(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Maharashtra Breaking News LIVE Updates : बीडमधील टेंडर वाद पेटला, पिस्तुल रोखल्याप्रकरणी संतोष पवारसह तिघांवर गुन्हा
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
इस्लाम धर्मातील पवित्र रमजान महिन्याला सुरुवात, पंतप्रधान मोदींनी दिल्या शुभेच्छा
इस्लाम धर्मातील पवित्र रमजान महिन्याला आजपासून सुरुवात झाली आहे. इस्लामिक कॅलेंडरचा नववा महिना रमजानचा आज पहिला दिवस म्हणजेच पहिला उपवास आहे. रविवारी चंद्र दिसल्यानंतर रमजानच्या महिन्याला सुरुवात झाली आहे. रमजानच्या पवित्र महिन्यात मुस्लिम बांधव महिनाभर उपवास करतात. महिनाभर उपवास केल्यानंतर, ईदचा चंद्र पाहिल्यानंतर पुरुष आणि मुले ईदगाहमध्ये आणि महिला घरांमध्ये ईदची नमाज अदा करतात. पवित्र महिन्याचा चंद्र पाहिल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून रमजान महिन्याला सुरुवाती झाल्याच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. पंतप्रधानांनी ट्विट केले की, 'हा पवित्र महिना लोकांना गरीबांची सेवा करण्याची प्रेरणा देईल. यामुळे आपल्या समाजात शांतता, सौहार्द आणि करुणेची भावना अधिक वाढण्यास मदत होईल.'
मुंबै बँक मजूर प्रकरणात मुंबई पोलीस चौकशी करणार, प्रवीण दरेकर यांना सोमवारी हजर राहण्याचे आदेश
मुंबै बँक मजूर प्रकरणात विधानपरिषदेचे विरोधी पक्ष नेते प्रवीण दरेकर यांना मुंबई पोलिसांनी नोटीस बजावली आहे. प्रवीन दरेकर यांना सोमवारी (4 एप्रिल) मुंबईतील माता रमाबाई आंबेडकर पोलीस ठाण्यात हजर होण्याचे आदेश देण्यात आले आहे. आम आदमी पार्टीच्या वतीने धनंजय शिंदे यांनी प्रवीण दरेकर यांच्याविरोधात तक्रार नोंदवली होती. मजूर नसतानाही याच प्रवर्गातून मुंबै बँकेच्या संचालकपदाची निवडणूक लढवून सुमारे 20 वर्षे सरकारची फसवणूक केल्याचा आरोप दरेकर यांच्यावर आहे. त्यानंतर प्रवीण दरेकर यांच्याविरोधात फसवणुकीच्या गुन्ह्याची नोंद झाली. या प्रकरणात प्रवीण दरेकर यांची मुंबई पोलीस चौकशी करणार आहेत. मुंबई पोलिसांनी प्रवीण दरेकर यांना नोटीस बजावली असून त्यांना सोमवारी सकाळी 11 वाजता पोलीस स्टेशनमध्ये हजर राहण्याच्या सूचना देण्यात आली आहे.
'ज्या मशिदींवर भोंगे लागतील, त्याच्या समोर हनुमान चालिसा लावू', राज ठाकरे यांचा इशारा
''प्रार्थनेला माझा विरोध नाही. मात्र मशिदींवरील लागलेले भोंगे खाली उतरावावे लागतील, हा निर्णय सरकारने घ्यावा लागले. निर्णय नाही घेतला तर मशिदींसमोर हनुमान चालीसाचे स्पीकर लावावे. मी धर्मांध नाही, तर धर्माभिमानी आहे,'' असा इशारा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी महविकास आघाडी सरकारला दिला आहे. शिवाजी पार्क येथे पार पडलेल्या गुढीपाडवा मेळाव्यात कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाचा मुद्दा लावून धरला.
