Maharashtra Live Update: मुंबईतल्या शिवाजी पार्कवर आज महायुतीची सांगता सभा , पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
LIVE
![Maharashtra Live Update: मुंबईतल्या शिवाजी पार्कवर आज महायुतीची सांगता सभा , पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार Maharashtra Live Update: मुंबईतल्या शिवाजी पार्कवर आज महायुतीची सांगता सभा , पहिल्यांदाच पंतप्रधान मोदी आणि राज ठाकरे एकाच व्यासपीठावर येणार](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2024/05/17/3cd1f4a42eca13379ab65f09d303b126171590914685689_original.jpeg)
Background
Maharashtra News LIVE Updates : २० मे या दिवशी मुंबईत मतदान होतंय आणि मुंबईचा प्रचार आता शिगेला पोहोचलाय. मुंबईत आज महायुती आणि इंडिया आघाडीची प्रचार सभा होणार आहे. ऐतिहासिक शिवाजी पार्कवर मोदी आणि राज ठाकरेंची एकत्र सभा होतेय. या सभेला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवार उपस्थित असतील. तर दुसरीकडे आज मुंबईत इंडिया आघाडीचीही प्रचारसभा बीकेसी मैदानावर होत आहे. या सभेला उद्धव ठाकरे, शरद पवार, मल्लिकार्जुन खर्गे, अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार आहेत.
Uddhav Thackeray: मुंबईत शेवटच्या दिवशी उद्धव ठाकरेंच्या प्रचारसभांचा धडाका
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंच्या मुंबईत सांगता सभांचा धुरळा उडणार आहे.. मुंबईत उद्या प्रचाराचा शेवटचा दिवस असणार आहे,.., त्यामुळे शेवटच्.य उद्धव ठाकरे उद्या मुंबईतील ४ उमेदवारांसाठी सांगता सभा घेणार आहेत... ईशान्य मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, दक्षिण मुंबई आणि उत्तर पश्चिम मुंबई या लोकसभा मतदारसंघांमध्ये या सभा पार पडणार आहेत..
Maha Vikas Aghadi: इंडिया आघाडीच्या सभेपूर्वी केजरीवाल ठाकरेंसोबत चर्चा करणार
Maha Vikas Aghadi: आज मुंबईत इंडिया आघाडीची सभा होणार आहे.. त्या सभेपूर्वी अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत.. अरविंद केजरीवाल मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत.. संध्याकाळी ६ वाजता अरविंद केजरीवाल उद्धव ठाकरेंची भेट घेणार आहेत..
Thane Lok Sabha: ठाण्यात नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेचा रोड शो
Thane Lok Sabha: ठाणे लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा रोड शो सुरू आहे
Sindhudurg News: कणकवलीतील हरकुळ बुद्रुकमध्ये महावितरणचे 80 पोल मोडून पडले
Sindhudurg News: जिल्ह्यात कणकवलीतील हरकुळ बुद्रूकमध्ये काल चक्रीवादळ होऊन अनेक घरांची छपरे उडाली तर महावितरणचे 80 पोल मोडून पडले. हरकुळ बुद्रुक गावाला चक्रीवादळाचा तडाखा बसला. झाडे मोडून घरांवर पडली, पालापाचोळ्यासारखी अनेक घरांची छप्परे उडाली, महावितरणचे सुमारे 80 पोल मोडून पडले, वाहिन्या तुटल्याने वीज पुरवठा खंडित झाला. चक्रीवादळामुळे लाखोंची हानी झाली असून, सुदैवाने जीवितहानी झाली नाही.
Maha Vikas Aghadi Teaser : महाविकास आघाडीच्या आजच्या सभेचा टीझर जारी
Maha Vikas Aghadi Teaser :लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज वांद्रे येथील बीकेसी मैदानावर इंडिया आघाडीची सभा होणार आहे.. दरम्यान महाविकास आघाडीच्या आजच्या सभेचा टीझर जारी करण्यात आलाय. या सभेत उद्धव ठाकरे, शरद पवार, मल्लिकार्जुन खरगे, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल उपस्थित राहणार आहेत.
तमाम देशभक्त बांधवांनो...
— ShivSena - शिवसेना Uddhav Balasaheb Thackeray (@ShivSenaUBT_) May 17, 2024
हुकूमशाहीला आता दाखवून देऊ,
आपल्या ‘INDIA’ची ताकद!
इंडिया- महाविकास आघाडी
जाहीर ‘परिवर्तन सभा‘!
दि. १७ मे २०२४
सायं. ५.०० वा.
स्थळ - वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्स, मुंबई pic.twitter.com/wwnQSgSwoB
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)