एक्स्प्लोर

राज्यभरात ढोल-ताशांच्या गजरात उत्साहात बाप्पाला निरोप

डॉल्बीवर बंदी असल्यामुळे काही ठिकाणी नाराजी होती, तर काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीने लेझिम, ढोल-ताशा पथकांच्या माध्यमातून विसर्जन मिरवणूक काढली गेली.

मुंबई : लाडक्या बाप्पाची दहा दिवस मनोभावे सेवा केल्यानंतर बाप्पाचं विसर्जन करण्यात आलं. मुंबईसह राज्यभरात ढोल ताशांच्या गजरात विसर्जन मिरवणुका काढण्यात आल्या. डॉल्बीवर बंदी असल्यामुळे काही ठिकाणी नाराजी होती, तर काही ठिकाणी पारंपरिक पद्धतीने लेझिम, ढोल-ताशा पथकांच्या माध्यमातून विसर्जन मिरवणूक काढली गेली.

लाईव्ह अपडेट्स

  • कल्याण
कल्याण शहरात 11 ठिकाणी गणेश विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. यापैकी सर्वाधिक गर्दी ही कल्याणच्या दुर्गाडी किल्ल्याजवळ असलेल्या गणेशघाटावर असते. या घाटावर कल्याणसोबतच डोंबिवली, उल्हासनगर, कोनगाव या परिसरातून भाविक गणेश विसर्जनासाठी येतात. विसर्जनासाठी केडीएमसी आणि पोलिसांच्या वतीनं दरवर्षी चोख व्यवस्था ठेवली जाते.
  • कल्याण
अंबरनाथ शहरात बाप्पाच्या विसर्जन सोहळ्याला सुरुवात झाली आहे. शहरात पालिकेच्या वतीनं चिंचपाडा आणि कैलासनगर अशा दोन खदानींमध्ये सार्वजनिक  विसर्जनाची व्यवस्था करण्यात आली आहे. तर कानसई, रॉयल पार्क आणि मोरीवली गाव अशा तीन ठिकाणी घरगुती गणपतींसाठी कृत्रिम तलाव उभारण्यात आले आहेत. प्रत्येक भक्त आपल्या लाडक्या बाप्पाला जड अंतःकरणाने निरोप देत आहे.
  • जळगाव

जळगाव महापालिकेचा गणपती शहरातील मानाचा गणपती म्हणून मानला जातो. या गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीत महाराणा प्रताप मंडळातर्फे विविध प्रात्यक्षिके सादर करण्यात येत आहेत. तलवारबाजी, काठी, दांडपट्टा, कट्यार, दांड्याने लिंबू कापणे, डोळ्यावर पट्टी बांधून डोक्यावरील नारळ फोडणे अशा प्रकारचे विविध थरारक प्रात्यक्षिके या ठिकाणी सादर होत आहेत. या गणपतीच्या आरतीसाठी महापौर सीमा भोळे, आमदार सुरेश भोळे, जिल्हाधिकारी किशोर राजे निंबाळकर, गणेश उत्सव समितीचे सचिन नारळे इत्यादी मान्यवर या ठिकाणी उपस्थित होते.

  • पंढरपूर

पंढरपूरमध्ये विठ्ठल मंदिरातल्या गणेशाचंही आज विसर्जन होणार आहे. आज सकाळीच विठ्ठल मंदिरातल्या गणेशाची मिरवणूक निघाली. संत नामदेव महाद्वारापासून फुलांनी सजवलेल्या वाहनातून गणेश मूर्तीची मिरवणूक काढण्यात आली. यावेळी विविध चित्तथरारक कसरती सादर करण्यात आल्या. पारंपरिक वाद्यांच्या तालावर अवघी पंढरपूर नगरी यावेळी दुमदुमून गेली होती.

  • वर्धा

वर्ध्यात पर्यावरणपूरक गणेश विसर्जनावर यंदा भर देण्यात आला आहे. वैद्यकीय जनजागृती मंचातर्फे हा उपक्रम राबवण्यात येतोय. या उपक्रमाचं हे चौथं वर्षं आहे. कृत्रिम तलावात गणेशाचं इथं विसर्जन केलं जातं आहे. ढोल-ताशांच्या गजरात गणरायाला इथं आणलं जातंय..आणि आरती करुन गणरायाला निरोप दिला जातोय..

