एक्स्प्लोर

Maharashtra Inflation: महागाईनं सर्वसामान त्रस्त; गहू, ज्वारी आणि बाजरीनं ओलांडली पन्नाशी, तर डाळी 120 ते दीडशेच्या घरात

Maharashtra Inflation Updates: महागाईचा सर्वसामान्यांना फटका फटका बसला आहे. तुमच्या ताटातले जवळपास सर्वच पदार्थ महागले आहेत.

Maharashtra Inflation: महाराष्ट्रात महागाईचा (Inflation) भडका उडाला आहे. किरकोळ मार्केटमध्ये चांगल्या दर्जाच्या गहू (Wheat), ज्वारी (Jowar), बाजरीने (Bajri) पन्नाशी ओलांडली आहे. उडीद डाळ, मुग डाळ, तूर डाळ होलसेल मार्केटमध्येच शंभरी पार गेली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचं किचनचं बजेट बिघडलं आहे. सर्वसामान्यांच्या ताटातले जवळपास सर्वच पदार्थ महागल्यामुळे घराचा रहाटगाडा हाकताना सर्वसामान्यांच्या नाकी नऊ आले आहेत. 

राज्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका धान्य उत्पादनाला बसला आहे. ज्वारी, बाजरी, गहू, डाळी, कडधान्यांच्या किंमती कडाडल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांचं बजेट कोलमडले आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षीही जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती 15 ते 20 टक्क्यांनी वाढल्या आहेत. ज्वारीचे दर 22 ते 29 रुपयांवरुन थेट 28 ते 50 रुपयांवर गेले आहेत. 

पाहुयात सध्याचे दर काय आहेत, ते सविस्तर...

पदार्थ दर (प्रति किलो)
गहू  36 ते 38
ज्वारी 52 ते 70
बाजरी  40 ते 44
तूर डाळ  130 ते 150
मूग डाळ  120 ते 130
उडीद डाळ  120 ते 140 
मूग  110 ते 130
मटकी  120 ते 160
शेंगदाणे  140 ते 170

अवकाळी पावसामुळे धान्यांच्या दरावर परिणाम झाला आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यावर्षीही जीवनावश्यक वस्तूंच्या किंमती 15 ते 20 टक्क्यांनी वाढल्या आहेत. राज्यात अवकाळी पावसाने जोरदार तडाखा दिल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे. अद्याप शेतकऱ्यांना सरकारकडून मदत मिळालेली नाही. मात्र, शेतीचे नुकसान झाल्यानं उभ्या जगाचा पोशिंदा असलेला बळीराजा मात्र सध्या आर्थिक संकटात सापडला आहे. गहू, ज्वारी, मका, केळी, द्राक्ष, संत्री यांचं नुकसान अवकाळी पाऊस आणि गारपीटीनं झालं आहे. ज्वारीचे दर 22 ते 29 रुपयांवरुन थेट 28 ते 50 रुपयांवर पोहोचले आहेत. किरकोळ मार्केटमध्ये चांगल्या दर्जाच्या गहू, ज्वारी, बाजरी पन्नास रुपये प्रतिकिलो दरानं मिळत आहेत. 

राज्यात पुन्हा अवकाळीचा इशारा

राज्यातील वातावरणात सातत्यानं बदल (Climate Change) होत आहे. कधी थंडी तर कधी उन्हाचा कडाका जाणवत आहे. अशातच आता हवामान विभागानं (Meteorological Department) राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा (Rain) इशारा दिला आहे. सात एप्रिलपर्यंत राज्यातील विदर्भासह पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाड्यात अवकाळी पावसाचा यलो अलर्टचा इशारा हवामान विभागानं दिला आहे. दरम्यान, काल (4 एप्रिल) विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर आणि गडचिरोली या जिल्ह्यात पावसाचा यलो अलर्ट देण्यात आला होता. 

अचानक पावसाची स्थिती का निर्माण झाली?

