Maharashtra News Live update : कराड चिपळूण राज्य महामार्गावर गॅस टँकरचा अपघात, अपघातानंतर गॕस गळती, गाव वस्तीला त्रास
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये..

Background
Maharashtra News LIVE Updates : दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह ब्लॉगमध्ये..
Aditya Thackeray : ईडी सीबीआय आता कोणता उमेदवार ठरवते हे पहावं लागेल, आदित्य ठाकरेंची भाजपवर टीका
Aditya Thackeray : भाजप हा महाराष्ट्र द्वेषी पक्ष , महाराष्ट्र विरोधी कारवाया होत असल्याने भाजपला एकही मत मिळणार नाही . अमित शहा यांच्या महाराष्ट्रात 40 जागा मिळणार या वक्तव्यावर आदित्य ठाकरेंची टीका .
भाजपने आता प्रज्वल रेवन्नावर बोलावं . भाजपच्या भारतातील सर्वोच्च नेत्याने येऊन त्याचा प्रचार केला . अशा राक्षसी माणूस भारतात आला तरी भाजपा मधून त्याच्यावर कोणीही बोलण्यास तयार नाही - चित्रा वाघ यांच्या पॉर्न स्टार टीकेवर आदित्य ठाकरेंचा टोला .
जे डरपोक लोक पळून गेली त्यांचा कुठलाही फटका आमच्या पक्षाला बसणार नाही . आम्ही लोकशाही टिकवण्यासाठी लढतोय त्यामुळे आम्ही भक्कम आहोत - आदित्य ठाकरे
पालघर लोकसभेचा महायुतीने अजूनही उमेदवार जाहीर केला नसून ईडी सीबीआय आता कोणता उमेदवार ठरवते हे पहावं लागेल - आदित्य ठाकरे
Pune : पुण्यातील अट्टल गुन्हेगारांची पुन्हा एकदा परेड, लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी कंबर कसली
Pune : येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे पोलिसांनी कंबर कसली आहे.
पुण्यातील अट्टल गुन्हेगारांची पुन्हा एकदा परेड काढण्यात येत आहे.
पुण्यातील प्रत्येक पोलीस चौकीच्या हद्दीतील अट्टल गुन्हेगारांची पोलीस ठाण्यात परेड काढण्यात येत आहे.
निवडणुकीच्या काळात कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पुणे पोलिसांकडून खबरदारी घेण्यात येत आहे.