  • सिंधुदुर्ग (दु. 3.20)

सिंधुदुर्गात गणेशभक्तांनी आपल्या लाडक्या बाप्पाला जल्लोषात निरोप दिला. दुपारनंतर घरगुती गणपतीच्या विसर्जन मिरवणुका निघाल्या. पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात नाचत भक्तांनी विसर्जन मिरवणुकीत सहभाग घेतला होता. अकरा दिवसांची मनोभावे सेवा केल्यानंतर जड अंतःकरणाने बाप्पाला निरोप देण्यात आला. नदी, तलाव तसेच समुद्र किनाऱ्यावर गणेश विसर्जनासाठी भक्तांची रीघ लागली होती. विशेष म्हणजे गुलालाचा आणि फटाक्यांचा वापर टाळत बाप्पांच्या विसर्जनाकडे भाविकांचा कल दिसून आला. सिंधुदुर्गात आज 21 हजार 690 घरगुती तर 11 सार्वजनिक गणपतींचे विसर्जन होत आहे.

  • यवतमाळ (दु. 1.45)

यवतमाळ शहरात नगरपालिकेच्या वतीने घरगुती तसेच सार्वजनिक मंडळांना तलाव फैल, संकटमोचन तलाव, संकटमोचन येथील कुंड आणि लकडगंज येथील विहीर उपलब्ध करून देण्यात आली आहे. शिवाय घरगुती गणपतीच्या विसर्जनासाठी 25 ठिकाणी कृत्रिम टाकी तयार करण्यात  आली आहे.

यावर्षी नगरपालिकेने सार्वजनिक मंडळ आणि मोठ्या गणपती मूर्तीसाठी चार ठिकाणं निश्चित करून दिले आहेत, ज्यामध्ये शहरातील संकटमोचन तलाव परिसरात घरगुती तसेच सार्वजनिक मंडळाच्या गणेशमूर्तीचे विसर्जन करण्यासाठी पालिकेच्या वतीने व्यवस्था करण्यात आली आहे. या ठिकाणी पालिकेकडून लाकडी तराफावर बसून मूर्तीला तलावाच्या मधोमध नेऊन तिथे गणपती विसर्जन केलं जात आहे.

  • बारामती (दु. 1.23)

बारामतीत गणेश विसर्जन मिरवणूक सुरु झाली असून पारंपरिक वाद्याच्या गजरात गणरायाला निरोप दिला जात आहे. बारामती शहरातून वाहणाऱ्या नीरा डाव्या कालव्यावर बारामती नगर परिषद आणि एन्व्हायरमेंटल फोरम यांच्या वतीने जल कुंड तयार करण्यात आले आहे. यामध्ये मूर्ती विसर्जन केलं जात आहे आणि परत त्याच मूर्ती दान केल्या जात आहेत. दुपारनंतर मोठ्या आणि मानाच्या गणपती मंडळांच्या विसर्जन मिरवणुका सुरु होणार आहेत.

  • औरंगाबाद (दु. 1.00)

औरंगाबादेत प्रथेप्रमाणे आजही शहराचं आराध्य दैवत श्री संस्थान गणपतीची विधीवत पूजा झाली आणि विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. संस्थान गणेशाच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात होत नाही तोपर्यंत कोणतेही गणेश मंडळ विसर्जन मिरवणुकीला सुरुवात करत नाही, अशी औरंगाबादमध्ये परंपरा आहे. आजही विधीवत पूजा करून विसर्जन मिरवणुकीला सुरवात झाली. या वेळी औरंगाबादचे खासदार चंद्रकांत खैरे यांना नाचण्याचा मोह आवरला नाही. त्याच्यासोबत काँग्रेसचे आमदार सुभाष झांबड आणि शहराचे महापौर नंदकुमार घोडेले यांनीही ठेका धरला.

