एक्स्प्लोर

Maharashtra Breaking News LIVE Updates : बीडमधील गेवराईचे तहसीलदार सचिन खाडे यांच्याविरुद्ध गेवराई पोलिस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल

Maharashtra Breaking News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra Breaking News LIVE Updates : बीडमधील गेवराईचे तहसीलदार सचिन खाडे यांच्याविरुद्ध गेवराई पोलिस ठाण्यात तीन वेगवेगळे गुन्हे दाखल

Background

1. राज्यभरात शिवजंयतीचा उत्साह, चांद्यापासून बांद्यापर्यंत वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन, एबीपी माझाचाही रयतेच्या राजाला मानाचा मुजरा
Shiv Jayanti 2022: महाराष्ट्राचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांनी सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातील मावळ्यांना संघटीत करुन रयतेचं स्वराज्य स्थापन केलं. लोककल्याणकारी राज्याचा आदर्श प्रस्थापित केला. महाराष्ट्राची अस्मिता जागवून अटकेपार झेंडा लावण्याची, दिल्लीच्या तख्ताला धडक देण्याची हिंमत, ताकद त्यांनी महाराष्ट्राला दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी जागवलेला महाराष्ट्राभिमान गेल्या चार शतकात जन्मलेल्या राज्यातल्या प्रत्येक पिढीनं प्रसंगी प्राणांचं बलिदान देऊन जपला. 

महाराष्ट्र कुणापुढे झुकला नाही, यापुढेही झुकणार नाही हा महाराष्ट्राभिमान महाराष्ट्रवासियांमध्ये जागवण्याचं श्रेय सर्वार्थानं छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्य, शौर्य, धैर्य, पराक्रम आणि विचारांना आहे. छत्रपती शिवाजी महाराजांसारखा युगपुरुष महाराष्ट्रभूमीत जन्मला हे भाग्य असून त्यांना आदर्शस्थानी ठेवूनंच महाराष्ट्राची आजवरची वाटचाल राहीली आहे, यापुढेही तशीच राहील

आज जयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्याचे स्मरण करुन शिवजयंतीनिमित्त ठिकठिकाणी त्यांना कृतज्ञतापूर्वक वंदन केलं जात आहे.  छत्रपती शिवाजी महाराज जगातील सर्वकालीन सर्वश्रेष्ठ राज्यकर्ते आहेत. महाराजांनी संघर्षातून स्वराज्य निर्माण केलं आणि ते रयतेला अर्पण केलं. महाराज भोगवादी राजे नव्हते, ते रयतेचे राजे होते. शेतकऱ्यांचे कैवारी होते. कलावंतांचे आश्रयदाते होते. लोककल्याणकारी राज्याची संकल्पना त्यांनी अस्तित्वात आणली. त्यांनी स्थापन केलेलं स्वराज्य रयतेच्या कल्याणासाठी होतं. 

महाराज दूरदृष्टीचे नेते होते, बिकट प्रसंगात त्यांनी प्रसंगी तात्पूरती माघार घेतली, परंतु रयतेला धोका होईल, असा निर्णय घेतला नाही. महाराजांच्या या इतिहासातून आजच्या राज्यकर्त्यांनी धडा शिकला पाहिजे. शिवाजी महाराजांच्या जीवनातला कुठलाही प्रसंग, त्यांच्या कुठल्याही निर्णयाचा अभ्यास केल्यानंतर, त्यांनी घेतलेला प्रत्येक निर्णय स्वराज्याचं हित, जनतेचं कल्य़ाण, डोळ्यासमोर  ठेवून, दूरदृष्टीनं घेतला होता, हे आपल्या लक्षात येईल.  

2.मातोश्रीवरील चौघांसाठी ईडीची नोटीस तयार, ट्विट करत राणेंचा गौप्यस्फोट, सुशांतसिंह -दिशा सॅलियन प्रकरणाचा पुन्हा तपास करण्याचा इशारा, आज सकाळी 11 वाजता पत्रकार परिषद

3. अन्वय नाईक यांच्या पत्नी आणि मुलीला पोलीस संरक्षण, सोमय्यांकडून बदनामी सुरु असल्याची गृहमंत्र्यांकडे तक्रार, तर आत्महत्येपूर्वी सोमय्यांनी नाईकांना धमकावल्याचा राऊतांचा दावा

4.ऑनलाईन परीक्षेतील कॉपी बहाद्दरांचा एबीपी माझाकडून पंचनामा, पैसे मोजून ऑनलाईन उत्तर मिळवल्याचं उघड, तर कॉपीसाठी मदत करणाऱ्यांवर कारवाई करण्याचं मंत्र्यांचं आश्वासन

5. अखेरच्या षटकापर्यंत चाललेल्या टी-20 सामन्यात भारताचा वेस्ट इंडिजवर रोमहर्षक विजय, मालिकाही जिंकली, गुणतालिकेवर पाहुण्यांचा भोपळा

23:49 PM (IST)  •  19 Feb 2022

नागपूर अमरावती महामार्गावर बाजारगाव जवळ ट्रक आणि कारच्या भीषण अपघात, तिघांचा मृत्यू  

नागपूर अमरावती महामार्गावर बाजारगाव जवळ ट्रक आणि कारच्या भीषण अपघात झाला आहे. यामध्ये तिघांचा मृत्यू  झाला आहे. 

