एक्स्प्लोर

धुळे आणि नंदुरबार विधानपरिषद पोटनिवडणुकीत भाजपचे अमरीश पटेल विजयी घोषित

धुळे आणि नंदुरबार स्थानिक स्वराज संस्थेच्या विधानपरिषद पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत भाजपच्या अमरीश पटेल यांनी विजय मिळवला आहे. अमरीश पटेल यांना 332 तर काँग्रेसचे अभिजित पाटील यांना 98 मतं मिळाली आहेत. मात्र पटेल यांच्या विजयाबाबत अद्याप याबाबत अधिकृत घोषणा होणं बाकी आहे.

धुळे : धुळे आणि नंदुरबार स्थानिक स्वराज संस्थेच्या विधानपरिषद पोटनिवडणुकीच्या मतमोजणीत भाजपच्या अमरीश पटेल यांनी दणदणीत विजय मिळवला आहे. अमरीश पटेल यांना 332 तर काँग्रेसचे अभिजित पाटील यांना 98 मतं मिळाली आहेत. धुळे आणि नंदुरबार स्थानिक स्वराज संस्थेच्या पोटनिवडणुकीत 434 पैकी 4 मतं बाद झाली तर 430 मतं वैध ठरली. 216 प्रथम प्राधान्याची मतं घेणारा उमेदवार जिंकणार असं गणित होतं. भाजप उमेदवार अमरीश पटेल यांनी 332 मतं घेत पाटील यांच्यावर विजय मिळवला आहे.

काँग्रेसमधून भाजपात आलेल्या अमरीश पटेल तसेच भाजपमधून काँग्रेसमध्ये आलेल्या अभिजीत पाटील यांच्यात ही सरळ लढत झाली. अमरिश पटेल यांनी विधान परिषदेच्या सदस्यत्वाचा 30 सप्टेंबरला राजीनामा दिला होता. त्यांचा विधान परिषद सदस्यत्वाचा कालावधी 14 डिसेंबर 2021 या दिवशी पूर्ण होत होता. मात्र तत्पूर्वीच त्यांनी राजीनामा दिल्यानं केवळ 12 महिन्यांचा कालावधी निवडून येणाऱ्या उमेदवाराला मिळणार आहे. काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात झालेल्या राजकीय घडामोडींचा या निवडणुकीत भाजपला फायदा होणार कि महाविकास आघाडी सरकारला फायदा होणार याकडं लक्ष लागून होतं. मात्र भाजपमध्ये गेलेल्या अमरीश पटेल यांनी त्यांचा गड राखला आहे.

एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेल्यानंतर ही पहिली निवडणूक होती. मात्र खडसेंना महाविकास आघाडीचा उमेदवार निवडून आणण्यात यश आलं नाही. धुळे-नंदुरबार विधान परिषद हा एकच मतदार संघ आहे. काँग्रेसला अलविदा म्हणत भाजपमध्ये आलेल्या अमरीश पटेल यांनी विधानपरिषदेच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिला होता. कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ही निवडणूक दोन महिने पुढे ढकलण्यात आली होती. धुळे-नंदुरबार जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये मतदान करणार्‍या सदस्यांची संख्या 437 होती. धुळे-नंदुरबार विधान परिषद मतदार संघात भाजपचे 199, काँग्रेसचे 157, राष्ट्रवादी काँग्रेसचे 36, शिवसेनेचे 20, एमआयएमचे 9, समाजवादी पक्षाचे 7, बसपा , मनसेचा प्रत्येकी एक, अपक्ष दहा सदस्य मतदार होते. 437 मतदारांपैकी 434 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

महत्त्वाच्या बातम्या

सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Mumbai Crime News: कुटुंबापासून दूर मुंबईत शिक्षणासाठी आला, मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यानं 12 व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं; मन सुन्न करणारी घटना!
कुटुंबापासून दूर मुंबईत शिक्षणासाठी आला, मॅनेजमेंटच्या विद्यार्थ्यानं 12 व्या मजल्यावरून उडी मारून आयुष्य संपवलं; मन सुन्न करणारी घटना!
Maharashtra Goverment Cabinet Decision: मुंबईत गोपाळकाला ऐवजी रक्षाबंधनाची स्थानिक सुट्टी जाहीर; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 महत्वाचे निर्णय
मुंबईत गोपाळकाला ऐवजी रक्षाबंधनाची स्थानिक सुट्टी जाहीर; मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य सरकारचे 8 महत्वाचे निर्णय

व्हिडीओ

Manoj Jarange Convoy Vehicles Accident : जरांगेंच्या ताफ्यातील 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची?
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त
Sharad Pawar NCP MP Meet PM Modi : मोदींच्या दरबारी कोणती 'तुतारी'? Special Report
Nitesh Rane : जरांगे, राज ठाकरे, फडणवीस-जयंतरावांचा एकत्र प्रवास ते पवारांचे खासदार; राणेंचं भाष्य!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Mumbai Local Train Accident: मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
मुंब्रा खाडीजवळ साईराज चालत्या ट्रेनमधून बाहेर फेकला गेला, आधी रॉडला अडकला मग खाडीत पडून मृत्यू
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
सर्पदंशाने आश्रमशाळेतील तीन मुलींचा मृत्यू, मंत्रालयात पडसाद; CM फडणवीसांकडून अधिकाऱ्याच्या निलंबनाचे आदेश
Manoj Jarange Patil Defender Car: मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
मनोज जरांगे पाटील वापरत असलेली ती डिफेंडर कार कोणाची?
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
परभणीतील धक्कादायक घटना; स्थानिकांनी लाल फडकं दाखवलं पण, रेल्वे थांबलीच नाही, सुषमा अंधारेंकडून व्हिडिओ शेअर
Sachin Ahir Shivsena: इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
इकडे सचिन अहिरांनी मुंबईत शिंदेंची शिवसेना बांधायला घेतली तिकडे भावाचीही बैठकांना हजेरी, सुनील अहिरही उद्धव ठाकरेंची साथ सोडणार?
Sunita Ahuja On Govinda: अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
अभिनेत्री कोमलसोबत गोविंदा एअरपोर्टवर स्पॉट, पत्नी सुनीता अहुजानं थेट अक्कल काढली; म्हणाली...
Sunetra Pawar: रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
रेवती-सारंगच्या रिसेप्शनला पार्थ-जयची उपस्थिती, पण सुनेत्रा पवार का नव्हत्या? राष्ट्रवादीच्या नेत्याने कारण सांगितलं
Tejasvee Ghosalkar Gen Z: भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
भाजपच्या तेजस्वी घोसाळकरांची जेन झी साठी महत्त्वाची मागणी, लोकल ट्रेनमधील तीन डबे आरक्षित करा, थेट रेल्वेमंत्र्यांना धाडलं पत्र
Embed widget