एक्स्प्लोर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सुनावणी लांबणीवर; महापालिका निवडणुका कधी? हा प्रश्न अद्याप अनुत्तरित

Maharashtra Local Body Election: राज्यातल्या महापालिका निवडणुकांचे भवितव्य निश्चित करणारी सुनावणी तीन आठवड्यांनी लांबणीवर

Maharashtra Local Body Election: राज्यातील (Maharashtra News) महापालिका निवडणुकांचं (Maharashtra Municipal Elections) भवितव्य निश्चित करणारी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील (Maharashtra Local Body Election) सुनावणी तीन आठवड्यांनी लांबणीवर गेली आहे. आता ही सुनावणी पुढच्या महिन्यात म्हणजेच, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पार पडणार आहे. आज सुनावणीसाठी सुप्रीम कोर्टाच्या (Supreme Court) कामकाजात हे प्रकरण लिस्ट करण्यात आलं होतं. 

आज स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील हे प्रकरण मेन्शन केलं गेलं होतं. त्यानंतर सरन्यायाधीशांनी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात सुनावणी करण्यास सांगितलं आहे. महापालिका निवडणुका नेमक्या कधी होणार याचं उत्तर या सुनावणीवर अवलंबून आहे. 92 नगरपरिषदांमध्ये ओबीसी आरक्षणाचा मुद्दाही याच याचिकेत समाविष्ठ आहे. गेल्या बऱ्याच काळापासून हे प्रकरण सुप्रीम कोर्टात प्रलंबित आहे. 

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसंदर्भातील सुनावणी गेल्या काही महिन्यांपासून सातत्यानं लांबणीवर जात आहे. या प्रकरणावरील शेवटचा निर्णय सुप्रीम कोर्टानं यापूर्वी 28 जुलै 2022 रोजी दिला होता. याच सुनावणीत सुप्रीम कोर्टानं ओबीसींच्या राजकीय आरक्षणाला परवानगी देण्यात आली होती. पण, त्यानंतर 92 नगरपरिषदांचा प्रश्न कोर्टात प्रलंबित होता. त्यानंतर राज्यात सत्तांतर झालं. नवं सरकार स्थापन झाल्यानंतर 4 ऑगस्ट 2022 रोजी निवडणुका आणि प्रभाग रचना यासंदर्भातील नवा अध्यादेश काढण्यात आला, त्यानंतर हा मुद्दा सुप्रीम कोर्टात पोहोचला. 

पाहा व्हिडीओ : Local Body Elections : स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांची सुनावणी लांबणीवर

याप्रकरणी डिसेंबरमध्ये शेवटची सुनावणी पार पडली होती. त्यावेळी सुप्रीम कोर्टानं हे प्रकरण 17 जानेवारी 2023 रोजी प्राधान्यानं ऐकलं जाईल, असं सांगितलं होतं. मात्र काल (मंगळवारी) ही सुनावणी झाली नाही. काल घटनापीठाचं कामकाज खूप लांबल्यामुळे या सुनावणीवर त्याचा परिणाम दिसून आला. त्यानंतर आज या प्रकरणाचा कोर्टाच्या कामकाजात समावेश करण्यात आला. त्यानंतर या प्रकरणाची सुनावणी फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात घेतली जाईल, असं सांगण्यात आलं. 

सत्तांतर झालं आणि निवडणुका लांबणीवर पडल्या

मे महिन्यामध्ये सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याची सूचना केली होती. कुठल्याही परिस्थितीत निवडणुका घ्या, असं सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं होतं. परंतु त्यानंतर राज्यात सत्तांतर झालं आणि शिंदे-फडणवीस सरकारने वॉर्ड रचना पुन्हा नव्याने करण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे निवडणुका पुन्हा लांबणीवर पडल्या. महाविकास आघाडी सरकारने मुंबई महानगरपालिकेमध्ये एक सदस्यीय प्रभाग आणि इतर महापालिकांमध्ये तीन सदस्यांचा प्रभाग केला होता. त्यानंतर शिंदे सरकारने 2017 प्रमाणे चारचा प्रभाग करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला महाविकास आघाडीने जोरदार विरोध केला होता.

महत्त्वाच्या बातम्या

राज्यात तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडाका; मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया, म्हणाले, मी त्यांना फोन केला
राज्यात तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडाका; मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया, म्हणाले, मी त्यांना फोन केला
Raigad Crime News: काळीज पिळवटून टाकणारी घटना; आईने स्वतः विष प्यायलं अन् पोटच्या 4 मुलांना देखील थंडपेयांतून पाजलं; तिघांचा मृत्यू, दोन गंभीर
काळीज पिळवटून टाकणारी घटना; आईने स्वतः विष प्यायलं अन् पोटच्या 4 मुलांना देखील थंडपेयांतून पाजलं; तिघांचा मृत्यू, दोन गंभीर
Maharashtra Live News Updates: मुंबईत बोगस जन्मदाखले दिल्याची धक्कादायक बाब उघड; उपजिल्हाधिकारीसह दोघांविरुद्ध गुन्हे दाखल
Maharashtra Live News Updates: मुंबईत बोगस जन्मदाखले दिल्याची धक्कादायक बाब उघड; उपजिल्हाधिकारीसह दोघांविरुद्ध गुन्हे दाखल
El Nino Update : पुणे वेधशाळेचा मोठा इशारा! 'एल निनो'मुळे मान्सून रेंगाळला; यंदा महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज, शेतकऱ्यांना दिला महत्त्वाचा सल्ला, पूर्वमोसमी...
पुणे वेधशाळेचा मोठा इशारा! 'एल निनो'मुळे मान्सून रेंगाळला; यंदा महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज, शेतकऱ्यांना दिला महत्त्वाचा सल्ला, पूर्वमोसमी...

व्हिडीओ

Jalgaon MLC Election Special Report : नाशकातील बंडखोरी मिटली, पण जळगावचा पेच कायम! शिवसेनेच्या रेश्मा काळे 'नॉट रिचेबल'!
Finance Ministry Special Report:अर्थखातं राष्ट्रवादीला मिळणार? मुख्यमंत्र्यांच्या विधानाचा अर्थ काय?
Sunetra Pawar Speech NCP Vardhapan Din : कुणाचाही हस्तक्षेप खपवून घेणार नाही; स्वकीयांना इशारा
Chhagan Bhujbal Speech NCP Vardhapan Din 2026 : तटकरेंच्या टोमण्यांना उत्तर, रोखठोख भुजबळ UNCUT
Sunil Tatkare Speech NCP Vardhapan Din 2026 : राष्ट्रवादीच्या वर्धापन दिनी भुजबळांना तुफान टोले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Abhishek Banerjee: अभिषेक बॅनर्जींच्या घरात पहाटे तीन वाजता छापेमारी; बाहेर केंद्रीय फौजा तैनात, ममता सुद्धा त्याचवेळी पोहोचल्या, पण..
अभिषेक बॅनर्जींच्या घरात पहाटे तीन वाजता छापेमारी; बाहेर केंद्रीय फौजा तैनात, ममता सुद्धा त्याचवेळी पोहोचल्या, पण..
राज्यात तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडाका; मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया, म्हणाले, मी त्यांना फोन केला
राज्यात तुकाराम मुंढेंच्या कारवाईचा धडाका; मंत्री छगन भुजबळांची प्रतिक्रिया, म्हणाले, मी त्यांना फोन केला
RBI : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा धडाका कायम, मुंबईतील सहकारी बँकेवर कारवाई, 6 महिन्यांसाठी निर्बंध लादले
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचा धडाका कायम, मुंबईतील सहकारी बँकेवर कारवाई, 6 महिन्यांसाठी निर्बंध लादले
Bhiwandi News: जेसीबीचा धक्का लागला अन् 125 मिमीची गॅस पाइपलाइन फुटली! वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला
जेसीबीचा धक्का लागला अन् 125 मिमीची गॅस पाइपलाइन फुटली! वाहतूक पोलिसांच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला
धक्कादायक! पोलीस ठाण्यातच 'सैराट'; मुलगी प्रियकरासोबत पळून गेली, समुपदेशन करताना वडिलांकडूनच हल्ला
धक्कादायक! पोलीस ठाण्यातच 'सैराट'; मुलगी प्रियकरासोबत पळून गेली, समुपदेशन करताना वडिलांकडूनच हल्ला
Vaibhav Sooryavanshi : दोन सामने फ्लॉप, अन् आता...; वैभव सूर्यवंशीच्या पुढच्या सामन्याबाबत मोठी अपडेट; कधी, कुठे अन् कोणाविरुद्ध? जाणून घ्या A टू Z
दोन सामने फ्लॉप, अन् आता...; वैभव सूर्यवंशीच्या पुढच्या सामन्याबाबत मोठी अपडेट; कधी, कुठे अन् कोणाविरुद्ध? जाणून घ्या A टू Z
Ind vs Afg 1st ODI Live Update : धर्मशाळेत वरुणराजाची 'धो-धो' बॅटिंग; ना नाणेफेक, ना खेळपट्टीचा अंदाज; रोहित शर्मासह दोन्ही संघांचे डोळे आकाशाकडे, जाणून घ्या Live अपडेट्स
धर्मशाळेत वरुणराजाची 'धो-धो' बॅटिंग; ना नाणेफेक, ना खेळपट्टीचा अंदाज; रोहित शर्मासह दोन्ही संघांचे डोळे आकाशाकडे, जाणून घ्या Live अपडेट्स
IAF Plane Crash: भारतीय हवाई दलाच्या विमान अपघातात 5 जणांचा मृ्त्यू; एअरक्राफ्टचे दोन तुकडे, आसाममधील घटनेनं देश हळहळला, चौकशीचे आदेश
भारतीय हवाई दलाच्या विमान अपघातात 5 जणांचा मृ्त्यू; एअरक्राफ्टचे दोन तुकडे, आसाममधील घटनेनं देश हळहळला, चौकशीचे आदेश
Embed widget