एक्स्प्लोर
विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची आज मतमोजणी, कसा लागतो निकाल?
वैध मतपत्रिकांच्या आधारे पहिल्या पसंतीची किती मते आवश्यक आहेत याचा कोटा निश्चित केला जातो. या सर्व पक्रियेला बराच वेळ लागतो.
![विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची आज मतमोजणी, कसा लागतो निकाल? maharashtra legislative councils graduate and teacher constituencies what is the result process विधानपरिषदेच्या पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघाची आज मतमोजणी, कसा लागतो निकाल?](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2020/12/03221102/WhatsApp-Image-2020-12-03-at-4.40.24-PM.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
मुंबई : पदवीधर आणि शिक्षक मतदारसंघात कोणत्याही उमेदवाराला वैध मताच्या 51 टक्के मते मिळाली तरच उमेदवार पहिल्या फेरीत विजय होतो. म्हणजे पहिल्या फेरीत निवडणुकीचा निकाल लागतो अन्यथा बाद फेरीत मत मोजणी केली जाते त्यात कमीमध्ये मिळणारे उमेदवार क्रमाने बाद होतात. या किचकट प्रक्रियेमुळेच पदवीधर आणि शिक्षक मतदार संघातील आज होणाऱ्या मतमोजणीचा निकाल उशिरा लागेल कदाचित उद्या पहाटेपर्यंत लांबण्याची शक्यता आहे.
मतमोजणी कशी होते...?
- सर्व मतपत्रिका एकत्र केल्या जातात. त्यातून बाद मतपत्रिका बाजूला काढल्या जातात.
- वैध मतपत्रिकांची मोजणी केली जाते.
- वैध मतपत्रिकांच्या आधारे पहिल्या पसंतीची किती मते आवश्यक आहेत याचा कोटा निश्चित केला जातो. या सर्व पक्रियेला बराच वेळ लागतो.
- वैध मतपत्रिकांच्या संख्येला दोनने भागून त्यात 1 अधिक केला जातो. उदा. 100 वैध मते असल्यास त्याला दोनने भागून (100 भागीले दोन = 50 अधिक 1 अधिक म्हणजे 51 मतांचा कोटा येतो.)
- या सूत्रानुसार उमेदवाराला पहिल्या पसंतीची 51 मते किवा 51 टक्के मते मिळाल्यास त्याला विजयी घोषित केले जाते.
- निश्चित केलेल्या कोट्याएवढी मते कोणत्याही उमेदवाराला मिळाली नाही तर बाद पद्धतीने मते मोजली जातात.
- पुणे पदवीधरमध्ये 62 उमेदवार रिंगणात या आहेत. समजा कोणत्याही उमेदवाराला पहिल्या पसंतीचा कोटा पूर्ण करता आला नाही तर दुसऱ्या, तिसऱ्या पसंतीची मते मोजली जातील.
- अशा वेळी 62 व्या क्रमांकावरील उमेदवार सर्वात आधी बाद होतो, पण त्याच्या दुसऱ्या पसंतीची मते मोजली जातात. मताचे मूल्य एक एवढे असते.
- या उतरत्या क्रमाने 62, 61, 60, 59... असे एकापाठोपाठ एक उमेदवार बाद होत जातात.
- या प्रक्रियेत मतांचा कोटा कोणत्याही उमेदवाराने पूर्ण केल्यास त्याला विजयी घोषित केले जाते.
- सर्व मते मोजल्यावर कोणत्याही उमेदवाराला कोट्याएवढी मते मिळाली नाही तर सर्वाधिक मते मिळणाऱ्या उमेदवाराला विजयी म्हणून घोषित केले जाते.
संबंधित बातम्या :
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्राईम
मुंबई
बातम्या
विश्व
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)