एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
बीड-उस्मानाबाद-लातूरमध्ये एका मताची किंमत पाच लाख रुपये?
उस्मानाबाद-बीड-लातूर विधानपरिषदेत एका मतासाठी तब्बल पाच लाख रुपये दिले जात असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे. महत्वाचं म्हणजे आपल्याला पैसे पोहोचले नाहीत, हे सांगण्यासाठी मतदार अनोखा कोडवर्डही वापरत असल्याचं बोललं जात आहे.
उस्मानाबाद : विधानपरिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्थांमधून निवड होणाऱ्या सहा जागांसाठी राज्यात मतदान होत आहे. उस्मानाबाद-बीड-लातूर विधानपरिषदेत एका मतासाठी तब्बल पाच लाख रुपये दिले जात असल्याच्या चर्चांना ऊत आला आहे. महत्वाचं म्हणजे आपल्याला पैसे पोहोचले नाहीत, हे सांगण्यासाठी मतदार अनोखा कोडवर्डही वापरत असल्याचं बोललं जात आहे.
पैसे न पोहोचल्यामुळे उस्मानाबादेत राष्ट्रवादीचे अनेक नगरसेवक मतदानकेंद्रावरुन मतदान न करताच माघारी फिरल्याची माहिती आहे. मात्र काही वेळात हे नगरसेवक पुन्हा मतदानासाठी येणार आहेत. त्यामुळे केवळ पैसे पोहोचले नाहीत म्हणून मतदान केंद्रावरुन मतदानाविना फिरण्याचा कोड वापरला जात असल्याच्या चर्चा उस्मानाबादेत रंगत आहेत.
उस्मानाबाद-बीड-लातूरमध्ये काय होणार?
लातूर-उस्मानाबाद-बीडच्या जागेसाठीची निवडणूक सर्वात चुरशीची मानली जात आहे. कारण ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे आणि विधानपरिषेदेचे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी ही निवडणूक आपल्या प्रतिष्ठेची केली आहे.
या मतदारसंघात भाजपचे सुरेश धस आणि राष्ट्रवादीने पाठिंबा दिलेले अपक्ष उमेदवार अशोक जगदाळे यांच्यात लढत होत आहे.
राष्ट्रवादीने रमेश कराड यांना उमेदवारी दिली होती. मात्र त्यांनी ऐनवेळी अर्ज मागे घेतल्याने, राष्ट्रवादीची आणि पर्यायाने धनंजय मुंडेंची चांगलीच पंचाईत झाली.
त्यामुळे राष्ट्रवादीला ऐनवेळी बंडखोरी करत अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केलेल्या अशोक जगदाळे यांना पाठिंबा द्यावा लागला.
या तीन जिल्ह्यात मिळून एकूण 1006 मतदार आहेत. यापैकी काँग्रेस-राष्ट्रवादीचे मिळून 527, 94 अपक्ष, शिवसेनेचे 64 आणि भाजपचे 321 मतदार आहेत. त्यामुळे भाजप मतांचं गणित कसं जुळवणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
एकूण 1006 मतदार
काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस 527
शिवसेना - 64
भाजप - 321
अपक्ष - 94
नाशिकमध्ये भाजपचा राष्ट्रवादीला पाठिंबा, उस्मानाबाद-बीड-लातूरमध्ये काय?
पालघर लोकसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेची उमेदवारी भाजपच्या जिव्हारी लागली आहे. त्यामुळे विधानपरिषदेत शिवसेनेला धोबीपछाड देण्याची रणनीती भाजपने आखली आहे. नाशिकमध्ये शिवसेनेचा पराभव करण्यासाठी भाजप राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याची शक्यता आहे. त्यामुळे उस्मानाबाद-बीड-लातूरमध्ये शिवसेनेची मतं निर्णायक ठरणार आहेत. कारण, इकडे शिवसेनेच्या सदस्यांमध्ये संभ्रमाची स्थिती आहे.
संबंधित बातम्या :
कोकण विधानपरिषदेत शिवसेना विरुद्ध राणे विरुद्ध तटकरे
रमेश कराड तोडपाणी करण्यात कमी पडले असावे : सुरेश धस
पंकजांचा मास्टरस्ट्रोक, रमेश कराड यांचा अर्ज मागे!
विधानपरिषदेसाठी शिवसेनेचा तिसरा उमेदवारही जाहीर
सेना-भाजपचं पुन्हा 'तुझं माझं जमेना अन् तुझ्याशिवाय करमेना'
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement