Health: राज्यातील 12.50 कोटी जनतेला पाच लाखांचं आरोग्य विमा कवच; राज्य सरकारचा निर्णय
Health Insurance : राज्याच्या महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि केंद्राची आयुष्यमान भारत योजनांचे एकत्रिकरण करुन आरोग्य योजनची पाच लाखांपर्यंत व्याप्ती वाढवण्यात येणार आहे.
मुंबई: राज्यातील आरोग्य विमा योजनेची (Health Insurance) व्याप्ती वाढवण्यात येणार असून नागरिकांना आता पाच लाखांपर्यंत विमा कवच मिळणार आहे. राज्यातील 12.50 कोटी नागरिकांना आता या अंतर्गत विमा सुरक्षा कवच मिळणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे.
राज्यातील महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana) आणि केंद्राची आयुष्यमान भारत (Ayushman Bharat Yojana) या योजनांचे एकत्रिकरण करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून आरोग्य विमा योजनेची दीड लाखांची व्याप्ती वाढवून ती पाच लाख रुपये इतकी करण्यात येणार आहे. याचा फायदा राज्यातील 12.50 कोटी जनतेला मिळणार आहे. राज्यातील रुग्णालयांची संख्या देखील वाढवण्यात येणार आहे, तसेच दोन लाख कोटी लोकांना आरोग्य विम्याचे कार्ड वितरित करण्यात येणार आहेत.
या जन आरोग्य योजनेत सध्या मूत्रपिंड शस्त्रकियेसाठी असलेली अडीच लाख रुपयांची उपचार खर्चाची मर्यादा वाढवून ती साडे चार लाख रुपये एवढी करण्यात आली आहे. महात्मा फुले योजनेत 996 तर प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत 1209 उपचार आहेत. यापैकी मागणी नसलेले 181 उपचार वगळण्यात येतील. तर 328 नवीन उपचारांचा समावेश करण्यात येईल. प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत देखील एकूण उपचार संख्येत 147 वाढ होऊन, ती आता 1356 एवढी होईल. हे जादाचे उपचार महात्मा जोतिराव फुले योजनेत देखील समाविष्ट होतील. त्यामुळे या योजनेत उपचार संख्या 360 ने वाढेल.
या दोन्हीही आरोग्य योजनांमधील रुग्णालयांची संख्या एक हजार इतकी आहे. महात्मा फुले जन आरोग्य योजना (Mahatma Jyotiba Phule Jan Arogya Yojana) याआधीच महाराष्ट्र-कर्नाटक सीमा (Maharashtra Karnataka Border Villages) भागात लागू करण्यात आली असून, महाराष्ट्रातील 140 आणि कर्नाटकातील सीमेलगतच्या चार जिल्ह्यातील 10 अतिरिक्त रुग्णालये अंगीकृत करण्याचा निर्णय झाला आहे. याशिवाय आणखी दोनशे रुग्णालये देखील अंगीकृत करण्यात येतील.
स्व. बाळासाहेब ठाकरे रस्ते अपघात विमा योजनेचा समावेश देखील महात्मा फुले जन आरोग्य योजनेत करण्यात येईल. त्याचप्रमाणे यासाठी असलेली 30 हजार रुपयांच्या उपचारांची खर्चाची मर्यादा वाढवून प्रतिरुग्ण प्रति अपघात एक लाख रुपये अशी करण्यात येईल. या योजनेत महाराष्ट्र सीमा भागातील रस्ते अपघातात झालेले जखमी झालेले महाराष्ट्र राज्याबाहेरील किंवा देशाबाहेरील रुग्णांचा देखील समावेश करण्यात येईल.
ही बातमी वाचा: