(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sugar Factory : लोकसभेआधी शब्द दिला, आता फिरवला; संग्राम थोपटे, विवेक कोल्हेंच्या कारखान्याचा थकहमी प्रस्ताव रद्द
Margin Money Loan : लोकसभेच्या निवडणुकीआधी काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे आणि नगरमधील भाजपचे नेते विवेक कोल्हे यांच्या कारखान्यांना कोट्यवधींची थकहमी देण्याचं जाहीर करण्यात आलं होतं.
मुंबई : लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू होण्यापूर्वी राज्यातील एकूण 13 सहकारी साखर कारखान्याचे (Maharashtra Sugar Factory) थकहमी अर्थात मार्जिन लोनचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या उपसमितीच्या मंजुरीने राष्ट्रीय सहकारी विकास निगम अर्थात एनसीडीसी मंजुरीसाठी पाठवले होते. मात्र यातील 2 सहकारी साखर कारखान्यांच्या प्रस्तावात कागदोपत्री त्रुटी काढून सदरील साखर कारखान्याचे प्रस्ताव रद्द केले आहेत अशी विश्वसनीय सूत्रांची माहिती समोर येत आहे.
थोपटेंचा अजितदादांना बारामतीमध्ये फायदा नाही
लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे (Sangram Thopate) यांनी बारामती लोकसभेमध्ये अजित पवार यांना शब्द देऊनसुद्धा अपेक्षित मदत केली नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे त्यांच्या राजगड सहकारी साखर कारखान्याचा 80 कोटी रुपयांचा मार्जिन लोन थकहमीचा प्रस्ताव रद्द केला असल्याची माहिती समोर येत आहे.
विवेक कोल्हेंची विखेंना मदत नाही
याचबरोबर अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव मतदारसंघाचे भाजपाचे तरुण नेते विवेक कोल्हे (Vivek Kolhe) यांच्या सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्याचा 125 कोटी रुपयांचा मार्जिन लोन थकहमी प्रस्ताव रद्द केल्याची माहिती समोर येत आहे.
अहमदनगर जिल्ह्यात विखे पाटील विरुद्ध कोल्हे कुटुंबाचा राजकीयवाद सर्वश्रुत आहे. विवेक कोल्हे यांची माजी खासदार सुजय विखे यांना निवडणुकीत मदत झाली नसल्याची चर्चा आहे. याचबरोबर नुकत्याच झालेल्या विधानपरिषद निवडणुकीतसुद्धा विवेक कोल्हे यांनी महायुतीच्या उमेदवाराच्या विरोधात नाशिक शिक्षक मतदारसंघातून अपक्ष निवडणूक लढवली होती. पक्षाच्या विरोधात घेतलेल्या धोरणामुळे त्यांचा प्रस्तावसुद्धा रद्द करण्यात आलेला आल्याची माहिती आहे.
सत्ताधाऱ्यांच्या चार कारखान्यांना मदतीची शक्यता
विरोधी पक्षात असलेले संग्राम थोपटे आणि विवेक कोल्हे यांच्या कारखान्यांचे नाव वगळून त्यामध्ये सत्ताधाऱ्यांशी संबंधित इतर चार कारखान्यांना मदत मिळण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यासाठी सहकार खात्याकडून हालचाली सुरू झाल्याचीही माहिती आहे.
संग्राम थोपटे आणि विवेक कोल्हे यांचे कारखाने वगळून इतर कोणत्या कारखान्यांना मदत करण्यात येणार आहे त्याची यादी खालीलप्रमाणे,
अजित पवार गटाशी संबंधित कारखाने
- लोकनेते सुंदररावजी सोळंके साखर कारखाना (बीड)- 104 कोटी
- किसनवीर (सातारा)- 305 कोटी
- किसनवीर (खंडाळा)- 150 कोटी
- लोकनेते मारोतराव घुले पाटील ज्ञानेश्वर कारखाना(नेवासा) - 150 कोटी
- अगस्ती (अहमदनगर) - 100 कोटी
- अंबाजोगाई (बीड)- 80 कोटी
- शिवाजीराव नागवडे (श्रीगोंदा)- 110 कोटी
भाजपशी संबंधित कारखाने
- संत दामाजी(मंगळवेढा) - 100 कोटी,
- वृद्धेश्वर (पाथर्डी)- 99 कोटी
- तात्यासाहेब कोरे वारणानगर (कोल्हापूर) -350 कोटी
- बसवराज पाटील यांचा विठ्ठलसाई (धाराशिव) -100 कोटी
ही बातमी वाचा: