी विरोध करू नये असे आवाहन यावेळी अजित पवार यांनी राज्यातील नागरिकांना केलं मोठ्या प्रमाणावर रोजगार निर्माण होत असून भौगोलिक परिस्थिती योग्य असेल त्या ठिकाणी बंदर उभारले जातात असं सांगत अजित पवार यांनी केंद्रातील मोदी सरकारच्या महत्त्वाकांक्षी असलेल्या वाढवण बंदराचा समर्थन केल आहे . तसेच डहाणू हरित पट्ट्यात येत असल्याने दहानु चा विकास कुंटलयाचं सांगत राज्य सरकारच्या अखत्यारीत असेल तो सर्व प्रयत्न करणार असल्याचा अजित पवार यांनी सांगितल . राज्यात तीन पक्षांची महा विकास आघाडी असली तरी काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना या तीनही राजकीय पक्षांना आपापला पक्ष वाढवण्याचा पूर्ण अधिकार आहे त्यामुळे जे काही निर्णय व्हायचे ते वरिष्ठ पातळीवर होतील मात्र कार्यकर्त्यांनी आपलं काम जोमाने सुरू ठेवा असे आवाहनही या वेळी अजित पवार यांनी कार्यकर्ते मेळाव्यात कार्यकर्त्यांना केलं . मागील अडीच वर्षापासून आम्ही राज्यातील नागरिकांचा जीव वाचविण्यात व्यस्त होतो त्यामुळे सर्व जिल्ह्यांना योग्य तो निधी देता आला नाही मात्र आत्ता मागणीनुसार निधी देणार असल्याचंही अजित पवार यांनी सांगितलं
 
 
21:11 PM (IST)  •  20 May 2022

बारामतीतील आंबा निर्यातदाराचा आंबा थेट व्हाइट हाऊसमध्ये पोहोचला

बारामतीतील आंबा निर्यातदाराचा आंबा थेट व्हाइट हाऊसमध्ये पोहोचला आहे. भारतीय आंबा व्हाइट हाऊसमध्ये पोहोचल्याची माहिती अभिजित भसाळे यांनी दिली आहे.. अभिजित भसाळे हे रेम्बो इंटरनॅशनल एक्स्पोर्ट चे संचालक आहेत. बारामतीतील जळोची येथील कृषी उत्पन्न बाजार समितीत रेम्बो इंटरनॅशनल आणि महाराष्ट्र पणन विभागाने करार केला आहे. त्याच उद्देशाने अभिजित भसाळे हे रेम्बो इंटरनॅशनल माध्यमातून विविध ठिकाणी आंबा निर्यात केली जाते. बारामतीतून पणन आणि रेम्बो इंटरनॅशनलने 2015 पासून आंबा निर्यातिला सुरुवात केली आहे.. फळांचा राजा म्हणून आंब्याची ओळख आहे. आता हाच भारतातील आंबा हा अमेरिकेत पोहोचला आहे. बारामतीतील जळोची येथील रेम्बो इंटरनॅशनल एक्स्पोर्टने भारतातील आंबा हा थेट व्हाईट हाऊस मध्ये पोहोचला आहे. गेल्या दोन वर्षांत कोरोनामुळे आंब्याची निर्यात अमेरिकेत होऊ शकली नाही. रेम्बो इंटरनॅशनलच्या मार्फत जगात विविध ठिकाणी भारतीय आंबा पोहोचवला जातो. आता भारतीय आंब्याची भुरळ अमेरिकेतील राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या ऑफिसला देखील पडली आहे. त्यामुळे बारामतीच्या शिरपेचात मनाचा तुरा रोवला गेला आहे..

 
20:56 PM (IST)  •  20 May 2022

महापालिका निवडणूकीच्या तोंडावर शिवसेनेचा नवा उपक्रम येत्या १ जूनपासून सुरु होणार

महापालिका निवडणूकीच्या तोंडावर शिवसेनेचा नवा उपक्रम येत्या १ जूनपासून सुरु होणार, मुंबईकरांच्या सृदृढ आरोग्यासाठी शिव योगा 
 
मुंबईकरांच्या सृदृढ आरोग्यासाठी आता शिव योगा सेंटर सुरु करण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. 
 
१ जूनपासून सुरु होणाऱ्या शिव योगा सेंटरच्या माध्यमातून मुंबईकरांना योगाचे धडे देण्यात येणार आहेत.
 
 योगाचे धडे घेण्यासाठी किमान ३० जणांचा ग्रुप गरजेचा असून तज्ज्ञ प्रशिक्षकांकडून योगाचे धडे दिले जाणार  जातील
 
दरम्यान, योगाचे धडे देणाऱ्या एका प्रशिक्षकाला दोन तासांचे एक हजार रुपये देण्यात मानधन देण्यात येणार आहे..
 
खाजगी सोसायट्यांत योगा सेंटर
मुंबईत अनेक सोसायट्या असून सोसायटीत जागा उपलब्ध असल्यास त्या ठिकाणी योगाचे धडे दिले जाणार आहेत. परंतु किमान ३० जाणांचा समुह असणे गरजेचे आहे. 
 
या उपक्रमासाठी पालिकेकडून तज्ज्ञ संस्थेच्या माध्यमातून प्रशिक्षकांची निवड करण्यात येत आहे. या उपक्रमासाठी संस्थेची निवड अंतिम करताना आयुष मंत्रालयाचा सल्लाही घेतला जाणार आहे. प्रत्यक्षात उपक्रम राबवणार्‍या संस्थेची पात्रता निश्चित करताना मान्यताही तपासली जाणार आहे.
 
अर्थसंकल्पात २५ कोटींची तरतूद
- मुंबईत एकूण २०० ‘शिव योग’ केंद्रे सुरू केली जाणार आहेत. यामध्ये पहिल्या टप्प्यात १०० केंद्रे सुरू करण्यात येतील. या आर्थिक वर्षासाठी २५ कोटींची तरतूद करण्यात आली आहे...
 
‘शिव योग’ केंद्रांवर प्रत्यक्ष सूचना देणे आणि लक्ष ठेवण्यासाठी प्रशिक्षकांचे पॅनल तयार करण्यात येणार आहे. मुंबईत एकूण २०० ‘शिव योग’ केंद्रे  सुरू केली जाणार आहेत.
Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sanjay Patil vs NCP : कवठे महांकाळमधील वादात मोठा ट्वीस्ट, संजकाकांविरोधातील तक्रार मागे घेतलीTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान सुपरफास्ट आढावा: 08 PM : 28 September 2024 : ABP MajhaNashik : नाशिकमध्ये महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांच्या पुतळ्याचं लोकार्पणUjjwal Nikam on Vidhan Sabha Elections  : उमेदवाराची पार्श्वभूमी गुन्हेगारी असल्यास काय होणार?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
महात्मा फुले अन् सावित्रीमाईंचा भव्य दिव्य पुतळा; स्मारकासाठी किती खर्च?
Raj Thackeray: राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
राज ठाकरेंचा विदर्भ दौरा आटोपला, मित्राविरुद्ध उमेदवार; नागपूरमध्ये मनसे विधानसभा लढणार?
Jay Shah: जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
जय शाहांची मोठी घोषणा; IPL क्रिकेटर्स आणखी मालामाल, प्रत्येक मॅचसाठी पैसे मिळणार
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
रोहित पवारांच्या कामात खोडा घालू नका, उभं करायला अक्कल लागते, शरद पवारांचा राम शिंदेंना टोला
Drone terror: रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
रात्री दहशत पसरवणाऱ्या ड्रोन नाट्यावर पडदा, नक्की काय होते कारण? पोलिसांनी केला उलगडा...
Vidhansabha 2024 : राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
राज ठाकरेंची भेट, BRS ला रामराम; कोण आहेत प्रहारचे जयकुमार बेलखडे?
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
Video : नादच खुळा... अभिजीत बिचुकलेंची एंट्री, मै हूँ डॉन गाणं वाजलं; बिग बॉसच्या घरात 'नवा राडा'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 28 सप्टेंबर 2024 | शनिवार
Embed widget