एक्स्प्लोर

Maha Gram Panchayat | सिंधुदुर्गातील 70 पैकी 69 ग्रामपंचायतीत सरपंचांची निवड, कोणत्या पक्षाचं वर्चस्व?

Maha Gram Panchayat : सिंधुदुर्गमधील 70 पैकी 69 ग्रामपंचायतीमध्ये सरपंचपदाची निवडणूक पार पडली. यात भाजपचं वर्चस्व पाहायला मिळालं. भाजपकडे 44, शिवसेनेकडे 23 तर ग्रामविकास आघाडीकडे 1 आणि शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीकडे 1 ग्रामपंचायत गेली आहे.

सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 70 ग्रामपंचायतीपैकी 69 ग्रामपंचायतींमध्ये सरपंच, उपसरपंचपदाच्या निवडणुका आज पार पडल्या. जिल्ह्यात 15 जानेवारीला ग्रामपंचायतींसाठी मतदान पार पडलं होतं. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 69 ग्रामपंचायतीच्या सरपंचपदाच्या निवडणुका आज पार पडल्या. सर्व सरपंचपदाच्या निवडणुका एकाच दिवशी होत आहेत. जिल्ह्यात 69 ग्रामपंचायतीपैकी 44 ग्रामपंचायतींमध्ये भाजपचे सरपंच तर 23 ग्रामपंचायतींमध्ये शिवसेनेचे सरपंच विराजमान झाले. दोडामार्गमध्ये आयनोडे हेवाळे ग्रामपंचायत ग्रामविकास ​पॅनलकडे गेली. तर देवगडमध्ये मोंड ग्रामपंचायतीवर शिवसेना, राष्ट्रवादी आघाडीचा सरपंच विराजमान झाला.

सावंतवाडी तालुक्यातील इन्सुली ग्रामपंचायत गेली अनेक वर्षे भाजपकडे होती. मात्र शिवसेनेने भाजपला धक्का दिला असून भाजपचे तात्या वेंगुर्लेकर यांनी शिवसेनेत प्रवेश केला. त्यामुळे इन्सुली ग्रामपंचायतीवर भगवा फडकला आहे. ग्रामपंचायत निवडणुकीत शिवसेना आणि भाजपला प्रत्येकी पाच जागा मिळाल्या होत्या. तर अपक्ष म्हणून स्वागत नाटेकर निवडून आले होते. त्यामुळे इन्सुली ग्रामपंचायतीवर कोणाचे वर्चस्व येणार, याकडे सगळ्यांचे लक्ष लागून राहिले होते. मात्र अखेर आज शिवसेनेने आपलं वर्चस्व राखलं.

दोडामार्ग तालुक्यातील तीन ग्रामपंचायतींपैकी दोन ग्रामपंचायती शिवसेनेकडे तर आयनोडे हेवाळे ग्रामपंचायत ग्रामविकास ​पॅनलकडे गेली आहे.​ तीनही ठिकाणी महिला सरपंच बनल्या आहेत.

सावंतवाडी तालुक्यातील 11 ग्रामपंचायतींपैकी 8 ग्रामपंचायतीवर भाजपने वर्चस्व मिळवले आहे. तर तीन ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा भगवा फडकला आहे.

वेंगुर्ले तालुक्यातील दोन ग्रामपंचायतींपैकी आरवली ग्रामपंचायतीवर भाजपचा झेंडा तर सागरतीर्थ ग्रामपंचायत शिवसेनेकडे गेली आहे.

कुडाळ तालुक्यातील 9 पैकी 5 ग्रामपंचायतींनवर शिवसेनेचे तर 4 ग्रामपंचायतीवर भाजपचे सरपंच विराजमान झाले.

मालवण तालुक्यातील 6 ग्रामपंचायतीपैकी पाच ग्रामपंचायतींवर भाजपचं वर्चस्व पाहिलं, तर शिवसेनेला एक ग्रामपंचायत राखता आली. मालवणमध्ये शिवसेनेला भाजपने मोठा धक्का दिला आहे.

कणकवली तालुक्यातील 3 ग्रामपंचायतींपैकी दोन शिवसेनेचे सरपंच बनले तर एक ग्रामपंचायत भाजपकडे पाहिली.

वैभववाडी तालुक्यातील 13 पैकी 10 ग्रामपंचायतींवर भाजप तर 3 ग्रामपंचायतींवर शिवसेनेचा सरपंच विराजमान झाला असून भाजपने तालुक्यात आपलं वर्चस्व राखलं.

