Maharashtra Rain Live: ओला दुष्काळ जाहीर करा, कॅबिनेटमध्ये शिवसेनेचे सर्व मंत्री एकमुखाने मागणी करणार!
Maharashtra live blog: राज्यातील आणि देश-विदेशातील ताज्या घडामोडींचे अपडेट्स पाहण्यासाठी क्लिक करा. महाराष्ट्रातील पाऊस, राजकारण, समाजकारण आणि महत्त्वाच्या घडामोडींची माहिती मिळवा.
LIVE

Background
Maharashtra Rain Live Updates: सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागातल्या शाळांना उद्या सुट्टी जाहीर. सोलापूर जिल्ह्यात सतत पडणाऱ्या पाऊस आणि सीना नदीला पूरस्थिती निर्माण झाल्याने शाळांना सुट्टी. जिल्ह्यातील उत्तर सोलापूर (ग्रामीण), माढा, करमाळा, मोहोळ, बार्शी, दक्षिण सोलापूर तालुक्यातील सर्व खासगी आणि शासकीय शाळांना सुट्टी. उद्या 23 सप्टेंबर रोजी एक दिवस सुट्टी जाहीर करत असल्याचे जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे आदेश. आपत्ती व्यवस्थापन मंत्री गिरीश महाजन सोमवारी रात्री धाराशिव जिल्ह्यातील भूम, परांडाकडे रवाना. आज अतिवृष्टी, पूरपरिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करणार. बीड, धाराशिव जिल्ह्यात रात्रभर मुसळधार पाऊस, दोन दिवसाच्या पावसामुळे जिल्ह्यातील सर्व शाळांना आज सुट्टी
ई-रिक्शा चार्जिंग लावत असतांना करंट लागून पिता पुत्राचा मृत्यू; गोंदियाच्या तिरोडा शहरातील संत रविदास वॉर्डातील घटना..
गोंदिया : ई-रिक्षा चार्जिंगला लावत असताना विद्युत करंट लागून पिता-पुत्रांच्या मृत्यू झाल्याची घटना गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथील संत रविदास वार्ड येथे घडली. नरेश बरियेकर (५५) व दुर्गेश नरेश बरियेकर (२२) असे मृत पिता-पुत्राचे नाव आहे. संत रविदास वॉर्डातील नरेश बरियेकर हे त्यांची ई-रिक्षा चार्जिंग ला लावत असताना अचानक टिनाच्या शेडला विद्युत ताराचा स्पर्श झाल्याने शेड मधून विद्युत प्रवाह शटरमध्ये आला. यावेळी नरेश बरियेकर यांनी शटरला स्पर्श करताच त्यांना विजेचा शॉक बसला. यावेळी त्यांचा मुलगा दुर्गेश याने त्यांना वाचविण्याचा प्रयत्न केला असता त्यालाही विजेचा शॉक लागला. यामध्ये दोघांचाही जागीच मृत्यू झाला. घटनेची माहिती तिरोडा पोलिसाना दिली. पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाठविले. पुढील तपास तिरोडा पोलिस करीत आहेत.
हतनुर धरण क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे हतनूर धरणाचे आठ दरवाजे उघडले; 31 हजार 572 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू
हतनुर धरण क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे हतनूर धरणाचे आठ दरवाजे उघडले
हतनूर धरणातून 31 हजार 572 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू
नदीकाठच्या गावांना यावेळी हतनुर धरण प्रशासना तर्फे सतर्कतेचा ईशारा देण्यात आला आहे
जळगाव जिल्ह्यातील भुसावळ तालुक्यातील तापी नदीवर असलेल्या हतनुर धरण क्षेत्रात झालेल्या दमदार पावसामुळे हतनुर धरण क्षेत्रात पाण्याची आवक वाढली असून आज हतनुर धरणाचे आठ दरवाजे हे दीड मीटरने उघडण्यात आले असून हतनूर धरणातून 31 हजार 572 क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू असून यावेळी नदीकाठच्या गावांना यावेळी हतनुर धरण प्रशासना तर्फे सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे
























