एक्स्प्लोर

Kokan News : गणेशोत्सवासाठीच्या रेल्वे तिकीट आरक्षणात काळाबाजार, 164 खाती बनावट असल्याचं तपासात उघड

Kokan News : मध्य रेल्वेने केलेल्या चौकशीत 164 तिकीट आरक्षण खाती बनावट असल्याचे उघड झालंय.  या खात्यांद्वारे 181 तिकिटे काढण्यात आली.

मुंबई : कोकणातील (Kokan News) सर्वात मोठा आणि आवडता सण म्हणजे गणेशोत्सव. याच गणेशोत्सवाला मुंबईतून मोठ्या संख्येने चाकरमानी कोकणात येतात. अवघ्या दीड मिनिटात प्रतीक्षा यादी हजारपार झाली. तसेच तुतारी, जनशताब्दी, मांडवी या एक्स्प्रेसची तिकिटे काढताना ‘रिग्रेट’ असा संदेश दाखविण्यात येत होता. एबीपी माझानं ही बातमी लावून धरल्यावर रेल्वेनं याची दखल घेतली, आणि चौकशीचे आदेश दिले. संबंधित आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असं मध्य रेल्वेनं सांगितलं आहे. 

 चौकशीत 164 बनावट तिकीट आरक्षण खाती बनावट असल्याचे उघड

यंदा 19 सप्टेंबरपासून गणेशोत्सव सुरू होत असून, यानिमित्ताने आधीच्या 120 दिवसांपासून रेल्वेचे तिकीट आरक्षण प्रक्रिया सुरू झाली होती. कोकणकन्या एक्स्प्रेसची प्रतीक्षा यादी अवघ्या दीड मिनिटात हजाराच्या पार गेली होती. त्यानंतर मध्य रेल्वेने केलेल्या चौकशीत 164 तिकीट आरक्षण खाती बनावट असल्याचे उघड झालंय.  या खात्यांद्वारे 181 तिकिटे काढण्यात आली. 18 मे रोजी प्रवाशांनी तिकीट आरक्षित करण्याची प्रक्रिया सुरू केली असता, अवघ्या दीड मिनिटात प्रतीक्षा यादी हजारपार झाली. तसेच तुतारी, जनशताब्दी, मांडवी या एक्स्प्रेसची तिकिटे काढताना ‘रिग्रेट’ असा संदेश दाखविण्यात येत होता. एबीपी माझानं ही बातमी लावून धरल्यावर रेल्वेनं याची दखल घेतली, आणि चौकशीचे आदेश दिले. संबंधित आरोपींवर कठोर कारवाई केली जाईल, असं मध्य रेल्वेनं सांगितलं आहे. 

प्रतिक्षायादी अवघ्या दीड मिनिटातच हजारापार

गणेशोत्सवासाठी गावी जाण्याचा निर्धार केलेले हजारो चाकरमानी तीन महिने अधिपासूनच गावी जाण्या-येण्याचे नियोजन करत असतात. त्यासाठी रात्रभर जागून कोकण रेल्वेचे कन्फर्म तिकीट मिळवण्याचा प्रयत्न करत असतात. यंदा गणेशोत्सव 19 सप्टेंबर रोजी सुरु होत आहे. त्यामुळे त्याआधीच्या किमान दोन दिवसांचे म्हणजे 17 सप्टेंबरचे या प्रवसाच्या तारखेचे 120 दिवस आधीचे आरक्षण खुले झाले. मात्र पहिल्याच दिवशी अवघ्या एक ते दोन मिनिटात आरक्षण पूर्ण झाले तर प्रतिक्षायादीचे लांबच्या लांब फलक लागले आहेत. हा प्रकार म्हणजे रेल्वेच्या आरक्षणात गैरप्रकार होत असण्याची शक्यता अधिक आहे. रेल्वे तिकीटाची अवैध विक्री करणारे दलाल मोठ्या संख्येने तिकीटांचे आरक्षण करुन ते चढ्या दराने विक्री करत असल्याचा आजपर्यंतचा अनेकांचा अनुभव आहे.  सर्वसामान्य प्रवासी सण-उत्सवाला गावी जात असतात त्यावेळीच दलालांकडून मोठ्या संख्येने आरक्षण करुन चढ्या दराने विक्री करण्याचे रॅकेट सुरु आहे. यामध्ये कोणाकोणाचे हितसंबध गुंतले आहेत, या गैरप्रकारात कोणकोण सामील आहे, याची सखोल चौकशी होणं आवश्यक आहे.

 

कोकणात शिमगा आणि गणेशोत्सव हे दोन सण पारंपारिक पद्धतीने मोठ्या उत्साहात साजरे केले जातात. त्यामुळे शहरी भागातला चाकरमानी हा हमखास आपली कामं सोडून किंवा कामावरच्या सुट्ट्या घेऊन तो गणपतीला आणि शिमग्याला हजेरी लावतो

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Bhandara News : साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
Nagpur Accident : रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
Putin Nuclear attack Warning: युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
Mumbai Rains: मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

सकाळी ९ च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 09 AM TOP Headlines 9AM 26 September 2024Amit Shah On Vidhan Sabha : अमित शाहांचा भाजप पदाधिकाऱ्यांना जिंकण्याचा कानमंत्र #abpमाझाNarendra Modi Pune Daura : मोदींच्या पुणे दौऱ्यावर पावसाचं सावट कायम, सभास्थळी चिखलाचं साम्राज्यमाझं गाव, माझा जिल्हा Majha Gaon Majha Jilha 730 AM Superfast 26 Sept 2024

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhandara News : साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
साक्षगंधाच्या कार्यक्रमासाठी तयार केलेल्या भाजीत पाल पडली, भंडाऱ्यात 51 जणांना विषबाधा
Nagpur Accident : रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
रामझुला मर्सडिज अपघात प्रकरणी रितिका मालूचा जामीन अखेर रद्द, अटकेचा मार्ग मोकळा
Putin Nuclear attack Warning: युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
युक्रेनला 'ती' संहारक क्षेपणास्त्रं मिळाली, रशियावर मोठ्या हल्ल्याची शक्यता; पुतीन अणुबॉम्ब वापरण्याच्या तयारीत?
Mumbai Rains: मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
मुंबई धो-धो पाऊस, पण BMC च्या आपातकालीन विभागाच्या अधिकाऱ्यांनी मदतीसाठी आलेला एकही फोन उचलला नाही; ठाकरे गटाचा आरोप
PM Modi in Pune: पुण्यातला पाऊस पंतप्रधान मोदींच्या सभेचा विचका करणार? एसपी कॉलेजमध्ये चिखल झाला तर सभा कुठे होणार, आयोजकांकडून तयारीला सुरुवात
पुण्यातला पाऊस पंतप्रधान मोदींच्या सभेचा विचका करणार? पर्यायी चाचपणी सुरु, आयोजक तयारीला लागले
Navratri 2024 : नवीन महिन्यासोबतच शारदीय नवरात्रीला सुरुवात; नवरात्रीचे 9 दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचे, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
नवीन महिन्यासोबतच शारदीय नवरात्रीला सुरुवात; नवरात्रीचे 9 दिवस 'या' 3 राशींसाठी भाग्याचे, उत्पन्नाचे नवे स्रोत होणार खुले
Bengaluru Crime : बंगळुरुत महालक्ष्मीचे 59 तुकडे करुन पळाला, आता मुख्य आरोपीचा मृतदेह ओडिशात सापडला, सस्पेन्स वाढला
बंगळुरुतील महालक्ष्मी खून प्रकरणाला नवं वळण, संशयित आरोपीचा मृतदेह आढळला, सस्पेन्स वाढला
Mumbai Rain : मुसळधार पावसानं झोडपलं, 250 मिमीहून अधिक पाऊस पडला, लोकल खोळंबली, विमानं वळवली अन् रस्त्यावर वाहतूक कोंडी,मुंबईकरांचे प्रचंड हाल
मुंबईला पावसानं झोडपलं, पाणी साचलं, वाहतूक कोंडी अन् लोकल खोळंबल्यानं मुंबईकरांचे प्रचंड हाल
Embed widget