21:24 PM (IST)  •  19 Feb 2022

भरधाव टेंपोची उभ्या पिकअपला धडक; एकाचा मृत्यू , १९ जखमी

भरधाव वेगातील टेंपोने रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या पिकअपला पाठीमागून धडक दिली. या अपघातात पिकअपच्या मागे थांबलेल्या चालकाचा दोन्ही वाहनात चिरडून जागीच मृत्यू झाला तर पिकअपमधील १९ जण जखमी झाले. हा अपघात अंबाजोगाई - लातूर रोडवर बर्दापूर पाटीनजीक आज सकाळी झाला अपघातातील मयत आणि जखमी लातूर जिल्ह्यातील आजनी बु. (ता. शिरूर अनंतपाळ) येथील आहेत.
 
19:26 PM (IST)  •  19 Feb 2022

मार्च महिन्यात मोठ्या प्रमाणावर निर्बंध शिथिल होतील -राजेश टोपे

मार्च महिन्यात मोठ्या पद्धतीने निर्बंध शिथिल केले जातील, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची हीच इच्छा असल्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितले.  

18:40 PM (IST)  •  19 Feb 2022

Raigad News Update : मुंबई-पुणे राष्ट्रीय महामार्गावर बोरघाटात अपघात, दोघांचा मृत्यू 

Raigad News Update : मुंबई-पुणे एक्स्प्रेस मार्गावर बोरघाटात भरधाव कंटेनरने कारला धडक दिल्याने अपघात झाला आहे. या अपघातात दोघांचा मृत्यू झाला असून पाच ते सहा प्रवाशी जखमी झाले आहेत. 

18:31 PM (IST)  •  19 Feb 2022

expressway : पुणे एक्स्प्रेस मार्गावर बोरघाटात आज पुन्हा अपघात, भरधाव कंटेनर ट्रेलर चार कारला धडक..

mumbai pune expressway : मुंबई पुणे एक्स्प्रेस मार्गावर आज दुपारच्या सुमारास झालेला अपघात खूप विचित्र होता. यामध्ये, मुंबईकडे येणाऱ्या चालकाचे ट्रेलरवरचे नियंत्रण सुटले आणि त्याने पुढे जाणाऱ्या हुंडाय कारला जोरदार ठोकर दिली...  त्यानंतर या भरधाव ट्रेलरने काही अंतरावर असलेल्या क्रेटा कारला धडक दिल्याने क्रेटा कारवरील चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने ती रस्त्याच्या मधोमध असलेल्या मिडियन गार्डन मध्ये शिरली... 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Vidhan Sabha Election : राज्यात 157 बंडखोर रिंगणात, पक्षांकडून बंडखोरांवर धडक कारवाईKolhapur Vidhan Sabha Election : कोल्हापुरातली नामुष्की काँग्रेस कशी पुसून टाकणार? Special ReportSharad Pawar Retirement : पवारांचे पुन्हा निवृत्तीचे संकेत, बारामतीकरांसमोर सहानुभूती कार्डचा वापर?Vidhan sabha Superfast :  महाराष्ट्र सुपरफास्ट न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Sharad Pawar : आता कुणी दम दिला तर मला कळवा, तुमच्यासह त्यांच्या घरी येतो, मग चेअरमन असो की कोणी असो, शरद पवारांचा थेट इशारा
मला या रस्त्यानं जायचं नाही, माणसं आपली आहेत, त्यांना कुणीतरी दम दिला असेल, त्यांना एक सांगणं.. : शरद पवार
Kolhapur : सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
सतेज पाटलांच्या समोर शाहू महाराजांची घोषणा, कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
लाडक्या बहि‍णींना महिन्याला 2100, वीज बिलात 30 टक्के सूट; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या 10 मोठ्या घोषणा
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
महायुतीच्या सुनिल शेळकेंचं टेन्शन वाढलं, मनसेचा बापू भेगडेंना पाठिंबा; मावळ पॅटर्न सुस्साट
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
निवडणुकांच्या रणधुमाळीत पोलिसांनी नाक्यावर पकडली कार; 2.30 कोटीचं घबाड, भरारी पथकाकडून जप्त
Eknath Shinde: लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
लाडक्या बहि‍णींसाठी 100 वेळा तुरुंगात जायला तयार; मुख्यमंत्री शिंदेंचा विरोधकांवर नेत्यांवर पलटवार
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
कारमध्ये गॅस भरताना भीषण स्फोट, ओमिनी जळून खाक; 4 जण जखमी, रुग्णालयात दाखल
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 5 नोव्हेंबर 2024 | मंगळवार
Embed widget