Ganesh Visarjan Miravnuk LIVE Updates : सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदेच्या यांच्या बाप्पाचे भक्तीपूर्ण वातावरणात विसर्जन
Ganesh Visarjan 2024 : राज्यभरात गणेशोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. आज संपूर्ण राज्यात गणरायाचं विसर्जन केलं जाणार आहे.
LIVE
Background
मुंबई : यंदाचा गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्यात साजरा करण्यात आला. मुंबई, पणे या प्रमुख शहरासह राज्यातील घरोघरी गणरायचं मोठ्या भक्तिभावाने स्वागत करण्यात आलं होतं. आज (17 सप्टेंबर) गणेशोत्सवाचा शेवटचा दिवस आहे. राज्यभरात गणरायाचं विसर्जन केलं जाणार आहे. राज्यातील याच गणेश विसर्जनाची प्रत्येक अपडेट वाचा एका क्लिकवर...
सुशीलकुमार शिंदे, प्रणिती शिंदेच्या यांच्या बाप्पाचे भक्तीपूर्ण वातावरणात विसर्जन
सोलापूर : माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे आणि खासदार प्रणिती शिंदेच्या यांच्या बाप्पाचे भक्तीपूर्ण वातावरणात विसर्जन
बाप्पाला निरोप देताना सुशीलकुमार शिंदेचे नातू शिखर पहारिया देखील उपस्थित
यंदाच्या वर्षी शिंदे परिवाराने सोलापुरात गणेशोत्सव साजरा केला
दहा दिवस सुशीलकुमार शिंदेच्या गणेशोत्सवसाठी राजकीय नेत्यांसह विविध क्षेत्रातील हजेरी लावली होती
आज प्रणिती शिंदे आणि शिखर पहारिया यांच्या उपस्थितीत बाप्पाला निरोप देण्यात आला
यावेळी शिंदे कुटुंबीयसह काँग्रेसचे कार्यकर्ते पदाधिकारी देखील उपस्थित होते
Nashik Ganesh Visarjan : नाशिकच्या रामकुंड परिसरात लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी गणेश भक्तांची गर्दी
दहा दिवसानंतर आज लाडक्या बाप्पाला निरोप दिला जात आहे नाशिकच्या रामकुंडा परिसरामध्ये घरगुती गणपतीचे विसर्जन करण्यासाठी गणेश भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे. नाशिक महानगरपालिकेच्या माध्यमातून मूर्ति संकलन केंद्र उभारण्यात आले आहेत त्यासोबत शहरातील विविध सामाजिक संस्थांनी देखील मूर्ती दान करण्याचे आवाहन केले आहे या आवाहनाला नाशिककर देखील मोठ्या प्रमाणात प्रतिसाद देत आहे. रामकुंड परिसरामध्ये नाशिक महानगरपालिका, पोलीस प्रशासन, अग्निशमन विभागाचे जवान तैनात करण्यात आले आहेत.
कोल्हापुरातील दत्ताजीराव काशीद तरुण मंडळाकडून मिरवणुकीत महिलांना मान
कोल्हापुरात बाप्पाचा विसर्जन मिरवणुकीमध्ये करवीर निवासिनी अंबाबाई अवतरली आहे... अंबाबाईचा सजीव देखावा कोल्हापुरातील दत्ताजीराव काशीद तरुण मंडळाने साकारला आहे... या मंडळाने बाप्पाच्या विसर्जन मिरवणुकीचा सर्व मान महिलांना दिला आहे... विसर्जन मिरवणुकीमध्ये महिला लेझीम खेळत आहेत.
वसईच्या माणिकपूर पोलिसांनी घेतला आपल्या बाप्पाचा निरोप
वसई : आज आपल्या लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी सर्व गणेशभक्त सज्ज झाले आहेत. वसईत माणिकपूर पोलीस ठाण्याच्या ११ दिवसाच्या बाप्पाला निरोप देताना माणिकपूर पोलीसांनी भव्य मिरवणूक काढली होती. महिला आणि पुरुष पोलीस कर्मचारीनी फेटा आणि एकच रंगाचे कपडे परिधान करुन, आपल्या बाप्पाला वाजत नाचत निरोप दिला. बाप्पाला निरोप दिल्यानंतर लगेच सर्व पोलीस कर्मचारी आपला गणवेश परिधान करुन, उशिरा रात्री पर्यंत विसर्जन स्थळी तैनात असतील.
नाशिक विसर्जन मिरवणुकीला सुरवात, साधारण 3000 पोलीस रस्त्यावर तैनात
नाशिक विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली
साधारण 3000 पोलीस रस्त्यावर तैनात