राज्यात AI वापरला गती मिळणार, AI धोरण तयार करण्यासाठी टास्क फोर्सची नियुक्ती
राज्याचे एआय धोरण (AI Policy) तयार करण्यासाठी टास्क फोर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. नवे धोरण तयार करण्यासाठी टास्क फोर्स शिफारशी करणार आहे. पुढील 3 महिन्यात शिफारस करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
AI policy Task force : राज्याचे एआय धोरण (AI Policy) तयार करण्यासाठी टास्क फोर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. नवे धोरण तयार करण्यासाठी टास्क फोर्स शिफारशी करणार आहे. पुढील 3 महिन्यात शिफारस करण्याचे टास्क फोर्सला आदेश देण्यात आले आहेत. एआय वापरास गती देण्यासाठी नवे धोरणाची निर्मिती होणार आहे. महिती तंत्रज्ञान संचालनालय विभागाचे संचालक यांच्या अध्यक्षतेखाली टास्क फोर्स नेमणूक करण्यात आली आहे.
टास्क फोर्समध्ये एकूण 16 सदस्यांची नियुक्ती
मिळालेल्या माहितीनुसार, टास्क फोर्समध्ये एकूण 16 सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गुगल, महिंद्रा ग्रुप, एचडीएफसी लाईफ अशा खासगी संस्थांवरील अधिकाऱ्यांचाही या समितीत समावेश असणार आहे. सध्याच्या माहिती व तंत्रज्ञानाच्या युगात आता सॉफ्टवेअर आणि एआयचा काळ सुरु झाल्याचं पाहायला मिळत आहे. आयटी क्षेत्र ज्या झपाट्याने वाढलं, त्याच झपाट्याने आता या क्षेत्रात क्रांती होताना दिसून येते. त्यामध्ये डिजिटलायजेशनंतर आता आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राने दिशादर्शक व्हावे यासाठी राज्याचे पहिले, एआय (AI) (कृत्रिम बुद्धिमत्ता) धोरण तयार करा, असे निर्देश माहिती व तंत्रज्ञान मंत्री ॲड आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी विभागाला दिले होते. एआय तंत्रज्ञानाचा वापर करून अधिक उद्योग, व्यवसाय उभे राहतील. तरुणांना रोजगार मिळतील व तंत्रज्ञानाच्या जागतिक स्पर्धेत महाराष्ट्र सक्षमपणे स्पर्धा करु शकेल असे शेलार म्हणाले होते.
बारामतीमध्ये एआयवर विकसित शेतीचा प्रयोग
जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राचे स्थान भक्कम करण्याची ही संधी आहे. मार्च 2024 मध्ये सुरू करण्यात आलेल्या 'इंडिया एआय मिशन' अंतर्गत देशभरात एआय क्षमता वाढवण्यासाठी ₹10,372 कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यात इंडिया एआय डेटासेट्स प्लॅटफॉर्म, ऍप्लिकेशन डेव्हलपमेंट प्रकल्प, ग्राफिक प्रोसेसिंग युनिट्स, इंडिया एआय इनोव्हेशन सेंटर, फ्युचर स्किल्स प्रोग्राम आणि एआय क्षेत्रातील स्टार्टअप्ससाठी वित्तपुरवठा यांचा समावेश आहे. महाराष्ट्रातील बारामतीमध्ये एआयवर विकसित शेतीचा प्रयोग करण्यात आल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे, एआय हे तंत्रज्ञान वापरुन विविध क्षेत्रात बदल व क्रांती घडविली जाऊ शकते. एआयचा प्रभावी उपयोग करून आपण अधिक उद्योग व व्यवसाय आकर्षित करीत तरुणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देऊ शकतो. जागतिक स्पर्धेत महाराष्ट्राचे स्थान भक्कम करण्याची ही संधी असल्याचं बोलंल जात आहे. .
महत्वाच्या बातम्या: