एक्स्प्लोर

Maharashtra HSC Result : अपयश आलं म्हणून खचू नका, पुन्हा एक संधी म्हणून नव्या जोमाने तयारी करा; मुख्यमंत्री ठाकरेंचा सल्ला 

Maharashtra HSC Result : निकालानंतर काही जण निराश होतात. त्यातून टोकाची पावलं उचलली जातात. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी विद्यार्थ्यांना महत्वाचा संदेश दिला आहे.  

Maharashtra HSC Result :  महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे (Maharashtra Board) घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा निकाल आज लागला.  निकालानंतर काही जण निराश होतात. त्यातून टोकाची पावलं उचलली जातात. या पार्श्वभूमीवर राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांनी विद्यार्थ्यांना महत्वाचा संदेश दिला आहे. बारावीच्या परीक्षेत यश मिळविणाऱ्यांचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी अभिनंदन केले आहे. तसेच त्यांना पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी, उज्वल भविष्यासाठी शुभेच्छाही दिल्या आहेत. 

मुख्यमंत्री संदेशात म्हणतात, आयुष्यात परीक्षेतील यशाला महत्व असतेच. परीक्षा भविष्यात येणाऱ्या आव्हानांची तयारी करून घेते. त्यामुळे बारावीच्या परीक्षेत यश मिळविणाऱ्यांचे मनःपूर्वक अभिनंदन. यानंतर सुरु होणाऱ्या शैक्षणिक वाटचालीसाठी आणि आपल्या आवडत्या क्षेत्रामध्ये भविष्य घडवण्यासाठी हार्दिक शुभेच्छा. या वाटचालीतून तुम्हाला आपल्या कुटुंबियांसह, समाज आणि देशाचे भविष्य उज्वल करण्याची संधी मिळणार आहे, या संधीचे आपण सोने कराल, हा विश्वास आहे.  काहींना या टप्प्यावर यशाने थोडक्यात हुलकावणी दिली असेल, अशांनीही खचून न जाता  पुन्हा एक संधी म्हणून नव्या जोमाने तयारी केल्यास, यश तुमचेच असेल, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. 

बारावीची परीक्षा हा शैक्षणिक जीवनातील एक टप्पा असून अंतिम साध्य नाही - अजित पवार 

राज्य शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अभिनंदन केले असून विद्यार्थ्यांना पुढील शैक्षणिक कारकिर्दीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. बारावीची परीक्षा हा शैक्षणिक जीवनातील एक टप्पा असून अंतिम साध्य नाही, त्यामुळे अनुत्तीर्ण विद्यार्थी व पालकांनी निराश न होता, खचून न जाता पुन्हा प्रयत्न करावेत. शिक्षणाच्या बरोबरीनं कला, क्रीडा, तांत्रिक कौशल्य विकसित करुन जीवनात यशस्वी होण्याचा प्रयत्न करावा, असं आवाहनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केलं आहे.यंदा 94.22 टक्के विद्यार्थी बारावी परीक्षा उत्तीर्ण झाले आहेत. विद्यार्थ्यांपेक्षा विद्यार्थीनींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण दोन टक्के अधिक आहे. मुली या मुलांपेक्षा चांगली कामगिरी  करत आहेत, ही सुद्धा समाधानाची बाब असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी नमूद केले. बारावीनंतर विद्यार्थ्यांना शैक्षणिक कारकिर्द ठरवण्याचा, भविष्यातील वाटचाल ठरवण्याचा निर्णय घ्यायचा असतो. विद्यार्थ्यांची आवड, कल लक्षात घेऊन हा निर्णय विद्यार्थी व पालकांनी मिळून घ्यावा, असंही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आपल्या अभिनंदनपर संदेशात म्हटलं आहे.

राज्याचा बारावीचा निकाल 94.22 टक्के

राज्याचा बारावीचा निकाल 94.22 टक्के लागला आहे, जो गेल्यावर्षीच्या तुलनेत 5.31 टक्क्यांनी कमी झाला आहे. मागील वर्षी हा निकाल 99.53 टक्के लागला होता. बारावीच्या निकालात मुलींनी बाजी मारली आहे.  सर्व विभागीय मंडळातून नियमित विद्यार्थिनींचा निकाल 95.35 टक्के लागणार आहे तर मुलांचा निकाल 93.29 टक्के लागला आहे. मुलांपेक्षा 2.06 टक्के अधिक मुली उत्तीर्ण झाल्या आहेत.

बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहा निकाल

यंदा तुम्हाला 'ABP Majha' च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहता येणार आहे. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकणार आहेत. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com  या लिंकवर क्लिक करा.

कसा चेक कराल आपला निकाल

स्टेप 1 - https://marathi.abplive.com/ वर लॉन ऑन करा

स्टेप 2- बारावी निकालाच्या बॅनरवर क्लिक करा

स्टेप 3- तिथं असलेल्या बॉक्समध्ये आपला सीट नंबर टाका

स्टेप 4- तुमच्या आईच्या नावातील पहिली तीन अक्षरं लिहा

स्टेप 5- एंटर केल्यानंतर तुमचा निकाल स्क्रिनवर दिसेल 

स्टेप 6- निकालाची प्रिंट आऊट घ्या किंवा मोबाईलमध्ये सेव्ह करा

बारावी बोर्डाचा निकाल; एबीपी माझावर पाहता येणार, कसा पाहाल? 

यंदा तुम्हाला 'ABP Majha'च्या वेबसाईटवर तुमचा निकाल पाहू शकता. एबीपी माझाची अधिकृत वेबसाईट marathi.abplive.com वर बारावीचे विद्यार्थी झटपट आपला निकाल पाहू शकतो. एबीपी माझाच्या वेबसाईटवर निकाल पाहण्यासाठी mh12.abpmajha.com या लिंकवर क्लिक करा.

Education Loan Information:
Calculate Education Loan EMI

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Dharmendra News: केवळ मैत्रीखातर सुपरस्टार धर्मेंदने मराठी चित्रपटासाठी ते गाणं शूट केलं, विक्रम गोखलेंसोबत अभिनय, कोणता होता 'तो' चित्रपट?
केवळ मैत्रीखातर सुपरस्टार धर्मेंदने मराठी चित्रपटासाठी ते गाणं शूट केलं, विक्रम गोखलेंसोबत अभिनय, कोणता होता 'तो' चित्रपट?
Jayant Patil: निवडणुका जाहीर होताच जयंत पाटलांनी मोठा डाव टाकला; सांगलीतील भाजपचे निष्ठावंत गळाला लावले, शरद पवार गटाची ताकद वाढली
निवडणुका जाहीर होताच जयंत पाटलांनी मोठा डाव टाकला; सांगलीतील भाजपचे निष्ठावंत गळाला लावले, शरद पवार गटाची ताकद वाढली
सिंचन घोटाळ्यातून फडणवीसांनी तुम्हाला बाहेर काढलं, पार्थ पवार जमिनीप्रकरणात अजंली दमानिया गौप्यस्फोट करणार
सिंचन घोटाळ्यातून फडणवीसांनी तुम्हाला बाहेर काढलं, पार्थ पवार जमिनीप्रकरणात अजंली दमानिया गौप्यस्फोट करणार
BMC Election 2025 Uddhav Thackeray Eknath Shinde: देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेत एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंचे किती नगरसेवक?; A टू Z माहिती
देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेत एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंचे किती नगरसेवक?; A टू Z माहिती
Advertisement
Advertisement
Advertisement

व्हिडीओ

Kolhapur Leopard : दोन तासांच्या थरारानंतर कोल्हापुरातील बिबट्या जेरबंद, नागरिकांचा सुटकेचा निश्वास
Delhi Blast Doctor Connection : पुलवामातील डॉक्टर सज्जा अहमद मल्ला चौकशीसाठी ताब्यात
Kolhapur Leopard Attack: कोल्हापूर शहरात बिबट्याचा थरार, पोलिसावर हल्ला करणारा बिबट्या जेरबंद
Faridabad Terror Plot: डॉक्टर उमर संपूर्ण हल्ला प्रकरणाचा मास्टरमाईंड, सुत्रांची माहिती
Supriya Sule NCP: राष्ट्रवादी काँग्रेसची निवडणुकीसाठी खलबतं, सुप्रिया सुळेंनी दिली माहिती

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Dharmendra News: केवळ मैत्रीखातर सुपरस्टार धर्मेंदने मराठी चित्रपटासाठी ते गाणं शूट केलं, विक्रम गोखलेंसोबत अभिनय, कोणता होता 'तो' चित्रपट?
केवळ मैत्रीखातर सुपरस्टार धर्मेंदने मराठी चित्रपटासाठी ते गाणं शूट केलं, विक्रम गोखलेंसोबत अभिनय, कोणता होता 'तो' चित्रपट?
Jayant Patil: निवडणुका जाहीर होताच जयंत पाटलांनी मोठा डाव टाकला; सांगलीतील भाजपचे निष्ठावंत गळाला लावले, शरद पवार गटाची ताकद वाढली
निवडणुका जाहीर होताच जयंत पाटलांनी मोठा डाव टाकला; सांगलीतील भाजपचे निष्ठावंत गळाला लावले, शरद पवार गटाची ताकद वाढली
सिंचन घोटाळ्यातून फडणवीसांनी तुम्हाला बाहेर काढलं, पार्थ पवार जमिनीप्रकरणात अजंली दमानिया गौप्यस्फोट करणार
सिंचन घोटाळ्यातून फडणवीसांनी तुम्हाला बाहेर काढलं, पार्थ पवार जमिनीप्रकरणात अजंली दमानिया गौप्यस्फोट करणार
BMC Election 2025 Uddhav Thackeray Eknath Shinde: देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेत एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंचे किती नगरसेवक?; A टू Z माहिती
देशातील सर्वात श्रीमंत मुंबई महानगरपालिकेत एकनाथ शिंदे अन् उद्धव ठाकरेंचे किती नगरसेवक?; A टू Z माहिती
परभणी महापालिकेसाठी आरक्षण सोडत, दिग्गजांना धक्का; 65 पैकी 33 जागांवर महिलांना संधी
परभणी महापालिकेसाठी आरक्षण सोडत, दिग्गजांना धक्का; 65 पैकी 33 जागांवर महिलांना संधी
मी नशिबवान, अजित दादांचा कार्यकर्ता हे पद माझ्यासाठी सर्वोच्च; अमोल मिटकरी म्हणाले हकालपट्टी नाही
मी नशिबवान, अजित दादांचा कार्यकर्ता हे पद माझ्यासाठी सर्वोच्च; अमोल मिटकरी म्हणाले हकालपट्टी नाही
Nashik Ward Reservation: नाशिक महापालिकेच्या 122 प्रभागांमध्ये आरक्षण जाहीर, SC, ST रिझर्व्हेशन कुठे? पाहा यादी
नाशिक महापालिकेच्या 122 प्रभागांमध्ये आरक्षण जाहीर, SC, ST रिझर्व्हेशन कुठे? पाहा यादी
Dharmendra Net Worth: लोणावळ्यात 100 एकरचं आलिशान फार्महाऊस, लग्झरी कार्स, रेस्टरंट्स अन्...; 300 सिनेमे केलेल्या धर्मेंद्रनी उभारलंय कोट्यवधींचं साम्राज्य, नेटवर्थ किती?
लोणावळ्यात 100 एकरचं आलिशान फार्महाऊस, लग्झरी कार्स, रेस्टरंट्स अन्...; धर्मेंद्र यांंनी उभारलंय कोट्यवधींचं साम्राज्य
Embed widget