Gram Panchayat Election Results 2022 LIVE Updates: एक हजार 79 ग्रामपंचायतींच्या मतमोजणीला सुरुवात, अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला, सर्वात जलद निकाल एबीपी माझावर
राज्यातील 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 166 ग्रामपंचायती आणि थेट सरपंचपदासाठी 74 टक्के मतदान झालं ग्रामपंचायती आणि थेट सरपंचपदासाठीच्या निवडणुकांचा आज निकाल आहे

Background
मुंबई: राज्यात रविवारी झालेल्या ग्रामपंचायती आणि थेट सरपंचपदासाठीच्या निवडणुकांचा (Maharashtra Gram Panchayat Election Result) आज निकाल आहे. राज्यातील 18 जिल्ह्यांतील 82 तालुक्यांमधील 1 हजार 166 ग्रामपंचायती आणि थेट सरपंचपदासाठी 74 टक्के मतदान झालं होतं. मतमोजणी सकाळी 10 वाजता सुरु होणार आहे.
राज्य निवडणूक आयोगाने 1 हजार 165 ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांची घोषणा केली होती. त्यातील काही ठिकाणी सरपंचपदाच्या; तर काही ठिकाणी सदस्यपदाच्या निवडणुका बिनविरोध झाल्या. त्यामुळे काल 1 हजार 79 ग्रामपंचायतींसाठी सकाळी 7.30 ते सायंकाळी 5.30 या वेळत मतदान झाले. दुपारी 3.30 पर्यंत प्राथमिक माहितीनुसार सरासरी 64.83 टक्के मतदान झाले होते. काही ठिकाणी सायंकाळी उशिरापर्यंत मतदारांच्या रांगा होत्या.
भंडारा जिल्ह्यात दुपारी 3.30 वाजेपर्यंत 61.39 टक्के मतदान झालं होतं. तर नंदुरबारमध्ये 60. 09 टक्के मतदान झालं आहे. तर रायगडमध्ये दुपारी 3 वाजेपर्यंत 65 टक्के मतदान झालं होतं.
मतदान झालेल्या ग्रामपंचायतींची जिल्हानिहाय संख्या: ठाणे- 134, पालघर- 336, रायगड- 16, रत्नागिरी- 36, सिंधुदुर्ग- 4, नाशिक- 187, नंदुरबार- 200, पुणे- 1, सातारा- 4, कोल्हापूर- 3, अमरावती- 1, वाशीम- 1, नागपूर- 15, वर्धा- 9, चंद्रपूर- 92, भंडारा- 19, गोंदिया- 5 आणि गडचिरोली- 16. एकूण- 1079.
जिल्हा व तालुकानिहाय ग्रामपंचायतीची संख्या
नंदुरबार: अक्कलकुवा- 45, अक्राणी- 25, तळोदा- 55 व नवापूर- 81.
पुणे: मुळशी- 1 व मावळ- 1.
सातारा: जावळी- 5, पाटण- 5 व महाबळेश्वर- 6.
कोल्हापूर: भुदरगड- 1, राधानगरी- 1, आजरा- 1 व चंदगड- 1.
अमरावती: चिखलदरा- 1.
वाशीम: वाशीम- 1.
नागपूर: रामटेक- 3, भिवापूर- 6 व कुही- 8.
वर्धा: वर्धा- 2 व आर्वी- 7.
चंद्रपूर: भद्रवाती- 2, चिमूर- 4, मूल- 3, जिवती- 29, कोरपणा- 25, राजुरा- 30 व ब्रह्मपुरी- 1.
भंडारा: तुमसर- 1, भंडारा- 16, पवणी- 2 व साकोली- 1.
गोंदिया: देवरी- 1, गोरेगाव- 1 गोंदिया- 1, सडक अर्जुनी- 1 व अर्जुनी मोर- 2.
गडचिरोली: चामोर्शी- 2, आहेरी- 2, धानोरा- 6, भामरागड- 4, देसाईगंज- 2, आरमोरी-2, एटापल्ली- 2 व गडचिरोली- 1
Wardha Gram Panchayat Election Election Results:वर्धा जिल्ह्यातील आर्वी तालुक्यात काँग्रेसचे सात पैकी चार उमेदवार विजयी
Wardha Gram Panchayat Election Election Results: वर्धा जिल्ह्यातील नऊ ग्रामपंचायत मतदान झाले त्यापैकी सात ग्रामपंचायत या आर्वी तालुक्यातील आहे. आर्वी तालुक्यातील सात ग्रामपंचायतीपैकी चार ग्रामपंचायती कॉंग्रेसच्या वाट्याला आल्या आहेत तर भाजपाच्या वाट्याला दोन ग्रामपंचायती आल्याने तालुक्यात सध्या कॉग्रेसचा जल्लोश पाहायला मिळते आहे.
- ग्रामपंचायत हैबतपुर सरपंच - सचिन पाटील काँग्रेस समर्थक
- ग्रामपंचायत पिपरी पुनर्वसन सरपंच - रजाक अली लियाकत काँग्रेस समर्थक
- मिरझापूर (नेरी) - बालाभाऊ सोनटक्के भाजप समर्थक
- अहिरवाडा ग्रामपंचायत - सरपंच -विना वलके भाजप समर्थक
- ग्रामपंचायत जाम पुनर्वसन - सरपंच - राजकुमार मनोरे भाजप समर्थक
- ग्रामपंचायत सर्कसपूर - गजानन हनवते काँग्रेस समर्थक
- ग्रामपंचायत मांडला - सुरेंद्र धुर्वे काँग्रेस समर्थक
- सालोड हिरापूर - अमोल कन्नाके भाजप समर्थक
- बोरगाव नांदोरा - शामसुंदर खोत भाजप समर्थक
Nandurbar Gram Panchayat Election Election Results: नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामपंचायतीमध्ये माजी मंत्री के सी पाडवी यांचे वर्चस्व, 60 जागांवर कॉंग्रेस विजयी
Nandurbar Gram Panchayat Election Election Results: नंदुरबार जिल्ह्यातील ग्रामपंचायतमध्ये माजी मंत्री के सी पाडवी यांचे वर्चस्व दिसून येत आहे.. नंदुरबार जिल्ह्यात महाविकास आघाडीला पसंती मिळाली आहे. जिल्ह्यात एक नंबरचा पक्ष म्हणून काँग्रेस समोर आला आहे तर दोन नंबरवर भाजप आहे.
जिल्हा - नंदुरबार
एकूण ग्रामपंचायत- 206
आतापर्यंतचे निकाल - 159
- शिवसेना - 12
- शिंदे गट - 13
- भाजप- 52
- राष्ट्रवादी- 04
- काँग्रेस- 60
- माकप - 02
- इतर-15
























