Maharashtra Legislative Council Election : प्रज्ञा सातवांचा विधान परिषद निवडणुकीत विजय, पण काँग्रेसची मतं फुटल्याची चर्चा!
Maharashtra Legislative Council Election : काँग्रेसची मतं फुटल्याने एक प्रकारे महाविकास आघाडीलाच या निवडणुकीमध्ये धक्का बसल्याची चर्चा आहे. विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची 8 मते फुटल्याची चर्चा आहे.
Maharashtra Legislative Council Election : विधान परिषद निवडणुकीसाठी 11 जागांसाठी 12 उमेदवार रिंगणात असल्याने कोण एकाची विकेट काढणार याची चर्चा रंगली होती. मात्र, महायुतीने विधानपरिषद निवडणुकीमध्ये बाजी मारताना सर्व उमेदवारांचा विजय खेचून आणला आहे. मात्र, महाविकास आघाडीला तिसरा उमेदवार दिल्याने फटका बसल्याची चिन्हे आहेत. काँग्रेसच्या प्रज्ञा सातव यांनी निवडणुकीमध्ये विजय मिळवला. मात्र, निवडणुकीत काँग्रेसची मते फुटल्याची चर्चा आहे. गेल्या काही दिवसांपासून अजित पवार गटाची मते फुटणार असल्याची चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळामध्ये रंगली होती. मात्र अजित पवारांची मत फोडण्यात अपयश आल्याचे विधान परिषद निवडणुकीवरून सिद्ध झालं आहे. दुसरीकडे काँग्रेसची मतं फुटल्याने एक प्रकारे महाविकास आघाडीलाच या निवडणुकीमध्ये धक्का बसल्याची चर्चा आहे.
विधानपरिषद निवडणुकीत काँग्रेसची 8 मते फुटल्याची चर्चा आहे. त्यामुळे लोकसभेला दमदार यश मिळालेल्या काँग्रेसला हा मोठा धक्का मानला जात आहे.
कोणकोणते उमेदवार विजयी?
भाजपचे विजयी उमदेवार
1) योगेश टिळेकर - 26 मते
2) पंकजा मुंडे - 26 मते
3) परिणय फुके- 26 मते
4) अमित गोरखे - 26 मते
5) सदाभाऊ खोत - 24
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे विजयी उमेदवार
1) भावना गवळी
2) कृपाल तुमाने
राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार)
1. शिवाजीराव गर्जे
2. राजेश विटेकर
काँग्रेस विजयी उमेदवार
1) प्रज्ञा सातव - 26
काँग्रेसची एकूण 8 मतं फुटली
दोन वर्षानंतर पुन्हा एकदा फडणवीस यांचा राजकीय वरचष्मा
शरद पवारांना अजित पवारांचं एकही मत फोडता आलं नाही
उद्धव ठाकरेंना शिंदे यांचं एकही मत फोडता आलं नाही
भाजपचे तरूण चेहरे विधानपरिषदेत दिसणार
पंकजा मुंडे यांचं राजकीय पुनर्वसन
अमित गोरखेंच्या रूपानं मातंग समाजातील तरूण चेहरा विधानपरिषदेत
योगेश टिळेकर यांच्या माध्यमातून माळी समाजाला नेतृत्व
सदाभाऊ खोत यांच्या रूपात शेतकरी आणि चळवळीत कार्यकर्ता पुन्हा आमदार
इतर महत्वाच्या बातम्या