एक्स्प्लोर

कसा रोखणार कोरोना! महिनाभरात कोट्यवधींचा गुटखा जप्त, वाहतुकीसाठी अनोख्या क्लुप्त्या

गुटखा बंदी झाली असतानाही राज्यात छुप्या पद्धतीने गुटक्याची विक्री सर्रास सुरू आहे. गेल्या महिनाभरात राज्यात काही कारवायांमध्ये कोट्यवधी रुपयांचा गुटखा जप्त केल्याची माहिती आहे.

मुंबई : गुटखा बंदी झाली असतानाही राज्यात छुप्या पद्धतीने गुटक्याची विक्री सर्रास सुरू आहे. तंबाखू तसेच तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन न करण्यासाठी जनजागृती करण्यासाठी सरकारचे राज्य पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. मात्र, पोलिस आणि संबंधित विभागाच्या दुर्लक्षामुळे राज्यात विक्रीसाठी गुटखा सहज उपलब्ध होत आहे. सरकारकडून गुटख्याची विक्री करणाऱ्यांवर कारवाईचे आदेश असतानाही राज्यात गुटखा विकला जातोय. गेल्या महिनाभरात राज्यात काही कारवायांमध्ये कोट्यवधी रुपयांचा गुटखा जप्त केल्याची माहिती आहे.

लाखो रुपये किमतीच्या गुटख्यासह कंटेनर जप्त

हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील हट्टा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीवरून टाकण्यात आलेल्या धाडीत एक कंटेनर व लाखो रुपये किमतीचा गुटखा जप्त करण्यात आला आहे. सध्या या प्रकरणी पुढील कार्यवाही सुरू असून अंदाजे 50 लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. दरम्यान यामध्ये काही मोठ्या व्यक्तींची नावे समोर येण्याची दाट शक्यता वर्तवली जात आहे. सध्यातरी या प्रकरणी कुठलाही गुन्हा नोंदवण्यात आला नव्हता. कंटेनर चालक व क्लिनरला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

बीडमध्ये तीस लाख रुपयांचा गुटखा जप्त

एका ट्रकमध्ये गुटखा वाहतूक होत असल्याची माहिती अंबाजोगाई शहर पोलिसांना मिळाली. शहरातील भगवान बाबा चौक परिसरामध्ये हा ट्रक थांबवला. यावेळी ट्रकमध्ये मोठ्या प्रमाणात गुटखा आढळून आला. ट्रकमध्ये तीस लाख रुपयांचा गुटखा आढळून आला. चालकाला ताब्यात घेत ट्रकसह 50 लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

हरबरा डाळीच्या पोत्यांखाली गुटखा लपवून वाहतूक 

मुंबई - आग्रा महामार्गावरील हाडाखेड चेक नाक्याजवळ पोलिसांची वाहन तपासणी मोहीम सुरु असताना मध्यप्रदेशातून मुंबईकडे हरबरा डाळ घेऊन जात असलेल्या ट्रकची पोलिसांनी तपासणी केली असता डाळीच्या पोत्यांखाली गुटख्याने भरलेल्या 50 गोण्या आढळून आल्या. यात विमल गुटखा, सुगंधी गुटखा असा साठा आढळून आला. साधारण 32 लाख 70 हजार रुपये किंमतीच्या या मुद्देमालासह ट्रक चालकासह अन्य एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं. मध्यप्रदेशातून गुटखा, बनावट दारूची महाराष्ट्रात होणाऱ्या वाहतुकीविरोधात कारवाई होत असते. मात्र मुळावरच घाव घालून अश्या अवैध धंद्यांची पायमुळं नष्ट करायला हवीत अशी मागणी जोर धरू लागली आहे.

कोरोनाला कसं रोखणार?

सध्या कोरोनाकाळात मास्क काढणे देखील महागात पडू शकते. अशात तोंडात गुटखा जमा झाल्याने गुटखा खाणाऱ्याला बोलताही येत नाही. मग ते मास्क काढतात आणि पिचकारी टाकून तोंड मोकळे करतात. अशाने घाण तर होतेच मात्र इतरांनाही धोका. त्यामुळे कसा रोखणार कोरोना हा सवाल यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

