(Source: ECI/ABP News/ABP Majha)
स्मार्ट बुलेटिन : 22 नोव्हेंबर 2021 : सोमवार : एबीपी माझा
दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या Smart Bulletin मध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो
Smart Bulletin : दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. एबीपी माझाच्या या बुलेटीनमध्ये दररोज सकाळी राजकीय, सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक, मनोरंजन, क्रिडा विश्वातील महत्त्वाच्या दहा बातम्यांचा आढावा घेतला जातो
1. पंजाबच्या पठाणकोटमध्ये आर्मी कॅम्पच्या त्रिवेणी गेटवर हल्ला, दुचाकीस्वारांनी गेटवर ग्रेनेड फेकले, सीसीटीव्हीद्वारे अज्ञातांचा शोध
पंजाब (Punjab) च्या पठाणकोट (Pathankot) मध्ये आर्मी कॅम्पच्या गेटवर हल्ला करण्यात आला आहे. आर्मी कॅम्पच्या त्रिवेणी गेटवर दोन अज्ञात दुचाकीस्वारांनी ग्रेनेड (Grenade) फेकल्याची माहिती मिळत आहे. सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीनं सध्या दुचाकस्वारांचा शोध घेण्यात येत आहे. या घटनेचा कसून तपास सुरु आहे.
पंजाबच्या पठाणकोटमध्ये आर्मी कॅम्पच्या गेटवर ग्रेनेड हल्ला झाला आहे. दुचाकीस्वारांनी त्रिवेणी गेटवर ग्रेनेड फेकत हा हल्ला केला आहे. त्यानंतर आता सीसीटीव्ही फुटेजद्वारे पोलिसांकडून दुचाकीस्वारांचा शोध सुरु आहे. या हल्ल्यामुळे पठाणकोटमध्ये पोलिसांकडून हायअलर्ट जारी करण्यात आला आहे.
2. आर्थिक जगतात केट कॉईनचा बोलबाला, 1 हजाराची गुंतवणूक करणाऱ्यांना दरमहा 28 हजारांचा फायदा, क्रिप्टोकरन्सीमध्ये जबरदस्त तेजी
3. निकाह सोहळ्यातील समीर वानखेडेंचा काझींसोबतचा फोटो ट्वीट करत नवाब मलिकांचा टोला, तर आज समीर वानखेडेंच्या वडिलांनी दाखल केलेल्या याचिकेवर निर्णय अपेक्षित
4. दिवाळीच्या सुट्टीनंतर आजपासून राज्यभरातल्या शाळा सुरु, पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरु करण्यास बीएमसी अनुकुल, तर टास्क फोर्स मुलांच्या लसीकरणासाठी आग्रही
5. मध्य महाराष्ट्र, कोकण, मराठवाड्यात आज दिवसभर अवकाळी पावसाची शक्यता, किनारपट्टीच्या भागात जोरदार वारे वाहण्याचा अंदाज, मच्छिमारांना समुद्रात न जाण्याचं आवाहन
पाहा व्हिडीओ : स्मार्ट बुलेटिन : 22 नोव्हेंबर 2021 : सोमवार : एबीपी माझा
6. एसटी संपाबाबत आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी, कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर सरकारचं तेरावं घालू, सदाभाऊ खोतांचा इशारा
7. साताऱ्यातल्या गांजे गावात महिला फौजीचं जंगी स्वागत, आसाम रायफल्समध्ये भरती झालेल्या शिल्पा चिकणे यांच्यावर ग्रामस्थांकडून फुलांची उधळण
8. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी आज दिल्ली दौऱ्यावर, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाआधी मोदी विरोधकांची मोट बांधण्याचा दीदींचा प्रयत्न
9. कृषी कायदे मागे घेतल्यानंतर शेतकरी आता हमीभावासाठी आग्रही, शेतकरी संघटनांचं मोदींना खुलं पत्र लिहून आश्वासनांची आठवण
10 . कोलकात्यात दणदणीत विजय मिळवत टीम इंडियाकडून टी-20 मालिकेत न्यूझीलंडला व्हाईट वॉश, आता 25 तारखेपासून सुरु होणाऱ्या कसोटी मालिकेचं आव्हान