Virat Kohli : नाद करा, पण गंभीर गुरुजींचा कुठं! जे गेल्या तेरा वर्षात कोणाला जमलं नाही ते विराटला फक्त सहा महिन्यात करायला भाग पाडलं
Virat Kohli : दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनने रणजी ट्रॉफीसाठी संभाव्य खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचे नाव समाविष्ट केले आहे.
Virat Kohli : ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळल्या गेलेल्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 मध्ये टीम इंडियाचा किंग विराट कोहली काही विशेष करू शकला नाही. त्याने आपल्या बॅटने एक शतक झळकावले, पण तरीही त्याने 9 डावात केवळ 190 धावा केल्या. खराब फॉर्मशी झगडणारा विराट कोहली रणजी ट्रॉफीकडे तब्बल 13 वर्षांनी दिसणार आहे. कोहली रणजी ट्रॉफी 2024-25 च्या दुसऱ्या टप्प्यात दिल्लीकडून खेळताना दिसू शकतो.
🚨 VIRAT KOHLI GEARING UP. 🚨
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 17, 2025
- Kohli had a neck sprain, and took an injection. However it is possible he'll train with the Delhi Ranji squad in Rajkot on 21st-22nd Jan. (Sahil Malhotra/TOI). pic.twitter.com/z31ANejUmG
याआधी कोहलीने रणजीमध्ये कधी भाग घेतला होता?
दिल्ली आणि जिल्हा क्रिकेट असोसिएशनने रणजी ट्रॉफीसाठी संभाव्य खेळाडूंच्या यादीत विराट कोहलीचे नाव समाविष्ट केले आहे. मीडिया रिपोर्ट्सचा हवाला देत डीडीसीएचे सचिव अशोक शर्मा म्हणाले की, "विराट कोहलीने मुंबईच्या खेळाडूंकडून प्रेरणा घेतली पाहिजे. जेव्हा तो उपलब्ध असेल तेव्हा त्याने देशांतर्गत क्रिकेटही खेळले पाहिजे. मुंबईत नेहमीच अशी संस्कृती राहिली आहे की जेव्हा जेव्हा त्यांचे मोठे खेळाडू उपलब्ध असतात, तेव्हा ते रणजी सामन्यासाठी येतात.
विराट कोहलीने शेवटचा रणजी सामना कधी खेळला होता?
विराट कोहलीने 13 वर्षांपूर्वी रणजी ट्रॉफी सामना खेळला होता. आता तो बऱ्याच वर्षानी परत येऊ शकतो. 2012 मध्ये दिल्लीकडून खेळताना कोहलीने यूपीविरुद्ध रणजी सामना खेळला होता. गाझियाबादमध्ये खेळल्या गेलेल्या या सामन्यात कोहलीने दोन्ही डावात 14 आणि 43 धावा केल्या.
🚨 VIRAT KOHLI FOR DELHI. 🚨
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) January 17, 2025
- Kohli likely to join the Delhi Ranji team in Rajkot and train with them, even if he were not play the match. (Cricbuzz). pic.twitter.com/Nt4fzm1sJ2
विराट कोहलीचा फॉर्म
ऑस्ट्रेलिया दौऱ्यापूर्वी विराट कोहलीने मायदेशात न्यूझीलंडविरुद्ध तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळली होती. न्यूझीलंड मालिकेतही कोहलीची बॅट शांत राहिली. पहिल्या सामन्यातील एका डावात त्याने 70 धावांची खेळी केली होती. यानंतर, मालिकेतील पुढील पाच डावांमध्ये कोहलीने एकदा दुहेरी आकडा पार केला आणि 17 धावा केल्या.
इतर महत्वाच्या बातम्या