एक्स्प्लोर

Maharashtra Breaking News 20 August 2022 : राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra Breaking News 20 August 2022 : राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...

Background

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू..

डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज नऊ वर्ष

डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येला आज नऊ वर्ष पूर्ण होतायत.  यानिमित्ताने अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या दोन गटांकडून वेगवगेळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलंय.  अविनाश पाटील अध्यक्ष असलेल्या गटाकडून सकाळी 7 वाजता डॉक्टर नरेंद्र दाभोलकरांची जिथे हत्या करण्यात आली तिथून महात्मा फुले पुतळ्यापर्यंत निर्भया वॉकचे आयोजन करण्यात आलंय. 

मुंबई भाजपाकडून कार्यकर्ता मेळावा 

मुंबई भाजपाकडून कार्यकर्ता मेळावा आणि शेलार आणि मंगलप्रभात लोढा यांचा सत्कार समारंभ होणार आहे. यावेळी देवेंद्र फडणवीस मार्गदर्शन करणार आहेत. 

आदित्य ठाकरे जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर

जळगाव जिल्ह्यातील  सेनेचे पाच आमदार शिंदे गटात गेल्या नंतर उद्धव सेनेला मोठा झटका बसला आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे बंडखोर आमदार किशोर पाटील, गुलाबराव पाटील आणि चिमण आबा पाटील यांच्या मतदार संघात तर जाणार आहेत. सकाळी 11 पासून दौऱ्याची सुरुवात होईल. दुपारी आदित्य ठाकरे धुळ्यात येतील. पारोळा चौफुली येथे आदित्य ठाकरेंचं स्वागत केलं जाणार आहे. 

 विरोधी पक्षनेते अजित पवार आजपासून दोन दिवसांच्या अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर 

 विरोधी पक्षनेते अजित पवार आजपासून दोन दिवसांच्या अमरावती जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी 8.30 वाजता त्यांचं अमरावतीत आगमन होईल. त्यानंतर ते मेळघाटला रवाना होतील. मेळघाटातील भोकरबर्डी येथील अतिवृष्टीग्रस्त भागाची ते पाहणी करतील. त्यानंतर प्राथमिक आरोग्य केंद्र कळमखार तालुका धारणी येथे भेट देणार आहे. त्यांनतर उपविभागीय अधिकारी कार्यालय धारणी येथे कुपोषणग्रस्त बालक / बाल मृत्यू / गर्भवती महिला यांच्या संदर्भात काम करणाऱ्या स्वयंसेवी संस्था समवेत चर्चा करणार आहेत. 
 
 राजीव गांधी यांची 78 वी जयंती
 
 राजीव गांधी यांच्या 78 व्या जयंतीनिमित्त काँग्रेसकडून कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

22:57 PM (IST)  •  20 Aug 2022

आदित्य ठाकरे यांच्या धुळ्यातील सभेवेळी स्टेजवर चेंगराचेंगरी

युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या धुळे येथे आगमनादरम्यान नियोजना अभावी स्टेजवर चेंगराचेंगरी झाली आहे.  आदित्य ठाकरे स्टेजवर पोहोचताच कार्यकर्त्यांची एकच उडाली झुंबड उडाली.  या कार्यक्रमादरम्यान नियोजनाचा अभाव दिसून आला. आदित्य ठाकरे यांचे भाषण संपल्यानंतर परतताना देखील स्टेजवरून बहुतांश कार्यकर्त्यांची स्टेजवरून पडझड झाली. 

21:59 PM (IST)  •  20 Aug 2022

Beed : कड्यात रंगला गाईच्या डोहाळ्याचा कार्यक्रम; वाजत गाजत गावातून निघाली गाईची मिरवणूक

Beed : बीड जिल्ह्यातल्या कडा गावातील देशमुख कुटुंबियांनी आपल्या गावरान गाईच्या डोहाळे जेवणाच्या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कडा येथील जयश्री आणि विजय देशमुख यांच्याकडे एक गावरान गाय असून या गाईचे डोहाळे जेवणाचा कार्यक्रम करण्याचं त्यांनी ठरवलं. त्याप्रमाणे एखाद्या सुवासिनीसारख गाईला सजवण्यात आलं होतं. या गाईची वाजत गाजत मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकी दरम्यान या गाईचं औक्षण देखील महिलांनी केलं. गाईला खाण्यासाठी वेगवेगळ्या पदार्थांचा रुकवत देखील तयार करण्यात आला होता. डोहाळेच्या या कार्यक्रमाला आलेल्या देशमुख कुटुंबियांनी 21 गोपालकांना गाईची पितळ्याची मूर्ती देऊन सत्कार केला.
21:15 PM (IST)  •  20 Aug 2022

आम्ही गद्दार नाही आम्ही खुद्दारच आहोत; मंत्री गुलाबराव पाटील यांचा आदित्य ठाकरेंना टोला

धरणगाव येथील सभेत आदित्य ठाकरे यांनी जे शिवसेना सोडून गेले ते गद्दार अशी टीका केली होती. या टीकेवर  गुलाबराव पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. आम्ही गद्दार नाही तर आम्ही खुद्दार आहोत असे उत्तर मंत्री गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांना दिलंय.

आम्ही जो प्रयत्न केला तो शिवसेना वाचवण्यासाठीच केला. मात्र शिवसेना वाचवण्यासाठी केलेला हा प्रयत्न त्यांना आवडलेला नाही. त्यामुळेच ते आमच्यावर टीका करत आहेत. मात्र आम्ही गद्दर नाही तर आम्ही खुद्दार आहोत असे म्हणत मंत्री गुलाबराव पाटील यांनी गद्दार म्हणणाऱ्या आदित्य ठाकरे यांना टोला लगावला आहे.  

20:47 PM (IST)  •  20 Aug 2022

कोयना प्रकल्पग्रस्तांच्या आमरण उपोषणाचा आज पाचवा दिवस, पाच जणांची प्रकृती खालावली 

रत्नागिरी : कोयना जलविद्युत प्रकल्पासाठी भुमीअधीग्रहण करून 60 वर्षे पूर्ण झाली. तरीसुद्धा प्रकल्पग्रस्त नोकरीच्या प्रतिक्षेत आहेत. मागण्या पूर्ण करण्यासाठी प्रकल्पग्रस्तांचे हे चौथे आमरण उपोषण असून उपोषणाचा आजचा पाचवा दिवस आहे. पाचव्या दिवशी पाच उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यांना कामथे येथील कुटीर रुग्णालय येथे अति दक्षता विभागामध्ये ठेवण्यात आले आहे.

20:40 PM (IST)  •  20 Aug 2022

मुंबई- गोवा महामार्गावरील चिपळूणच्या पागनाक्यावर अपघात, सावर्डे कोंडमाळा येथील तरूणाचा मृत्यू

मुंबई- गोवा महामार्गावरील चिपळूणच्या पागनाक्यावर झालेल्या अपघातात सावर्डे कोंडमाळा येथील किरण कृष्णा घाणेकर याचा मृत्यू झालाय. महामार्गावरील खड्डे चुकवताना हा अपघात झाला. अपघात मृत्यू झालेल्या युवकाच्या नातेवाईकांनी दीड तास मुंबई गोवा महामार्ग रोखून धरला.  

ठेकेदाराच्या गलथान कारभारामुळे हा अपघात झाला आहे असा नातेवाईकांनी आरोप करत महामार्ग रोखला. अखेर स्थानिकांच्या आणि पोलिसांच्या मध्यस्थीने मृत व्यक्तीच्या कुटुंबाला दहा लाख रूपयांची मदत कंपनीच्या ठेकेदाराकडून जाहीर करण्यात आली. त्यानंतर महामार्गावरील ठप्प असलेली वाहतूक सुरु करण्यात आली. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : ABP Majha Marathi News Headlines 11PM TOP Headlines 11PM 07 July 2024Navi Mumbai Rain Special Report : मुसळधार पावसानं नवी मुंबईला अक्षरश: धुतलंDada Bhuse On Ladki Bahin : मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे महाराष्ट्राने स्वागत केले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar :
Radhakrishna Vikhe Patil Ahmednagar : "निलेश लंके यांच्याशी चर्चा करण्याची माझी तयारी"
Neetu Kapoor Birthday : वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
वेश्या व्यवसायातून पळून मुलीला सुपरस्टार बनवलं, कोठा ते फिल्म इंडस्ट्री अभिनेत्री नीतू कपूरच्या आईची संघर्षमय कहाणी
Lightning : काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
काळे कपडे घातल्यावर वीज कोसळण्याचा धोका जास्त? या दाव्यामागचं नेमकं सत्य जाणून घ्या
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
वाहत्या पुरात उडी मारली अन् वाहून जाणाऱ्या महिलेला वाचवलं, वाहतूक पोलीस आणि वार्डन देवदुतासारखे आले
Accident : काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
काळा रविवार, विविध दुर्घटनांत 5 ठार; पुणे, मुंबई, संभाजीनगरमध्ये अपघात
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मनोज जरांगेंचा नांदेड दौरा, शहरातील शाळांना सुट्टी जाहीर; गुणरत्न सदावर्तेंचं कायद्यावर बोट
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
मित्रासाठी काहीपण! कैद असलेल्या मित्राच्या वाढदिवसानिमित्त कारागृहात फोडले बॉम्ब; एक्सप्रेसवरुन सिनेस्टाईल थरार
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
लाडक्या बहि‍णींना देता, दाजींचं काय?, अमोल कोल्हेंचा सवाल; मनसेनंही भावांसाठी झळकावले बॅनर
Embed widget