  • मनमाड (दु. 12.15)

मनमाड शहराचं आराध्य दैवत असलेल्या श्री निलमणी गणेशाच्या विसर्जन मिरवणुकीला मोठ्या उत्सहात सुरुवात झाली आहे. नगराध्यक्षांच्या हस्ते आरती केल्यानंतर, पारंपारिक पालखीतून गणेशाची मिरवणूक सुरुवात झाली. ‘आम्ही परंपरा पाळतो, आम्ही संस्कृती जपतो’ असं ब्रीद वाक्य असलेल्या या मिरवणुकीत उंटावर स्वार झालेल्या युवती, ‘बेटी बचाव बेटी पढाव’चा संदेश देणाऱ्या अंगणवाडीच्या महिला कर्मचारी या मिरवणुकीचं यंदा आकर्षण होते. त्याचबरोबर मैदानी खेळांचं प्रात्यक्षिक मिरवणुकीत नाशिक येथिल पथकांनी सादर केलं. तर बँड आणि ढोल पथक मिरवणुकीत सहभागी झाले होते. दुपारी उशिरापर्यंत ही मिरवणूक सुरु राहणार आहे. तर अनेक सार्वजनिक मंडळांच्या मिरवणुका दुपारनंतर सुरु होणार आहेत.

  • नंदुरबार (दु. 12.10)

नंदुरबारमध्ये मोठ्या उत्साहात सकाळी दहा वाजल्यापासूनच मिरवणुकांना सुरुवात झाली आहे. पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात या विसर्जन मिरवणुका सुरु आहेत. नंदुरबारच्या माळीवाड्याचा राजाची मिरवणूक आकर्षक ठरते.

  • अहमदनगर (दु. 12.07)

अहमदनगरमधील ग्रामस्थांचं ग्रामदैवत असलेल्या विशाल गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. विशाल गणपतीची मिरवणूक ही पहिली मनाची मिरवणूक मानली जाते. ही मिरवणूक निघाल्यानंतर अहमदनगरमधील इतर गणपती विसर्जन मिरवणुकांना सुरुवात होते. आज विशाल गणपतीच्या मंदिरात जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी यांच्या हस्ते महापूजा आणि आरती करण्यात आली. त्यानंतर विशाल गणपतीचा रथ ओढून गणपतीच्या विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. पारंपरिक वाद्यांसह ढोल आणि ताशांच्या गजरात या मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. यावेळी जिल्हाधिकारी यांनी देखील ताशा वाजवून गणपती बाप्पाला निरोप दिला. मोठ्या प्रमाणावर गणेशभक्त या मिरवणुकीत सहभागी झाले आहेत.

  • नागपूर (दु. 12.05)

नागपुरातही लाडक्या बाप्पांना पारंपरिक पद्धतीने वाजत गाजत निरोप दिला जात आहे. नागपूरच्या राजाची विसर्जन मिरवणूक आज सकाळी 10 वाजता तुळशीबाग परिसरातून सुरु झाली. दिवसभर शहरातील वेगवेगळ्या भागातून मार्गक्रमण करत ही मिरवणूक संध्याकाळी 5 वाजता नागपूरपासून 20 किमी अंतरावर कोराडीच्या तलावावर पोहोचेल आणि त्या ठिकाणी विसर्जन होईल. तुळशीबागेत गेले 23 वर्ष नागपूरच्या राजाची स्थापना केली जात असून 10 दिवसात मोठ्या संख्येने नागपूरकर या मूर्तीचं दर्शन घेतात.

  • नाशिक (दु. 12.05)

नाशिक शहरात घरगुती गणेशला निरोप देण्यासाठी विसर्जनासाठी नागरिक घराबाहेर पडू लागले आहेत. गणेश मूर्ती दान करण्याकडे नागरिकांचा कल दिसून येतोय. मागील वर्षी पावणे तीन लाख मूर्ती दान केल्यानंतर याही वर्षी तीच परंपरा कायम राहील असा स्वयंसेवी संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना विश्वास आहे.

  • अकोला (11.40)

अकोल्यात सकाळपासूनच गणेश विसर्जनाला उत्साहात सुरुवात झालीय. अकोल्याचे माजी उपमहापौर विनोद मापारी यांनी पर्यावरणपूरक गणेश विसर्जनासाठी एक अभिनव उपक्रम राबवला आहे. मापारी यांनी आपल्या प्रभागातच लोकसहभागातून गणेशविसर्जन घाटाची निर्मिती केली आहे. कौलखेड भागातील गणपतीचं विसर्जन करण्यासाठी गणेशभक्तांनी या घाटावर मोठी गर्दी केली. तुतारी, पारंपरिक मराठमोळ्या वेषभूषेतील सुवासिनी आणि पुष्पवर्षावात बाप्पाचे या गणेश घाटावर विसर्जन करण्यात येत आहे. या गणेश घाटावर पर्यावरणरक्षणाच्या जनजागृतीसाठी घोषवाक्य आणि म्हणी लिहिण्यात आल्या आहेत. येथील जमा झालेल्या निर्माल्यापासून खतनिर्मिती करून महापालिकेच्या बगिच्यातील झाडांसाठी त्याचा उपयोग करण्यात येणार आहे.

  • वाशिम (स. 11.00)

महाराष्ट्रात ऐकेकाळी सर्वाधिक वेळ चालणारी मिरवणूक म्हणून प्रसिध्द असलेल्या वाशिम शहरातील गणेश विसर्जन मिरवणुकीला थाटात सुरुवात झाली. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचा अभिषेक आणि मानाचा गणपती असलेल्या शिवशंकर गणेश उत्सव मंडळाच्या गणपतीचं पूजन खासदार भावना गवळी आणि पोलीस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या हस्ते करून ढोल-ताशाच्या आवाजाने जनभावनेचा जल्लोष झाला.

या तालावर युवकांची पावले थिरकायला लागली. यावेळी खासदार भावना गवळी आणि मोक्षदा पाटील यांनी सुद्धा ढोल वाजविला. ड्रोनच्या मदतीने सर्व मिरवणुकीवर नजर ठेवण्यात येणार आहे. या मिरवणुकीत आकर्षक राहिला तो शिवशंकर गणेश मंडळांनी महिलांचा ढोल पथक तयार केला आणि वाशिमकरांनी हे पथक पाहण्यासाठी एकच गर्दी केली.

  • कोल्हापूर (स. 10.30)

गणेश विसर्जन मिरवणुकीत कोल्हापूरच्या महापौर शोभा बोंद्रे यांना धक्काबुक्की झाली. महत्त्वाचं म्हणजे ही धक्काबुक्की कोणी कार्यकर्त्यांनी नव्हे तर महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांचे बॉडीगार्ड आणि पोलिसांकडून झाल्याचा आरोप महापौर शोभा बोंद्रे यांनी केला. कोल्हापुरातील मानाच्या तुकाराम माळी गणपतीचं पूजन महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते झालं. त्यानंतर गणेश विसर्जन मिरवणुकीला सुरुवात झाली. यादरम्यान महापौर शोभा बोंद्रे यांना धक्काबुक्की झाली.

कोल्हापूरच्या इतिहासात पहिल्यांदा घडलेल्या घटनेचा निषेध करते. इथून पुढं सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी व्हायचं की नाही ते ठरवावं लागेल, अशी प्रतिक्रिया महापौर बोंद्रे यांनी दिली.

  • नाशिक (स. 10.20)

नाशिक शहरातील गणेशोत्सव मिरवणुकीसाठी यंत्रणा सज्ज झाली आहे. यंदाच्या मिरवणुकीत 21 चित्ररथ सहभागी झालेत, 11 ते 12 च्या सुमारास मिरवणुकीला सुरवात होणार आहे. सुरवातीला शहरातील मानाचे पाच गणपती आणि त्यानंतर इतर प्रमुख गणेश मंडळाचे चित्ररथ सहभागी होणार आहेत.