विदर्भ, मराठवाडा, उत्तर महाराष्ट्रात आकाशातल्या गूढ दृश्यांनी थरकाप
महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यात अवकाशातून एक रोषणाई जाताना दिसली. लोकांनी ही दृश्य कॅमेऱ्यात कैद केली आहेत. ही रोषणाई आगीच्या गोळ्यांप्रमाणे असल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय. विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्यांमध्ये आकाशात ही रोषणाई दिसली. चंद्रपूर, नागपूर, वाशिम, अकोला, जळगाव, जालना आणि बुलडाणा,अशा जिल्ह्यामध्ये ही खगोलीय घटना नागरिकांनी पाहिलं असल्याचं समोर आलंय. अवकाशात जी घटना घडली यात उल्कापात की सॅटेलाईट उपग्रहाचे अंतराळातील तुकडे आहे हे निश्चित सांगता येणार नाही. मात्र, एखादा कृत्रिम सॅटेलाइट पडण्याआधी तशी सूचना त्या देशाला मिळतात मात्र आज घटनेबाबत अशी कुठलीही पूर्वसूचना देण्यात आलेली नव्हती. त्यामुळे हा उपग्रह आहे की उल्कापात हे सांगणे सध्या तरी कठीण आहे. उल्कापात हे अचानक पडत असतात पण हे कृत्रिम उपग्रहाचे भाग असल्याचे खगोलशास्त्र अभ्यासक रवींद्र खराबे यांनी सांगितले आहे.
Beed News Update : दीड लाख रूपयांची लाच घेताना मुख्याध्यापकासह चौघे जाळ्यात, बीडमधील घटना
Beed News Update : दीड लाख रूपयांची लाच घेताना मुख्याध्यापकासह चौघांना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडले आहे. बीड जिल्ह्यातील केज तालुक्यामधील तांबवा येथील गजानन शिक्षण प्रसारक संक्षेचे सचिव अशोक चाटे, गणेश विद्यालयाचे मुख्याध्यापक अनंत हंगे, साने गुरुजी विद्यालयाचे अध्यक्ष उद्धव कराड आणि दत्तात्रय धस अशी अटक करण्यात आलेल्या संशयित आरोपींची नावे आहेत.
Akola News Update : अकोला पोलिसांनी आवळल्या सोयाबीन चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या मुसक्या
Akola News Update : सोयाबीन चोरणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या अकोला पोलिसांनी मुसक्या आवळ्या आहेत. बाळापूर तालूक्यातील व्याळा येथील अंबूजा सोयाबीन ऑईल फॅक्टरीतून या टोळीने 325 क्विंटल सोयाबीनची चोरी केली होती. अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून 430 क्विंटल सोयाबीन जप्त केले असून चार आरोपींना अटक केले ईहे. या टोळीतील अजूनही पाच आरोपी फरार आहेत. पोलिसांनी या कारवाईत 44 लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे.
Beed News Update : बीडमधील टेंडर वाद पेटला, पिस्तुल रोखल्याप्रकरणी संतोष पवारसह तिघांवर गुन्हा
Beed News Update : पाणी पुरवठा योजनेच्या टेंडरवरून बीडमध्ये एकाला बंदूक लावून जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. याप्रकरणी राहुल टेकाळे यांच्या फिर्यादीवरून संतोष पवार आणि त्यांच्या दोन साथीदारांवह हा गुन्हा दाखल झाला आहे.
बीडचे युवक कॉंग्रेसचे प्रदेश सचिव राहुल टेकाळे यांनी पाटोदा तालुक्यातील केरला या गावात पाणी पुरवठा योजनेचे टेंडर भरले होते. त्यानंतर हे टेंडर का भरलं? म्हणून संतोष पवार या गुप्ते दाराने राहुल टेकाळे यांच्या घरी जाऊन बंदुकीच्या जोरावर त्यांना धमकावून कुटुंबातील लोकांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा आरोप टेकाळे यांनी केला आहे.
रेल्वे अपघातामुळे पंचवटी आणि नंदीग्राम एक्सप्रेस रद्द
रेल्वे अपघातामुळे पंचवटी आणि नंदीग्राम एक्सप्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. 12109 आणि 12110 ही पंचवटी एक्सप्रेस आहे. तर 11401 ही नंदीग्राम एक्सप्रेस आहे. तर 22221 ही राजधानी एक्सप्रेस, 12261 हा हावडा दुरोंतो आणि 12173 ही उद्योग नगरी एक्सप्रेस दुसऱ्या मार्गाने चालवण्यात येणार आहे.
पवन एक्सप्रेस अपघातात एकाचा मृत्यू
पवन एक्सप्रेस अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळते आहे. प्रवाशांना हलविण्यासाठी एसटी महामंडळ आणि महानगरपालिका ट्रान्सपोर्टच्या बसेस पाठविण्यात आलेल्या आहेत. ॲम्बुलन्स आणि फायर ब्रिगेडच्या गाड्या घटनास्थळी रवाना झाल्या आहेत. अपघाताचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.