Maharashtra Breaking News LIVE Updates : इस्लाम धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्यास सुरुवात
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
Background
Mumbai Metro 7 And Mumbai Metro 2A : गुढीपाडव्याला मुंबईकरांना मोठी भेट मिळणार आहे. बहुप्रतिक्षीत मुंबई मेट्रो 7 आणि मेट्रो 2A या मेट्रो रेल्वेचे आज गुढीपाडव्याच्या दिवशी उद्घाटन होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. मेट्रो सुरू झाल्यास मुंबईकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे. मात्र मेट्रो मार्गांच्या उद्धाटनाआधीच शिवसेना आणि भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई सुरू झाली आहे. कारण मुंबई मेट्रो उद्घाटनाच्या कार्यक्रमाला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीसांना निमंत्रण देण्यात आलेलं नाही.
पहिल्या टप्प्यामध्ये 20 किलोमीटर मार्गावरील वाहतूक सुरू
मेट्रो 7 आणि 2A या मार्गावर एकत्रिपणे पहिल्या टप्प्यामध्ये 20 किलोमीटर मार्गावरील वाहतूक सुरू होणार आहे. त्यानंतर या मार्गाच्या दुसऱ्या टप्प्यात 15 किमी मार्गावर मेट्रो चालवण्यात येणार आहे. अद्यापही काही मेट्रो स्थानकावरील कामे अपूर्ण आहेत. ही कामे आणि आवश्यक परवानगी मिळाल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील मेट्रो धावणार आहे. मुंबई 'मेट्रो 7' च्या तिकिटाचे किमान दर 10 रुपये असणार असून कमाल दर 80 रुपये असणार आहेत.
शिवसेना-भाजपमध्ये श्रेयवादाची लढाई
मेट्रोच्या उद्घाटनाआधीच श्रेयवादाची लढाई सुरु झाली आहे. भाजपच्या वतीने मुंबईत अनेक ठिकाणी बॅनर लावण्यात आले आहेत. या बॅनरवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देवेंद्र फडणवीस यांचे फोटो असून 'काम केलंय मुंबईने पाहिलंय' असं लिहिण्यात आलं आहे. भाजप-शिवसेना काळात सुरू झालं होतं मेट्रोच्या कामाला भाजपनं गती दिली आणि अंतीम टप्प्याकडे नेलं असा दावा भाजपकडून करण्यात येतोय.
मेट्रो 2 अ' मार्ग असा असणार
'मेट्रो 2 अ' हा 18.5 किमी लांबीचा आहे. दहिसर पश्चिम ते डीएन नगर स्थानकापर्यंत 'मेट्रो 2 अ' मार्ग असणार आहे. या मार्गात दहिसर पूर्व, अप्पर दहिसर, कांदरपाडा, मंडपेश्वर, एकसर, बोरिवली (पश्चिम), शिंपोली, कांदिवली (पश्चिम), धनुकरवाडी, वलणई, मालाड (पश्चिम), लोअर मालाड, पहाडी गोरेगाव, गोरेगाव (पश्चिम), ओशिवरा, लोअर ओशिवरा आणि डीएन नगर अशी स्थानके असणार आहेत.
'मेट्रो-7' मार्गावरील स्थानके
मेट्रो-7 मार्गावर 14 स्थानके असणार आहेत. दहिसर पूर्व, ओवरीपाडा, संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, देवीपाडा, मागाठाणे, पोईसर, आकुर्ली, कुरार, दिंडोशी, आरे , गोरेगाव पूर्व (महानंद डेअरी), जोगेश्वरी पूर्व (जेव्हीएलआर जंक्शन), शंकरवाडी, गुंदवली (अंधेरी पूर्व) या स्थानकांचा समावेश आहे.
साई पालखीचे दर्शन घेऊन परतताना झालेल्या अपघातात एक तरुण आणि एका तरुणीचा मृत्यू
साई पालखीचे दर्शन घेऊन परतताना झालेल्या अपघातात एक तरुण आणि एका तरुणीचा मृत्यू झाला आहे. तर 10 ते 12 जण जखमी झाले आहेत. शुक्रवारी रात्री घाटकोपर च्या भटवाडी विभागातून शिर्डीकडे साई पालखी रवाना झाली होती.या पालखीचा पहिला मुक्काम ठाणे येथे होता. त्यामुळे ठाणे पर्यंत घाटकोपर मधील अनेक साई भक्त पालखी सोबत गेले होते. मध्य रात्री एक वाजताच्या दरम्यान पालखी चे दर्शन घेऊन साई भक्त घाटकोपरकडे रवाना होऊ लागले.यात संकेत आणि त्याची मैत्रीण श्रेया हे केटीएम दुचाकी वरून निघाले. भरधाव वेगात ते घाटकोपर च्या दिशेने येत असताना चालक संकेत चा दुचाकीवरील तोल गेला आणि तो एका माणसानी भरलेल्या टेम्पो ट्रॅव्हलर बस समोर कोसळला.टेम्पो ट्रॅव्हलर चालकाने त्यांना वाचविण्याचा प्रयत्नांन गाडी वळविण्याचा प्रयत्न केला आणि तो टेम्पो ट्रॅव्हलर ही रस्त्यात उलटला.या भीषण अपघातात संकेत आणि श्रेया हे दूर वर दुचाकीसह फरफटत गेले आणि गंभीर जखमी झाले.या वेळी त्यांच्या मागून येणाऱ्या इतर साई भक्तांनी त्यांना तात्काळ उपचारासाठी सायन च्या टिळक रुग्णालयात दाखल केले.तर टेम्पो ट्रॅव्हलर मधील प्रवासी देखील जखमी झाले होते त्यांना देखील सायन च्या टिळक रुग्णालयात उपचारासाठी नेण्यात आले.मात्र संकेत वर उपचार करण्या आधीच डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.तर श्रेया वर अतिदक्षता विभागात उपचार सुरू असताना आज तिचा मृत्यू झाला. या दुर्घटनेमुळे घाटकोपर मध्ये आणि साईभक्तांमध्ये मात्र शोककळा पसरली आहे.
Ramadan 2022 : इस्लाम धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्यास सुरुवात
Ramadan 2022 : इस्लाम धर्मात पवित्र मानल्या जाणाऱ्या रमजान महिन्यास सुरुवात झाली आहे. संध्याकाळी चंद्रदर्शन झाल्याने रमजान महिन्यास सुरुवात झाली. उद्या असेल रमजानचा पहिला रोजा (उपवास) आहे. सोलापूरच्या रुयते हिलाल कमिटीचे अध्यक्ष मुफ्ती सय्यद अमजदअली यांनी ही माहिती दिली आहे.
Sangli News Update : सांगलीतील विजयनगरमधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण
Sangli News Update : सांगली : सांगलीतील विजय नगर मधील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारकाचे शरद पवार यांच्या हस्ते लोकार्पण, काँग्रेसचे बाळासाहेब थोरात, , शिवसेनेचे उदय सामंत, शंभूराजे देसाई यासह अनेक मंत्री उपस्थित
Prabhakar Sail Death: प्रभाकर साईल मृत्यू प्रकरणी पोलीस महासंचालकांना चौकशीचे आदेश; गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांचे माहिती
Prabhakar Sail Death: आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणी अटक केल्यानंतर प्रसिद्धीच्या झोतात आलेल्या पंच प्रभाकर साईल यांचा मृत्यू झाला आहे. प्रभाकर साईल मृत्यू प्रकरणी पोलीस महासंचालकांना चौकशीचे आदेश दिले असल्याची माहिती गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी दिली.
पुण्यात राज्यातील पहिली पर्यायी इंधन परिषद, आदित्य ठाकरेंच्या हस्ते उद्घाटन
पुण्यामध्ये राज्यातील पहिल्या पर्यायी इंधन परिषदेचे आयोजन करण्यात आला आहे. या परिषदेचं उद्घाटन पर्यटन आणि पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झालं. आदित्य ठाकरे यांनी यावेळी पर्यायी इंधनावर चालणाऱ्या प्रदर्शनाची पाहणी देखील केली. त्याचप्रमाणे पुण्यात बनलेल्या संपूर्ण भारतीय बनावटीच्या इका इ 9 या इलेक्ट्रिक बसचे उद्घाटन देखील आदित्य ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आले.