Travel : रामनवमीला गर्दीमुळे अयोध्येला जाता येत नसेल, तर 'या' अद्भूत श्रीराम मंदिरांना भेट द्या, कमी बजेटमध्ये करा यात्रा
Travel : अयोध्येला रामललाच्या दर्शनासाठी जाता येत नसेल तर, अयोध्येव्यतिरिक्त रामनवमीला 'या' ठिकाणी श्रीरामाचे दर्शन घ्या, तुमची ही यात्रा बजेटमध्ये पूर्ण होईल
Travel : श्रीरामाचा (Ram Navami 2024) उत्सव रामनवमी अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपलीय, अशात तुम्ही जर रामललाचे दर्शन घेण्यासाछी अयोध्येला जाता येत नसेल, तर आम्ही तुम्हाला सांगतो, रामनवमीचा सण आहे, त्यामुळे लाखो भाविक या विशेष प्रसंगी अयोध्येला जाण्याचे नियोजन करत आहेत. आता प्रशासनानेही त्यादृष्टीने तयारी केली आहे. 15 एप्रिल ते 17 एप्रिल या कालावधीत लोकांना श्री रामजन्मभूमी येथे 24 तास दर्शन घेता येणार आहे. प्रभू रामाच्या या विशेष प्रसंगी अयोध्येत लोकांची मोठी गर्दी होणार असल्याने जर तुमच्यासोबत लहान मुलं किंवा वृद्ध व्यक्ती असतील तर तुम्ही त्याऐवजी भारतातील इतर अद्भूत श्रीराम मंदिरांना देखील भेट देऊ शकता... जाणून घ्या सविस्तर..
अयोध्येशिवाय या मंदिरांमध्येही तुम्ही श्रीरामाच्या दर्शनासाठी जाऊ शकता.
यंदा 17 एप्रिलला देशभरात श्रीरामाचा (Ram Navami 2024) उत्सव रामनवमी साजरी होत आहे. प्रशासनाच्या माहितीनुसार, रामनवमीला सुमारे 15 लाख भाविक याठिकाणी येण्याची शक्यता आहे, अशी आशा प्रशासनाने व्यक्त केली आहे. त्यामुळे गर्दी व्यवस्थापनासाठी सर्व तयारी सुरू आहे. तुम्हीही रामनवमीला श्रीरामाच्या दर्शनासाठी जाण्याचा विचार करत असाल, तर अयोध्येशिवाय या मंदिरांमध्येही तुम्ही श्रीरामाच्या दर्शनासाठी जाऊ शकता. या मंदिरांचा संबंध श्री रामाशी आहे. जाणून घ्या..
View this post on Instagram
रघुनाथ मंदिर, जम्मू
जम्मूमधील रघुनाथ मंदिर हे रामाच्या सर्वात प्रमुख मंदिरांपैकी एक आहे. या मंदिरात दररोज 1500 ते 2000 परराज्यातून भाविक येतात. या रघुनाथ मंदिरात सात उंच 'शिखर' बांधले आहेत. मंदिराच्या आतील भिंती तीन बाजूंनी सोन्याच्या पत्र्यांनी मढवलेल्या आहेत. याशिवाय मंदिरातील लाकडी दरवाजाऐवजी चांदीचा दरवाजा लावण्यात आला आहे. हा चांदीचा दरवाजा जयपूरच्या कारागिरांनी बनवला आहे.
स्थळ- फत्तु चौगन, पक्की झाकी, माझिन, जम्मू आणि काश्मीर
वेळ: मंदिर सकाळी 6.00 ते रात्री 8.00 पर्यंत खुले असते.
कसे पोहोचायचे- जम्मू हे मंदिर रेल्वे स्टेशनपासून सुमारे 3 किमी अंतरावर आहे.
हे मंदिर जम्मू विमानतळापासून सुमारे 8 किमी अंतरावर आहे.
लक्षात ठेवा- मंदिरात कॅमेरे, मोबाईल आणण्यास परवानगी नाही.