हवामान विभागानं मध्य महाराष्ट्र विदर्भ आणि मराठवाड्यात अवकाली पावसाचा इशारा दिला आहे. अचानक अशी स्थिती का निर्माण झाली, यासंदर्भात हवामान अभ्यासक मयूरेश प्रभुणे यांनी एबीपी माझाला माहिती दिली. पश्चिमेकडून वाहणारे वारे आणि दक्षिण पूर्वेकडून वाहणारे वारे यांचा संयोग विदर्भापासून ते तामिळडूपर्यंत होत आहे. त्यामुळं या बागात द्रोणीय स्थिती म्हणजे कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. या भागात बाष्प जमा होत आहे. तर दुसरीकडे तापमानही वाढत आहे. साधारणत 35 अंशाच्या आसपास तापमान आहे. त्यामुळं या भागात पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवल्याची माहिती प्रभुणे यांनी दिली.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Milind Deora : मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
Satej Patil: खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले,
खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले, "माझ्या पोराबाळांची शपथ घेऊन सांगतो मला काहीही माहिती नव्हतं"
Maharashtra Assembly Elections 2024 : 'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

भाऊबीज उलटली तरी बेस्ट कर्मचाऱ्यांना बोनस नाहीचTOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 5 नोव्हेंबर 2024 : ABP MajhaRaj Thackeray on Ekanth Shinde : हीच का लाडकी बहीण, भिवंडीत भोजपुरी ठुमके, ठाकरेंनी शिंदेंना सुनावलंCM Eknath Shinde : मी कॉमन मॅन आहे,तुम्ही सुपरमॅन बनवा , शिंदे काय म्हणाले?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Milind Deora : मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
मी राहुल गांधींना कित्येकदा लालबागचा राजाच्या दर्शनासाठी बोलावलं, पण...; मिलिंद देवरांचा हल्लाबोल
Satej Patil: खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले,
खमके सतेज पाटील रडतरडत म्हणाले, "माझ्या पोराबाळांची शपथ घेऊन सांगतो मला काहीही माहिती नव्हतं"
Maharashtra Assembly Elections 2024 : 'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
'संघाच्या गडात बंटीचा डंका वाजणारच', नागपूर मध्य विधानसभा मतदारसंघात काँग्रेसच्या उमेदवाराचा मोठा दावा; म्हणाले...
Uddhav Thackeray: उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
उद्धव ठाकरेंचा मोठा निर्णय, पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांना इंगा दाखवला, माजी आमदार रुपेश म्हात्रेंसह अनेकांची हकालपट्टी
Kolhapur North : शाहू महाराजांचा अवमान झाला, सतेज पाटील एवढे मोठे झाले का? धनंजय महाडिकांचा हल्लाबोल!
Kolhapur North : शाहू महाराजांचा अवमान झाला, सतेज पाटील एवढे मोठे झाले का? धनंजय महाडिकांचा हल्लाबोल!
Amit Thackeray Vs Sada Sarvankar: माहीम मतदारसंघात नवा ट्विस्ट, राजपुत्राला पाठिंबा देणाऱ्या आशिष शेलारांचा यू-टर्न, म्हणाले, सदा सरवणकरच महायुतीचे उमेदवार
माहीम मतदारसंघात नवा ट्विस्ट, अमित ठाकरेंना पाठिंबा देणाऱ्या आशिष शेलारांचा यू-टर्न, "सदा सरवणकरच महायुतीचे उमेदवार"
Andheri West constituency: अपक्ष उमेदवाराने अर्ज मागे घेतला, अंधेरी पश्चिम मतदारसंघात काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजारांच्या मताधिक्याने निवडून येण्याचा दावा
अंधेरी पश्चिम विधानसभा मतदारसंघात अपक्ष उमेदवाराची माघार, काँग्रेसची ताकद वाढली, 10 हजार मतांनी निवडून येण्याचा दावा
Horoscope Today 05 November 2024 : आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
आज मंगळवारचा दिवस सर्व 12 राशींसाठी कसा असणार? वाचा आजचे राशीभविष्य
Embed widget