(Source: ECI/ABP News/ABP Majha)
EXCLUSIVE: मविआतील जागावाटपावर काँग्रेसचा फॉर्म्युला ठरला?एक्स्क्लुझिव्ह माहिती 'ABP माझा'च्या हाती
महाविकास आघाडीतील जागावाटपाचा तिढा सुटला? काँग्रेसनं हा तिढा सोडवला असून जागावाटपाचा फॉर्म्युलाही ठरला असल्याची माहिती मिळत आहे.
Maharashtra Politics: नवी दिल्ली : महाविकास आघाडीच्या (Maha Vikas Aghadi) गोटातून एक महत्त्वाची माहिती 'एबीपी माझा'च्या हाती लागली आहे. महाविकास आघाडीच्या जागावाटपावर काँग्रेसचा (Congress) फॉर्म्युला ठरला आहे का? असा प्रश्न सध्या राजकीय वर्तुळात (Maharashtra Politics) चर्चेत आहे. अशातच 'एबीपी माझा'च्या हाती याचसंदर्भात एक्स्क्लुझिव्ह (ABP Majha Exclusive) माहिती लागली आहे. नवी दिल्लीतल्या बैठकीत जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती मिळत आहे. जागावाटप फॉर्म्युल्याची एक्स्क्लुझिव्ह माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे. दरम्यान, सध्या महाविकास आघाडीत जागावाटपावरुन धुसफूस सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. यावर तोडगा काढण्यासाठी सातत्यानं महाविकास आघाडीतील पक्षांच्या आणि वरिष्ठ नेत्यांच्या बैठकांचं सत्र सातत्यानं सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे.
महाविकास आघाडीतील जागावाटपाचा जो काही प्रश्न असेल तो दिल्लीत ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आणि काँग्रेस हायकमांड घेईल, अशी माहिती महाविकास आघाडीतील अनेक वरिष्ठ नेत्यांनी दिली होती. राज्यातल्या नेत्यांच्या त्यामध्ये सहभाग नसेल किंवा त्यावर त्यांचं कोणतंही मत नसेल, असंही महाविकास आघाडीतील वरिष्ठ नेत्यांच्या वतीनं सांगण्यात आलं होतं.
काँग्रेसचा जागावाटपाचा फॉर्म्युला काय?
- 22 जागा काँग्रेस (Congress)
- 18 शिवसेना (Thackeray Group))
- 06 राष्ट्रवादी काँग्रेस (NCP)
- अकोला, आणखी एक जागा अशा 2 जागा वंचित बहुजन आघाडीसाठी राखीव
गेल्या काही दिवसांपासून महाविकास आघाडीत आगामी लोकसभा निवडणुकांमधील जागावाटपावरुन धुसफूस सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच, महाविकास आघाडीतील घटकपक्ष आपापल्या परिनं जागावाटपाचा फॉर्म्युला देत असल्याचं समोर येत आहे. अशातच काँग्रेसकडून जागावाटप उद्धव ठाकरे, शरद पवार आणि काँग्रेस हायकमांड यांच्यातील बैठकीनंतर ठरेल, असं महाराष्ट्रातील काँग्रेसच्या नेत्यांनी सांगितलं होतं. तरीसुद्धा महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते आणि काँग्रेस हायकमांड यांच्यात दिल्लीत बैठक पार पडली. या बैठकीत महाराष्ट्रातील जागांचा आढावा काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी घेतला आणि त्यावरुनच जागावाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची माहिती मिळत आहे. अशातच काँग्रेसचा हा फॉर्म्युला इतर पक्षांकडून स्विकारला जाणार का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.