  • अहमदनगर (स. 8.45)

विसर्जन मिरवणुकीत डीजे वाजवण्यास परवानगी न मिळाल्याने अहमदनगरमधील 13 मानाच्या गणपतींपैकी 12 मानाच्या गणपती मंडळांनी गणपती विसर्जन मिरवणुकीवरच बहिष्कार टाकलाय. मिरवणुकीत न्यायालयाच्या आदेशानुसार 75 डेसीबलपेक्षा जास्त आवाज न करण्याचा शब्द या मंडळांनी पोलिसांना दिला. मात्र पोलिसांनी डीजे मिरवणुकीत आणला तर कारवाई करु, असा इशारा गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांना दिला. त्यामुळे ऐनवेळी डीजे न वाजवता पारंपरिक वाद्य कुठून आणणार असा प्रश्न गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांसमोर उभा राहिलाय.

नाराज झालेल्या गणेश मंडळांच्या पदाधिकाऱ्यांनी बैठक घेऊन हा निर्णय घेतला. पोलीस प्रशासनाचा निषेध करत थेट गणपती विसर्जन मिरवणुकीवरच बहिष्कार टाकण्यात आला. आज केवळ मानाचा पहिला गणपती म्हणजे विशाल गणपतीची मिरवणूक निघेल. मात्र त्यानंतर मिरवणुकीत सहभागी होणाऱ्या 12 गणेश मंडळांनी मात्र मिरवणूक न काढण्याचा निर्णय घेतलाय.

  • हिंगोली : (स. 8.30)

हिंगोली येथील मोदकाच्या नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध असलेल्या विघ्नहर्ता चिंतामणी गणपतीच्या दर्शनाला अनंत चतुर्दशीच्या दिवशी राज्यातूनच नाही, तर परराज्यातूनही भाविक मोठ्या संख्येने आले आहेत. सकाळी आरती झाल्यावर मंदिरात मोदक वाटण्यात येतात.

राज्यभरात ढोल-ताशांच्या गजरात उत्साहात बाप्पाला निरोप

मंदिर प्रशासनाकडून नवसाचे तीन लाखांपेक्षा जास्त मोदक वाटण्यात येत आहेत. भाविक वर्षभर या मोदकाची पुजा करतात आणि आपला नवस पूर्ण झाल्यावर परत पुढील वर्षी 1008 मोदक या गणपती बाप्पाला अर्पण करून आपला नवस फेडतात.

मध्यरात्रीपासूनच भाविकांनी अलोट गर्दी केली आहे. लाखोंच्या संख्यने भाविक हिंगोली शहरात दाखल झाले आहेत. बाप्पाच्या दर्शनासाठी पाच-पाच किमीची रांग लागली आहे. पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, हैदराबाद, औरंगाबाद या ठिकाणांहून भाविक आले आहेत.

राज्यभरात ढोल-ताशांच्या गजरात उत्साहात बाप्पाला निरोप

या भाविकांना कोणताही त्रास होऊ नये यासाठी हिंगोलीकर सरसावले आहेत. जागोजागी भाविकांना चहा, पाणी, फराळ आणि जेवणाची मोफत व्यव्यस्था करण्यात आली आहे. यासाठी पोलीस प्रशासनाने चोख बंदोबस्त ठेवला आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

Meenakshi Shinde : मिनाक्षी शिंदेंच्या विरोधात आगरी समाज आक्रमक, ज्याला कॉल केला आणि ज्याला शिव्या दिल्या ते दोघेही पोलीस ठाण्यात
मिनाक्षी शिंदेंच्या विरोधात आगरी समाज आक्रमक, ज्याला कॉल केला आणि ज्याला शिव्या दिल्या ते दोघेही पोलीस ठाण्यात
WPL 2026 : डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच लढतीत प्रेक्षकांचे पैसे वसूल, अटीतटीच्या लढतीत स्मृती मानधनाच्या बंगळुरुचा मुंबईवर विजय
डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच लढतीत बंगळुरुचा विजय, मुंबईचा अटीतटीच्या लढतीत पराभव
Uddhav Thackeray : समोरच्या उमदेवारानं अर्ज मागं घ्यावा म्हणून अधिकाराचा दुरुपयोग करणारा राहुल नार्वेकर निवडणूक आयोगाला चालून जातो : उद्धव ठाकरे
नाशिकच्या प्रचारसभेत घराणेशाहीच्या मुद्यावरुन भाजपला प्रत्युत्तर, राहुल नार्वेकरांचं नाव घेत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
Tilak Varma: तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?

व्हिडीओ

Raj Thackeray Nashik Speech : तपोवन ते फडणवीस, जनसंघ ते भाजप ; राज ठाकरेंचे नाशिकमधील घणाघाती भाषण
Uddhav Thackeray Speech Nashik : भाजपने झेंड्यावरील हिरवा रंग काढावा ; उद्धव ठाकरे भाजपवर बरसले
Coffee With Kaushik : Nilesh Rane, Yogesh Kadam, शिंदेंची यंग ब्रिगेड EXCLUSIVE
Raj Thackeray Majha Katta : मुंबई कुणाच्या बापाची? राज ठाकरेंची 'माझा कट्टा'वर सर्वात स्फोटक मुलाखत
Ambadas Danve On MIM : इम्तियाज जलील भाजपचा हस्तक, त्याने शहराला व्यसन लावलं

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Meenakshi Shinde : मिनाक्षी शिंदेंच्या विरोधात आगरी समाज आक्रमक, ज्याला कॉल केला आणि ज्याला शिव्या दिल्या ते दोघेही पोलीस ठाण्यात
मिनाक्षी शिंदेंच्या विरोधात आगरी समाज आक्रमक, ज्याला कॉल केला आणि ज्याला शिव्या दिल्या ते दोघेही पोलीस ठाण्यात
WPL 2026 : डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच लढतीत प्रेक्षकांचे पैसे वसूल, अटीतटीच्या लढतीत स्मृती मानधनाच्या बंगळुरुचा मुंबईवर विजय
डब्ल्यूपीएलच्या पहिल्याच लढतीत बंगळुरुचा विजय, मुंबईचा अटीतटीच्या लढतीत पराभव
Uddhav Thackeray : समोरच्या उमदेवारानं अर्ज मागं घ्यावा म्हणून अधिकाराचा दुरुपयोग करणारा राहुल नार्वेकर निवडणूक आयोगाला चालून जातो : उद्धव ठाकरे
नाशिकच्या प्रचारसभेत घराणेशाहीच्या मुद्यावरुन भाजपला प्रत्युत्तर, राहुल नार्वेकरांचं नाव घेत उद्धव ठाकरे काय म्हणाले?
Tilak Varma: तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
तिलक वर्मा फिट न झाल्यास टी 20 वर्ल्ड कपमध्ये कोणाला संधी? 'या' पाच खेळाडूंची नावं चर्चेत, टीममध्ये कोणाची एंट्री होणार?
Tata : टाटा कंपनीच्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांनी केलं मालामाल, 20 वर्षात 1 लाखांचे बनले 1 कोटी, जाणून घ्या
टाटा कंपनीच्या 'या' शेअरनं गुंतवणूकदारांनी केलं मालामाल, 20 वर्षात 1 लाखांचे बनले 1 कोटी, जाणून घ्या
Share Market : अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
अमेरिकेची 500 टक्के टॅरिफची धमकी, सेन्सेक्स 2200 अंकांनी कोसळला, गुंतवणूकदारांचे 13 लाख कोटी पाच दिवसात स्वाहा
काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?
काँग्रेसच्या 'कोल्हापूर कस्सं, तुम्ही म्हणशीला तस्सं'ला आता महायुतीचा 'जे मनात तेच मनपात'चा उतारा! कर्तव्यनामा मांडताच पालकंमत्री, महाडिक, मंत्री मुश्रीफ, चंद्रकांतदादा काय म्हणाले?
Ambernath : अंबरनाथ नगरपरिषदेवर भगवा फडकणार, राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा, बहुमताचा आकडा पार
अंबरनाथ नगरपरिषदेवर भगवा फडकणार, राष्ट्रवादीच्या चार नगरसेवकांचा शिवसेनेला पाठिंबा, बहुमताचा आकडा पार
Embed widget