एक्स्प्लोर

Maharashtra Breaking News 01 September 2022 : देशासह राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...

Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...

LIVE

Key Events
Maharashtra Breaking News 01 September 2022 : देशासह राज्यभरातील महत्त्वाच्या बातम्या एका क्लिकवर...

Background

ब्रेकिंग न्यूज कधी पूर्वसूचना देऊन येत नाहीत.. हे खरं असलं तरी..पण आज दिवसभरात घडणाऱ्या काही पूर्वनियोजित घटना,कार्यक्रम असतातच.. त्याचाच दिवसभरात विस्तार होतो. त्या घटना-घडामोडींची पार्श्वभूमी-पूर्वपिठिका हाताशी असल्यावर या घटना-घडामोडी समजून घेणं सोपं होतं. आज दिवसभरातल्या कोणत्या महत्वाच्या बातम्यांवर आमचं लक्ष असेल किंवा महत्वाच्या घडामोडी आम्ही तुमच्यापर्यंत सविस्तर पोहोचवू याची ही थोडक्यात उजळणी...  या नियोजित-घटना कार्यक्रमांसोबतच आयत्यावेळी येणाऱ्या घडामोडीही आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवू...

आज दीड दिवसाच्या बाप्पांचं विसर्जन
घरी आलेला, सर्वांचाच लाडका  पाहुणा काहींच्या घरी दीड  दिवसाचा पाहुणचार घेऊन आता आपल्या गावी पुन्हा जाणार आहेत. 'गणपती बाप्पा मोरया, पुढल्या वर्षी लवकर या'च्या गजरात घरगुती गणपतीचं विसर्जन (Ganesh Visarjan 2022) करण्यात येणार आहे

गर्भाशयाच्या कॅन्सरवरील लसीचे आज लॉन्च 
भारतात दरवर्षी अनेक महिलांचा गर्भाशयाच्या कर्करोगाने मृत्यू होतो. मात्र, या घातक आजारावर मात करणारी एक आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे गर्भाशयाच्या कर्करोगावरील लस सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाने तयार केली आहे. गर्भाशय कर्करोगाच्या रुग्णांसाठी सीरम इन्स्टिट्यूटने 'क्वाड्रिव्हॅलेंट ह्युमन पॅपिलोमाव्हायरस' ही स्वदेशी लस विकसित केली असून सीरम इन्स्टिट्यूट आणि डिपार्टमेंट ऑफ बायोटेक्नॉलॉजी आज 1 सप्टेंबर रोजी ही लस लान्च  होणार आहेत. 

आज  शेगावात संत गजानन महाराजांचा 112 वा पुण्यतिथी सोहळा
श्री संत गजानन महाराजांनी आठ सप्टेंबर 1910 रोजी ऋषीपंचमीच्या दिवशी समाधी घेतली. हा दिवस श्री संत गजानन महाराजांचा पुण्यतिथी उत्सव म्हणून साजरा केला जातो उद्या हा 112 वा पुण्यतिथी उत्सव असून या उत्सवा प्रसंगी खूप मोठ्या यात्रेचा आयोजन होत असतं. विशेष म्हणजे या उत्सवात महाराष्ट्रातील कानाकोपऱ्यातून आणि विशेषता ग्रामीण भागातून हजारो भजनी दिंड्या सक्रिय सहभागी होतात. श्रींच्या मंदिरावर या परिसरात यानिमित्त विद्युत दिपांची रोषणाई करण्यात आली आहे

श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीबाहेर महिलांचं सामूहिक अथर्वशीर्ष पठण
पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती गणेशोत्सवामध्ये प्रमुख आकर्षण आहे. हजारो महिलांचं सामुहिक अथर्वशिर्ष पठण. ऋषीपंचमीनिमित्त हजारोंच्या संख्येनं महिला अथर्वशिर्षाचं सामूहिक पठण करतात.  ओमकार जप आणि अथर्वशिर्ष पठण करण्यात येतं. महिलांबरोबरच लहान मुलं, ज्येष्ठ असे सगळेच पहाटेपासूनच दगडूशेठ बाहेर पठणासाठी जमतात.

पंतप्रधान नरेंद्र मोदी केरळ दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी 1 आणि 2 सप्टेंबर रोजी कर्नाटक आणि केरळच्या दौऱ्यावर जाणार आहेत. 1 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजता पंतप्रधान मोदी कोचीन विमानतळाजवळील कलाडी गावातील आदि शंकराचार्यांचे पवित्र जन्मस्थान श्री आदिशंकर जन्मभूमी क्षेत्रमला भेट देतील. 2 सप्टेंबर रोजी सकाळी 9:30 वाजता, पंतप्रधान कोची येथील कोचीन शिपयार्ड लिमिटेड येथेआय एन एस  विक्रांत या पहिल्या स्वदेशी विमानवाहू नौकेचे लोकार्पण करणार आहेत. त्यानंतर दुपारी 1:30 वाजता, पंतप्रधान मंगळुरूमध्ये सुमारे 3800 कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी करतील.

भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) चा स्थापना दिवस
भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी भारतीय आयुर्विमा महामंडळ अर्थात भारतीय जीवन विमा महामंडळ (LIC) साठी अतिशय खास आहे.  1 सप्टेंबर 1956 रोजी एलआयसीची स्थापना झाली. तेव्हापासून एलआयसी भारतातील सर्वात मोठी विमा कंपनी बनली आहे.

23:27 PM (IST)  •  01 Sep 2022

 केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती बाप्पाचे दर्शन घेतले

पुणे : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतलं. नितीन गडकरी पुणे दौऱ्यावर आहेत. गुरुवारी रात्री पुण्यात पोचल्यानंतर ते थेट दगडूशेठ हलवाई गणपतीच्या मांडवात पोहोचले. याठिकाणी त्यांच्या हस्ते आरती झाली. मांडवात भजनाच्या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. तेव्हा गडकरी स्वतःहून वारकऱ्यांमध्ये गेले. हाती टाळ घेऊन ते भजनात देखील सहभागी झाले.

23:26 PM (IST)  •  01 Sep 2022

Nitin Gadkari :  केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी  पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाईच्या दर्शनला

Nitin Gadkari :  केंद्रीय मंत्री  नितीन गडकरी  यांनी पुण्यातील श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीचे दर्शन घेतले व श्रीगणेशाची आरती केली.


22:10 PM (IST)  •  01 Sep 2022

पुण्यात गणपती वर्गणीवरून झालेल्या वादातून व्यवसायिकावर हल्ला

पुण्यात गणपती वर्गणीवरून झालेल्या वादातून व्यवसायिकावर हल्ला झालाय. पुण्यातील शिवणे भागात हा प्रकार घडल्याचे समोर आले आहे. या हल्ल्यात चंद्रकांत रामकृष्ण मोरे (वय, 44) हे गंभीर जखमी झाले आहेत. 

21:25 PM (IST)  •  01 Sep 2022

 माजलगाव जवळ टेम्पोला भीषण अपघात, 15 जण जखमी, जखमींमध्ये लहान मुलांचा समावेश

लग्न समारंभ आटोपून वऱ्हाडी मंडळींना घेऊन जाणाऱ्या टेम्पोला माजलगाव जवळ अपघात झाला आहे. या अपघातात पंधरा जण जखमी झाले असून जखमीमध्ये पाच ते सहा बालकांचाही समावेश आहे. तेलगावहून वऱ्हाडी घेऊन जालण्याकडे जात असताना टेम्पो समोर अचानक मोटर सायकल आली. या चुचाकीस्वाराला वाचवण्याच्या नादात टेम्पो चालकाचा ताबा सुटल्याने हा अपघात झाला. अपघातात जखमी झालेल्या लोकांना माजलगावच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. तर तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. 

19:49 PM (IST)  •  01 Sep 2022

एबीपी माझाच्या बातमीचा इम्पॅक्ट! वाहतूक व्यवस्थेसाठी लावण्यात आलेली शिक्षकांची ड्युटी रद्द

चाकरमान्यांच्या स्वागतासाठी, चहापाण्यासाठी, वाहतूक व्यवस्थेसाठी लावण्यात आलेली शिक्षकांची ड्युटी रद्द करण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे.  राजापूर तालुक्यातील 39 शिक्षकांची ड्युटी लावण्यात आली होती.  एबीती माझाने याबातची बातमी दाखवली होती. माझाच्या बातमीनंतर मंत्री दीपक केसरकर यांनी निर्णय घेतला.  12 तासाच्या आत शिक्षकांची  ड्युटी रद्द करत असल्याचा आदेश जारी करण्यात आला  आहे. 

Load More
New Update
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Maharashtra Superfast News : महाराष्ट्र सुपरफास्ट बातम्यांचा आढावा : 10 PM 26 Sept 2024ABP Majha Headlines : 10 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स9 Second News : 9 सेकंदात बातम्यांचा वेगवान आढावा सुपरफास्ट न्यूज : 26 Sept 2024 : ABP MajhaABP Majha Headlines : 09 PM: 26 Sept 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
पुढचा आमदार मीच, सुडाचे राजकारण करणाऱ्यांना सोडणार नाही, रोहित पवारांचा राम शिंदेंवर हल्लाबोल   
Pandharpur News : विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
विठ्ठल भक्तांना खुशखबर , अखेर विठ्ठल-रुक्मिणीमातेच्या पूजेची 1 ऑक्टोबरपासून होणार ऑनलाईन नोंदणी 
Devendra Fadnavis: अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
अजित पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या वक्तव्यावर फडणवीसांना प्रश्न, उत्तर देताना म्हणाले, 'ज्याचा एक आमदार आहे त्यालाही...'
Beed: गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग वाढला, बीडच्या राक्षसभवनात पाणी शिरले, सर्व मंदिरे पाण्याखाली
Harshvardhan Patil: हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
हर्षवर्धन पाटील तुतारी फुंकणार? सोशल मीडियात पोस्टर व्हायरल, पाटलांनी दिली सूचक प्रतिक्रिया म्हणाले, 'पितृपक्ष पंधरवडा झाल्यानंतर...'
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 26 सप्टेंबर 2024 | गुरुवार 
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
मनोज जरांगेंच्या उपोषणासाठी लातूरमधील जोडप्याचे टोकाचे पाऊल, विष पित आत्महत्येचा प्रयत्न
PM Modi Death Threat: मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
मोदींच्या जीवाला धोका, त्यांना वाचवा! पुण्याच्या कंट्रोल रूमला फोन, पोलिसांच्या तपासाची चक्र फिरली, एकाला ताब्यात घेतलं अन्...
Embed widget