एक्स्प्लोर

निवडणूक निकाल २०२४

(Source:  ECI | ABP NEWS)

Gulabrao Patil : खडसेंची आमदारकी परत घ्या, त्यांनीच राष्ट्रवादी संपवायला काढली, गुलाबराव पाटलांची टोलेबाजी

एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचे खच्चीकरण केले आहे. त्यामुळेच जळगाव दूध संघाच्या निवडणुकीत निम्मी राष्ट्रवादी आमच्यासोबत आली असल्याचे वक्तव्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी केलं.

Gulabrao Patil On Eknath Khadse : जळगाव दूध संघाच्या निवडणुकीत (jalgaon zilla dudh sangh election) एकनाथ खडसेंच्या (Eknath Khadse) पॅनेल विरोधात राष्ट्रवादी काँग्रेसचेच पाच उमेदवार विजयी झाले आहेत. यावरुन मंत्री गुलाबराव पाटील (Gulabrao Patil) यांनी खडसेंच्या विरोधात चांगलाच टोला लगावलाय. एकनाथ खडसेंनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांचे खच्चीकरण केल्यानं निम्मी राष्ट्रवादी आमच्यासोबत आली आहे. त्यांची आमदारकी परत घ्यायला पाहिजे कारण, त्यांनी राष्ट्रवादी संपवायला काढल्याचा टोला मंत्री गुलाबराव पाटील यांनी लगावला. ते जळगावमध्ये प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 

16 जागांवर भाजप-शिंदे गटाचे उमेदवार विजयी

जळगाव दूध संघाच्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांच्यासह मंत्री गिरीश महाजन आणि मंत्री गुलाबराव पाटील या दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. या निवडणुकीत भाजप-शिंदे गटानं एकनाथ खडसे गटाचा पराभव करत जळगाव जिल्हा दूध संघाची सत्ता काबीज केली आहे. 20 पैकी 16 जागांवर भाजप-शिंदे गटाचे उमेदवार विजयी झालेत. तर 4 जागांवर एकनाथ खडसे गटाचे उमेदवार विजयी झाले आहेत.

गुलाबराव पाटलांची खोचक टीका

सहकाराची निवडणूक ही थेट पक्षाच्या चिन्हावर होत नसली तरी पक्षाच्या नेत्यासोबत कार्यकर्त्यांनी राहायला हवं अशी अपेक्षा असते. किमान विरोधी पक्षाच्या गोटातून तरी त्यांनी निवडणूक लढवायला नको असं मानल जात होते. मात्र, खडसे यांचे अगदी निकटवर्तीय असलेल्या पाच उमेदवारांनी गिरीश महाजन यांच्या शेतकरी पॅनल कडून उभे राहून खडसे यांच्या सहकार पॅनल विरोधात विजय मिळवला आहे. त्यामुळं खडसे यांच्यावर पराभवाची नामुष्की आली असल्याचं आता विरोधक तोंडावर बोलत आहेत. या निवडणुकीत निम्मी राष्ट्रवादी आमच्यासोबत असल्याचा दावा शिंदे गटाचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी केला आहे. जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी एकनाथ खडसे यांनीच संपवायला काढली असल्यानं तुमची आमदारकी परत घ्यायला पाहिजे अशा प्रकारची खोचक टीका मंत्री गुलाबराव पाटील यांनी केली आहे.

'या' राष्ट्रवादीच्या नेत्यांनी लढवली खडसेंच्या गटाविरोधात निवडणूक

जळगाव जिल्ह्यातील राष्ट्रवादी पक्षाचे एकनिष्ठ असलेले माजी आमदार दिलीप वाघ, माजी जिल्हा उपाध्यक्ष संजय पवार, शामल झाम्रे, प्रदीप निकम, मधुकर राणे इत्यादी प्रमुख कार्यकर्त्यांनी ऐनवेळी खडसे यांच्या महाविकास आघाडीला राम राम केला. हे सर्वजन गिरीश महाजन यांच्या शेतकरी विकास पॅनलला जाऊन मिळाले. अगदी शेवटच्या क्षणी खडसे यांना हा धक्का बसला. 

खडसेंच्या पॅनलमध्ये अटी घालण्यात आल्यानं मी गिरीश महाजन यांच्या पॅनेलमध्ये : संजय पवार

दूध संघाच्या निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादीचे माजी जिल्हा उपाध्यक्ष संजय पवार म्हणाले की, मी नेहमीच शरद पवार आणि अजित पवार यांच्यासोबत आहे. मात्र, खडसेंच्या पॅनलमध्ये मला काही अटी शर्थी घालण्यात आल्या होत्या. त्या मला पटणाऱ्या नसल्यानं मी सर्वपक्षीय पॅनल असलेल्या गिरीश महाजन यांच्या शेतकरी पॅनलमध्ये राहिलो आहे. सहकारमध्ये पक्षीय राजकारण नसते. मागील काळात सहकाराच्या निवडणुकीत राष्ट्रवादीचे अनेक नेते हे इतरांसोबत गेले आहेत. ते यांना चालले होते. मग आताच न चालण्यासारखं काय? असा सवालही पवार यांनी उपस्थित केला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Haryana Election: काँग्रेसचा शेतकरी, सैनिकांच्या मुद्द्यांवर जोर, विनेश फोगाटने वातावरण तापवलं, तरी भाजपाने कशी मुसंडी मारली? जाणून घ्या 5 महत्त्वाची कारणं
काँग्रेसचा शेतकरी, सैनिकांच्या मुद्द्यांवर जोर, विनेश फोगाटने वातावरण तापवलं, तरी भाजपाने कशी मुसंडी मारली? जाणून घ्या 5 महत्त्वाची कारणं
ठरलं बरका... अजित पवारांना गुलीगत धोका; रामराजेंसह उमेदवारी जाहीर केलेला आमदारही साथ सोडणार
ठरलं बरका... अजित पवारांना गुलीगत धोका; रामराजेंसह उमेदवारी जाहीर केलेला आमदारही साथ सोडणार
Haryana Election Results 2024 : हरियाणात भाजपने मुसंडी मारताच रावसाहेब दानवेंचा 'कॉन्फिडन्स' वाढला; म्हणाले, महाराष्ट्रात...
हरियाणात भाजपने मुसंडी मारताच रावसाहेब दानवेंचा 'कॉन्फिडन्स' वाढला; म्हणाले, महाराष्ट्रात...
मुलगी शिकली प्रगती झाली,पण काम नाही म्हणून 1500 देऊन घरी बसवली; ठाकरेंचा घणाघात
मुलगी शिकली प्रगती झाली,पण काम नाही म्हणून 1500 देऊन घरी बसवली; ठाकरेंचा घणाघात
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : मुख्यमंत्र्यांची तब्येत बरी नसल्यानं मंत्रिमंडळ बैठक रद्दBalasaheb Thorat on Haryana Election Result : हरियाणामध्ये काँग्रेसंच सत्तास्थापन करेल : थोरातJammu Kashmir Haryana Result : हरियाणात काँग्रेसचं बहुमत पण मुख्यमंत्र्यांसह सर्व मंत्री पिछाडीवरJammu Kashmir Election Result : जम्मू-कश्मिरमध्ये काटे की टक्कर, भाजपची परिस्थिती काय?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Haryana Election: काँग्रेसचा शेतकरी, सैनिकांच्या मुद्द्यांवर जोर, विनेश फोगाटने वातावरण तापवलं, तरी भाजपाने कशी मुसंडी मारली? जाणून घ्या 5 महत्त्वाची कारणं
काँग्रेसचा शेतकरी, सैनिकांच्या मुद्द्यांवर जोर, विनेश फोगाटने वातावरण तापवलं, तरी भाजपाने कशी मुसंडी मारली? जाणून घ्या 5 महत्त्वाची कारणं
ठरलं बरका... अजित पवारांना गुलीगत धोका; रामराजेंसह उमेदवारी जाहीर केलेला आमदारही साथ सोडणार
ठरलं बरका... अजित पवारांना गुलीगत धोका; रामराजेंसह उमेदवारी जाहीर केलेला आमदारही साथ सोडणार
Haryana Election Results 2024 : हरियाणात भाजपने मुसंडी मारताच रावसाहेब दानवेंचा 'कॉन्फिडन्स' वाढला; म्हणाले, महाराष्ट्रात...
हरियाणात भाजपने मुसंडी मारताच रावसाहेब दानवेंचा 'कॉन्फिडन्स' वाढला; म्हणाले, महाराष्ट्रात...
मुलगी शिकली प्रगती झाली,पण काम नाही म्हणून 1500 देऊन घरी बसवली; ठाकरेंचा घणाघात
मुलगी शिकली प्रगती झाली,पण काम नाही म्हणून 1500 देऊन घरी बसवली; ठाकरेंचा घणाघात
Priya Dut : आशिष शेलारांविरोधात काँग्रेसचा उमेदवार ठरला, वांद्रे पश्चिममधून प्रिया दत्त लढणार, जिंकण्यासाठी रणनीतीही तयार
आशिष शेलारांविरोधात काँग्रेसचा उमेदवार ठरला, वांद्रे पश्चिममधून प्रिया दत्त लढणार, जिंकण्यासाठी रणनीतीही तयार
Haryana Elections Results 2024: हरियाणात प्रतिकूल परिस्थितीतही  कल भाजपच्या बाजूने, महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?
हरियाणात प्रतिकूल परिस्थितीतही कल भाजपच्या बाजूने, महाराष्ट्रावर काय परिणाम होणार?
रायगडचा गड शरद पवार भेदणार, शिंदे गटाचा नेता तुतारी हातात घेणार?
रायगडचा गड शरद पवार भेदणार, शिंदे गटाचा नेता तुतारी हातात घेणार?
हरियाणात भाजपची विजयी घोडदौड! भाजपचे ज्येष्ठ नेते शिवराज सिंह चौहान यांचे मोठे वक्तव्य, म्हणाले मी आधीच सांगितले होते..
हरियाणात भाजपच्या आघाडीवर शिवराज सिंह चौहान यांचे मोठे वक्तव्य; म्हणाले, मी आधीच सांगितले होते.....
Embed widget