देवगड तालुक्यातील 23 पैकी 22 ग्रामपंचायत सरपंचपदाची निवडणूक शांततेत पार पडली. शिरगाव ग्रामपंचायत सरपंचपद आरक्षणाबाबत उच्च न्यायालयात रीट पिटीशीयन दाखल केल्याने तेथील निवडणूक स्थगित करण्यात आली. त्यामुळे तालुक्यातील 22 पैकी 15 ग्रामपंचायतींवर भाजप, 6 ग्रामपंचायतींवर शिवसेन तर मोंड ग्रामपंचायतीवर शिवसेना-राष्ट्रवादी आघाडीचे सरपंच विराजमान झाला.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

ICC Men ODI Team of the Year 2024 : ICC टीममध्ये टीम इंडियाचा एकही धुरंदर नाही, पण 3 पाकिस्तानी अन् चार श्रीलंकन फलंदाजांना संधी!
ICC टीममध्ये टीम इंडियाचा एकही धुरंदर नाही, पण 3 पाकिस्तानी अन् चार श्रीलंकन फलंदाजांना संधी!
Bishop Mariann Edgar Video : ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण महिला बिशपने तोंडावर सुनावत बोलती बंद केली! बिशपच्या टोकदार शब्दांनी एकच सन्नाटा
Video : ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण महिला बिशपने तोंडावर सुनावत बोलती बंद केली! बिशपच्या टोकदार शब्दांनी एकच सन्नाटा
Auto News : ...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
Dindoshi News : मुंबईत 78 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार, 20 वर्षांचा नराधम युवक अटकेत
मुंबईत 78 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार, 20 वर्षांचा नराधम युवक अटकेत
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines 06PM 24 January 2025Mumbai Women Not Secure News : महिलांच्या सुरेक्षेचा प्रश्न ऐरणीवर, मुंबईत रिक्षा चालकाकडून तरुणीवर अत्याचारMaha Kumbh 2025 : मुस्लिमांचं वक्फ बोर्ड रद्द करण्याची मागणी करणार,महाकुंभमध्ये होणार 27 तारखेला धर्म संसदABP Majha Marathi News Headlines 05 PM TOP Headlines 05 PM 24 January 2025

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ICC Men ODI Team of the Year 2024 : ICC टीममध्ये टीम इंडियाचा एकही धुरंदर नाही, पण 3 पाकिस्तानी अन् चार श्रीलंकन फलंदाजांना संधी!
ICC टीममध्ये टीम इंडियाचा एकही धुरंदर नाही, पण 3 पाकिस्तानी अन् चार श्रीलंकन फलंदाजांना संधी!
Bishop Mariann Edgar Video : ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण महिला बिशपने तोंडावर सुनावत बोलती बंद केली! बिशपच्या टोकदार शब्दांनी एकच सन्नाटा
Video : ट्रम्प यांनी जगाला धडकी भरवली, पण महिला बिशपने तोंडावर सुनावत बोलती बंद केली! बिशपच्या टोकदार शब्दांनी एकच सन्नाटा
Auto News : ...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
...तर गाडीचे मायलेज खूप वाढेल! फॉलो करा 'या' सोप्या टिप्स
Dindoshi News : मुंबईत 78 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार, 20 वर्षांचा नराधम युवक अटकेत
मुंबईत 78 वर्षीय वृद्ध महिलेवर लैंगिक अत्याचार, 20 वर्षांचा नराधम युवक अटकेत
सैनिकी सेवेच्या निवृत्तीनंतर शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग; थेट पंतप्रधान, अमित शाहांकडून कौतुकाची थाप; कोण आहेत शिवाजी डोळे?
सैनिकी सेवेच्या निवृत्तीनंतर शेतीत नावीन्यपूर्ण प्रयोग; थेट पंतप्रधान, अमित शाहांकडून कौतुकाची थाप; कोण आहेत शिवाजी डोळे?
Bhaskar Jadhav : शिवसेनेच्या स्वबळाची चर्चा का करता? तेव्हा भाजपने मित्रांना धोबीपछाड करून दाखवले असते; भास्कर जाधवांचा खोचक टोला
शिवसेनेच्या स्वबळाची चर्चा का करता? तेव्हा भाजपने मित्रांना धोबीपछाड करून दाखवले असते; भास्कर जाधवांचा खोचक टोला
Video : बुलेट सायलेन्सर मॉडिफाईड, पोलिसांनी अडवताच म्हणाला, पप्पा आमदार; त्याच आमदारपुत्राची बुलेट जप्त करून 20 हजारांचे चालान फाडले!
Video : बुलेट सायलेन्सर मॉडिफाईड, पोलिसांनी अडवताच म्हणाला, पप्पा आमदार; त्याच आमदारपुत्राची बुलेट जप्त करून 20 हजारांचे चालान फाडले!
तुम्ही राज्यभर पक्षाचं बळ दाखवा, मगच स्वबळाचा निर्णय घेऊ, उद्धव ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांना सूचना
तुम्ही राज्यभर पक्षाचं बळ दाखवा, मगच स्वबळाचा निर्णय घेऊ, उद्धव ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखांना सूचना
Embed widget