Eknath Shinde : जन्मतः दोन्ही हात नियतीने हिरावले, तरीही चिमुकल्याची जिद्द भारी! मदतीला धावले मुख्यमंत्री, 'हे' स्वप्न पूर्ण करणार
CM Eknath Shinde : चिमुकल्याचं सैन्यात भरती होण्याचं स्वप्न पूर्ण होईपर्यंत त्याच्या पाठीशी उभे राहणार, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय..
CM Eknath Shinde : जन्मतः दोन्ही हात नाही.. पण तरीही अवघ्या 9 वर्षाच्या चिमुकल्याची जिद्द पाहून खुद्द मुख्यमंत्रीही (CM Eknath Shinde) भारावले आहेत. नियतीने जरी हात हिरावले, तरी चिमुकल्याने आपली इच्छाशक्ती कायम ठेवली. या चिमुकल्याने सुद्धा इतर मुलांप्रमाणे एक मोठं स्वप्न पाहिलं.. ते स्वप्न आहे, भारतीय सैन्यात भरती होण्याचं... आणि त्याच्या याच जिद्दीला सलाम करत मुख्यमंत्री देखील त्याच्या मदतीला धावून आले आहेत. चिमुकल्याचं सैन्यात भरती होण्याचं स्वप्न पूर्ण होईपर्यंत त्याच्या पाठीशी उभे राहणार, असं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलंय.
हात नाही म्हणून काय झालं..! त्याने आपलं संपूर्ण नाव चक्क पायाने लिहून दाखवले
नंदुरबार (Nandurbar) जिल्ह्यातल्या शहादा तालुक्यातील असलोद गावात राहणारा हा चिमुकला म्हणजे गणेश माळी.. वय अवघे 9 वर्ष.. सध्या गणेश इयत्ता तिसरी मध्ये शिकत आहे. जन्मापासूनच दोन्ही हात नसलेल्या गणेशच्या कोवळ्या वयातही त्याच शिक्षण आणि खेळातील अभिरुचीला त्याचा अपंगत्व थांबू शकले नाही. आज महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या समोर हात नसल्यामुळे त्याने पायाने संपूर्ण त्याचे नाव लिहून दाखवले.
मुख्यमंत्र्यांकडून कृत्रिम हात बसवून देण्याचे आश्वासन
काही दिवसापूर्वी गणेशला अपंगत्व आहे त्याला मदत करा असे आर्जव करत त्याचे वडील त्याला मंत्रालयामध्ये मुख्यमंत्री वैद्यकीय सहायता निधीचे प्रमुख मंगेश चिवटे यांच्याकडे घेऊन आले होते. परंतु हा आजार मुख्यमंत्री सहायता निधी मध्ये बसत नसल्याने मंगेश चिवटे यांनी राज्याचे संवेनशील मुख्यमंत्री एकनाथ यांची भेट घालून दिली. या चिमुकल्याची जिद्द पाहताच मुख्यमंत्र्यांनी देखील लगेचच गणेशची संपूर्ण जबाबदारी घेतली. पहिल्या टप्प्यामध्ये 5 लाख रूपयाचा धनादेश त्यांच्या वडिलांकडे सुपूर्द करण्यात आला. तसेच लवकरच त्याला कृत्रिम हात बसवून देण्याचे आश्वासन दिले.
गणेशच्या 'त्या' उत्तराने मुख्यमंत्रीही भारावले!
यावेळी गणेशला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी "मोठा होऊन काय बनायचं आहे?" असा प्रश्न विचारला असता गणेशने "मला मोठं झाल्यावर आर्मीमध्ये भरती व्हायचं आहे आणि शत्रूंना गोळ्या घालायच्या आहेत" असे सांगितले, तर संवेदनशीलता राखत मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांनी देखील गणेशचं आर्मीमध्ये भरती होण्याच स्वप्न पूर्ण होईपर्यंत त्याच्या पाठीशी उभे राहणार असल्याचा शब्द दिला.
हेही वाचा>>>
Travel : रामनवमीला गर्दीमुळे अयोध्येला जाता येत नसेल, तर 'या' अद्भूत श्रीराम मंदिरांना भेट द्या, कमी बजेटमध्ये करा यात्रा
Check out below Health Tools-
Calculate Your Body Mass Index ( BMI )