श्री राम तीर्थ मंदिर, पंजाब
पंजाबमधील अमृतसर येथे असलेल्या या मंदिराचे वैभव सर्वात अनोखे आहे. श्रीराम आणि माता सीता यांनी वनवासात येथेच विश्रांती घेतली होती, असे मानले जाते. या मंदिराजवळ एक तलाव आहे, जो अत्यंत पवित्र मानला जातो. असे मानले जाते की, जेव्हा श्रीरामाने अश्वमेध यज्ञासाठी घोडा सोडला होता, त्याच ठिकाणी त्यांचे पुत्र लव-कुश यांनी घोडा पकडून रामजीशी युद्ध केले होते.
वेळ- सकाळी 6:00 ते रात्री 8:00 (या मंदिरांना भेट दिल्याशिवाय प्रवास अपूर्ण आहे)
ठिकाण- चोगव्हाण रोडपासून पश्चिमेला ११ किमी अंतरावर आहे.
कोंदंडा रामास्वामी मंदिर, चिकमंगळूर
श्री रामाचे हे मंदिर कर्नाटकातील चिकमंगळूर येथे एका टेकडीवर आहे. 16 व्या शतकात बांधलेले हे मंदिर शांत वातावरण आणि श्री रामाच्या महिमासाठी ओळखले जाते. हे एकमेव मंदिर आहे जिथे राम आणि लक्ष्मण यांच्या उजव्या बाजूला माता सीता उभी आहे. राम, लक्ष्मण आणि सीता यांनी वनवासाच्या काळात काही काळ येथील जंगलात व्यतीत केल्याचे मानले जाते. येथेच माता सीतेला तहान लागली तेव्हा श्रीरामांनी पृथ्वीवर खोलवर बाण सोडला. त्यामुळे जमिनीतून स्वच्छ पाण्याचा प्रवाह बाहेर आला.
वेळ- येथे तुम्ही सकाळी 6 ते दुपारी 1 वाजेपर्यंत दर्शनासाठी येऊ शकता.
यानंतर मंदिर दुपारी २ ते रात्री ८ वाजेपर्यंत खुले राहते.
कसे पोहोचायचे- तुम्ही येथे वोंटीमिट्टा रेल्वे स्टेशनवरून येऊ शकता. मंदिरापासून रेल्वे स्टेशनचे अंतर 1.4 किमी आहे.
श्री रामाची प्रसिद्ध मंदिरे
-राम राजा मंदिर, मध्य प्रदेश,
-त्रिप्रयार श्री राम मंदिर, केरळ (या शहरांमधून अयोध्येला थेट विमानसेवा उपलब्ध असेल)
-रामास्वामी मंदिर, तामिळनाडू
-सीता रामचंद्रस्वामी मंदिर, तेलंगणा
-तुम्ही महाराष्ट्रातील काळाराम मंदिरात श्री रामाला भेट देण्याची योजना देखील करू शकता.
अयोध्येला रामललाच्या दर्शनासाठी अयोध्येला जात असाल तर हे लक्षात ठेवा.
-फोन, पाकीट, चार्जर, चाव्या, इलेक्ट्रॉनिक वस्तू घेता येणार नाहीत.
-तुम्हाला आवारात एक लॉकर मिळेल, जे विनामूल्य आहे. त्यात तुम्ही तुमचे सामान ठेवू शकता.
-रामललाला अर्पण या गोष्टी अर्पण केल्या जाऊ शकत नाही - नारळ, फुलांच्या माळा आणि सजावटीच्या वस्तू.
-आरतीला उपस्थित राहण्यासाठी तुम्हाला प्रथम पास घ्यावा लागेल.
-रामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टतर्फे मोफत पास सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )
हेही वाचा>>>
Travel : भारतातील श्री रामाचे अनोखे मंदिर, जेथे धनुष्यबाण शिवाय बसले भगवान राम... एकदा दर्शन घ्या...