पोलिसांचा सहभाग उघड

परराज्यातून येणाऱ्या गुटखा तस्करीमध्ये पोलिसांचा सहभाग उघड झाला असून पालघर पोलिस व गुटखा माफिया समीकरणावर शिक्कामोर्तब झाला आहे. गुटखा माफियांशी संपर्कात राहिल्याने स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक आणि मनोर पोलिस ठाण्यातील एका हवालदाराला पोलीस महानिरीक्षक यांनी निलंबित केले आहे. गुटख्याची तस्करी करण्यासाठी महिन्याकाठी लाखो रूपयाची रक्कम घेतली जात असल्याबाबत मिरारोड येथील गुटखा माफियांने पोलिसांविरोधातच तक्रार दाखल केली होती. या तक्रारीवरून दोन पोलिसांवर कारवाई करण्यात आल्याने जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.   महाराष्ट्र राज्यात गुटखा बंदी असताना देखील गुटख्याची खुलेआम विक्री केली जात असल्याचे अनेकदा उघड झाले होते. बंदी असताना गुटखा तस्करी फक्त पोलिसांच्या संगणमताने होत असल्याबाबत आरोप केला जात होता. मात्र आता गुटखा माफियांनेच पोलिसांविरोधात तक्रार दाखल केल्याने हा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे.

गुजरातहुन तीन ट्रकमध्ये आलेला 65 लाखांचा गुटखा जप्त

महाराष्ट्रात सुगंधी तंबाखू व गुटखा विक्रीस प्रतिबंध असतानाही शेजारील गुजरात राज्यातून विविध मार्गे कोट्यवधी रुपयांचा गुटखा, पान मसाला महाराष्ट्रात विक्री केला जात असून अन्न सुरक्षा विभागाचे सहाय्यक आयुक्त भूषण मोरे यांच्या नेतृत्वाखाली पथकाने भिवंडी तालुक्यातील खारबाव येथे राजमार्गावर पाळत ठेवून तीन ट्रकमधून भिवंडीच्या दिशेने येणाऱ्या तीन ट्रक मधील 280 गोण्यात असलेला 65 लाख 78 हजार रुपये किमतीचा विमल सुगंधित पान मसाला व गुटखा जप्त केला. तीन ट्रक ताब्यात घेतले.अन्न सुरक्षा पथकाने मोहम्मद आदिल अबुजैद व उदल यादव दोन ट्रक चालकांना ताब्यात घेतले असून अंधाराचा फायदा घेत एक चालक पसार झाला आहे. 36 लाख रुपयांचे तीन ट्रक ताब्यात घेतले आहेत.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Jalgaon Crime : आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?Vijay Wadettiwar Full PC : शिंदेंची गरज संपली,आता नवा 'उदय', वडेट्टीवारांचा खळबळजनक दावाUday Samant on Wadettiwar : BJP मध्ये जाण्यासाठी तुम्ही फडणवीसांना किती वेळा भेटलात? !ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 20 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Saif Ali Khan Attacked Case: सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले, कोर्टरुममध्ये ड्रामा, अखेर न्यायाधीशांनीच तोडगा काढला
सैफच्या हल्लेखोराची केस लढण्यासाठी दोन वकील आपापसांत भिडले; कोर्टरुममध्ये हायव्होल्टेज ड्रामा
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Akshay Shinde Fake Encounter : अक्षय शिंदेचा एन्काऊंटर फेक, समितीच्या अहवालात काय?
Jalgaon Crime : आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
आमच्या पोराला मारला, तुमचीही 1-2 खल्लास करु, तरच राहू, जळगावात सूडाग्नीचा भडका, चुलत्याने बदल्याचा विडा उचलला
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
अक्षय शिंदे साधूसंत नव्हता, पण एन्काऊंटर चुकीचाच, पोलिसांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा, सुषमा अंधारेंची मागणी!
Manikrao Kokate : भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
भाजप-शिवसेनेच्या वादात राष्ट्रवादीची उडी; नाशिकच्या पालकमंत्रिपदाबाबत माणिकराव कोकाटेंचं मोठं वक्तव्य; म्हणाले...
Ladki Bahin Yojana : 2100 रुपयांची वाट पाहणाऱ्या 'त्या' लाडक्या बहिणींकडून 1500 रुपये वसूल होणार? कोणत्या बहिणींना पैसे परत करावे लागणार?
2100 रुपयांची वाट पाहणाऱ्या 'त्या' लाडक्या बहिणींकडून 1500 रुपये वसूल होणार? कोणत्या बहिणींना पैसे परत द्यावे लागणार?
Jalgaon Crime : लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
लग्नाच्या दिवसापासून टार्गेटवर, 5 वर्षांनी सूड उगवण्याची संधी मिळाली, मुकेश रस्त्यात एकटा सापडला अन्... जळगावातील काळजाचा थरकाप उडवणारी घटना
Uday Samant: उदय सामंतांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे कधी फुटले? 'या' कारणामुळे भाजपसाठी ठरतील हुकमी एक्का; सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण
उदय सामंतांच्या महत्त्वाकांक्षेला धुमारे कधी फुटले? 'या' कारणामुळे भाजपसाठी ठरतील हुकमी एक्का; सुषमा अंधारेंनी सांगितलं कारण
Embed widget